fbpx

अमेरिकेप्रमाणे भारतानेही Air Strike कारवाईचे पुरावे द्यावेत

पुलवामा येथील भागात झालेला भ्याड हल्ला, यानंतर देशभरात तयार झालेली एकच संतापाची लाट अन लोकभावना लक्षात घेऊन मोदी सरकारने अगदी संयमाने विविध स्तरावर केलेली पाकची कोंडी. यावरच न थांबता अचानक AIR STRIKE करून पाकची पळताभुई करून मोदींनी ५६ इंच छाती सुद्धा दाखवली. आता काही दिवस ओलांडल्यानंतर राजकीय पक्षांचे खरे रंग बाहेर येऊ लागले आहेत. काँग्रेसच्या एका जेष्ठ नेत्यानं कारवाईचे पुरावे सादर करावे असं म्हंटल आहे.

दहशत वाद्यांनी जम्मू काश्मीर भागात भ्याड पुलवामा हल्ला केला आणि यात भारताच्या केंद्रीय राखीव दलाचे तब्बल ४० जवान शहीद झाले. यानंतर अवघ्या काही सेकेंदात जैश संघटनेने हल्ल्याची जबाबदारी घेतली अन देशभरात एकच संतापाची लाट तयार झाली. यानंतर लोकभावना लक्षात घेऊन मोदी सरकारने अगदी संयमाने विविध स्तरावर पाकची कोंडी करत अनेक निर्णय घेतले आणि अचानक AIR STRIKE करून पाकची पळताभुई करून टाकली. आणि यानंतर देशभरात एकच जल्लोष झाला. अनेकांनी सरकारच्या या कारवाईचा भक्कमपणे पाठपुरावा केला.

Image Source – ANI

पण आता काही दिवस ओलांडल्यानंतर राजकीय पक्षांचे खरे रंग बाहेर येऊ लागले आहेत. साध्याच युग तंत्रज्ञानं फारच प्रगत झालं आहे त्यामुळे जस महासत्ता अमेरिकेने पार्कमध्ये घुसून लादेनचा काटा काढला आणि पुरावे जगाला दाखवले तसेच भारताने झालेल्या कारवाईचे पुरावे सादर करावे असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यानंतर देशभरात मिश्रा प्रतिक्रिया येणार यात वादच नाही.

काय म्हणाले काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह

आमची झालेल्या कारवाई बाबत हवाई दलावर शंका नाही पण आता जग बदललं आहे, तंत्रज्ञानाच्या या युगात सॅटेलाईटद्वारे आपण कोणतीही छायाचित्रे मिळवू शकतो. जस अमेरिकेने दहशतवादी लादेनला घुसून ठार केल्यानंतर पुरावे सादर केले त्याचप्रमाणे पुलवामा हल्ल्यानंतर प्रत्युत्तर म्हणून भारताने केलेल्या हल्ल्याबाबत अनेक शंका आहेत. सरकारने पुरावे सादर करून या हल्ल्याबाबत अनेक शंका दूर कराव्यात अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्यासोबतच अनेक नेत्यांनी दिली आहे.

No Fields Found.
1 Comment
  1. Ssagarvlll says

    Digvijay singh yanach miraj chya samor bandhun nyayla hav hot

Leave A Reply

Your email address will not be published.