fbpx

मोबाइल सिमप्रमाणे आता डिश टीव्हीच्या सेट-टॉप बॉक्सची पोर्टेबिलिटी करता येणार

Image Source - Google

तुमच्या डिश टीव्हीच्या सेट टॉप बॉक्सचे कार्ड सुद्धा आता दुसऱ्या कंपनीत पोर्ट करता येणार आहे.

एक वेळ होती जेव्हा सिमकार्डची कंपनी बदलायची असल्यास तुमचा नंबर देखील बदलल्या जात असे पण नंतर सिम कार्ड पोर्टिबिलिटीची सुविधा आली. सिम कार्ड पोर्टिबिलिटीमुळे तुमचा नंबर न बदलता तुम्ही त्याच नंबरवर दुसऱ्या सर्व्हिस प्रोव्हायडर कडून सेवा घेऊ शकता.

हीच सुविधा ग्राहकांसाठी आता डिश टीव्हीच्या बाबतीत सुद्धा लागू होणार आहे. तुमच्या डिश टीव्हीच्या सेट टॉप बॉक्सचे कार्ड सुद्धा आता दुसऱ्या कंपनीत पोर्ट करता येणार आहे. जे ग्राहक त्यांच्या ऑपरेटर कंपनीला कंटाळले आहेत त्यांच्यासाठी खासकरून ट्राय हि सुविधा घेऊन येत आहे.

परंतु केबल ऑपरेटर्स आणि डिश टीव्हीची सेवा देणाऱ्या कंपन्यांनी ट्रायच्या या निर्णयाला विरोध केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार प्रत्येक कंपनीच्या सेट टॉप बॉक्सची रचना वेगळी असते आणि सेट टॉप बॉक्स सोबत काही चुकीच्या गोष्टी केल्यास कंपनीची महत्वाची माहिती चोरीला जाऊ शकते. डीटीएच कंपन्यांची हि समस्या लक्षात घेता ट्रायने यावर तोडगा काढण्यास सुरवात केल्याचे कळले आहे. ट्राय सध्या काही तज्ज्ञांसोबत याविषयी सल्ला मसलत करत आहे. या अडचणीवर लवकरच तोडगा काढण्यात येईल पण त्यास किमान एक वर्ष तरी लागेल, असे ट्रायच्या प्रमुखांनी सांगितले आहे.

set top box portibility, dth portability, dish tv portability, dth portability in marathi, portability, सेट-टॉप बॉक्सची पोर्टेबिलिटी, डिश टीव्ही, पोर्टेबिलिटी, infobuzz
dth portability (Source – BGR India)

ट्रायचे प्रमुख आर. एस. शर्मा यांनी सांगितले कि, सिम पोर्टिबिलिटी प्रमाणेच डीटीएचसुद्धा सहजरित्या पोर्ट करता येईल असा मार्ग आम्ही शोधात आहोत. सगळ्याच डीटीएच कंपन्यांना वापरता येईल असा सेट टॉप बॉक्स आम्ही तयार करण्याच्या तयारीत आहोत. ग्राहकाने बाजारातून सेट टॉप बॉक्स विकत घेतल्यावर केवळ ज्या कंपनीची सेवा पाहिजे त्या कंपनीचे सॉफ्टवेअर डाउनलोड करावे लागणार आहे. उद्या जावून त्या ग्राहकाला एका दुसऱ्याच कंपनीची सेवा घ्यावीशी वाटली तर त्याला सेट टॉप बॉक्स बदलायची गरज पडणार नाही.

हा सगळा खटाटोप करण्यामागचे कारण असे कि, डीटीएच आणि केबल वापरणारे तब्बल १६ कोटी ग्राहक आपल्या देशात आहेत. अनेक कंपन्या खराब सेवा देत असूनही ग्राहक दुसऱ्या कंपनीची सेवा घेत नाही कारण त्यासाठी सेट टॉप बॉक्स बदलावा लागतो. हेच लक्षात घेता ट्रायने हे महत्वाचे पाऊल उचलले आहे. त्यामुळे सिम पोर्टिबिलिटीप्रमाणे तुम्ही लवकरच डीटीएच पोर्टिबिलिटी करू शकणार.

No Fields Found.

Leave A Reply

Your email address will not be published.