fbpx

मुख्यमंत्री षटकार ठोकण्याच्या तयारीत, विरोधकांच्या तंबूत घबराट

Image Source - Google

राज्यातील विविध विकासकामांवर “लोकसंवाद” च्या माध्यमातून जनतेसोबत थेट चर्चा करून अडीअडचणी समजावून घेतल्यामुळे राज्याच्या विकासाचा वेग नक्कीच वाढला आहे.

मागील लोकसभा निवडणुकीमध्ये सगळ्या विरोधकांना चीत करत केंद्रात श्री. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले. दिल्लीमधील या बदलाचे वारे महाराष्ट्रात पोचले नाही म्हणजे नवलच या उक्तीप्रमाणेच महाराष्ट्रात अभ्यासू नेतृत्व श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेसोबत सरकार स्थापन झाले. केंद्र आणि राज्य स्तरावरील सरकार एकाच पक्षाचे असल्यामुळे महाराष्ट्रामध्ये अनेक विकासकामांचे उपक्रम राबविण्यात आले. सरकारने केलेल्या या प्रयत्नांना काहींनी अगदी चांगली साथ दिली तर काहींनी राजकारण करून विरोध करण्याचा प्रयत्न केला.

loksanvad, chief minister, devendra fadanvis, लोकसंवाद, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

हा राजकारणाचा भाग बाजूला ठेवून केंद्र सरकार आणि राज्य सरकार जनतेसाठी ज्या अनेक योजना आखात असते ती गरजू लोकांपर्यंत ती योजना पोहोचते कि नाही आणि पोहोचल्यास त्याचा फायदा लोकांना होतो कि नाही हे जाणून घेण्यासाठी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोदींच्या पावलावर पाय ठेवत मन कि बातच्या धर्तीवर “लोकसंवाद” च्या माध्यमातून जनतेसोबत थेट संवाद साधून विविध
गोष्टीवर चर्चा करण्यास सुरवात केली.

राज्यातील विविध विकासकामांवर “लोकसंवाद” च्या माध्यमातून जनतेसोबत थेट चर्चा करून अडीअडचणी समजावून घेतल्यामुळे राज्याच्या विकासाचा वेग नक्कीच वाढला आहे. आता मुख्यमंत्री महोदय पुन्हा एकदा ‘लोकसंवाद’ या कार्यक्रमामार्फत थेट जनतेसोबत संवाद साधणार आहेत. यावर्षी येऊ घातलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमुळे मुख्यमंत्रांच्या या कार्यक्रमाला अधिकच महत्व प्राप्त झाले आहे.

२०१४ पासून अनेक लोकसंवादच्या माध्यमातून सरकारच्या विविध योजना, त्याचा लाभ, त्याबाबत तक्रारी आणि आवश्यक सुधारणा थेट जनतेमधून समझत असल्यामुळे या उपक्रमाचा सरकारला खूपच फायदा झाला. या उपक्रमाला लोकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळाला आणि म्हणूनच १४ जानेवारी रोजी पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे शेतकऱ्यांशी थेट संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाची वेळ ११.४० वाजता असून तुम्ही या कार्यक्रमाचा लाईव्ह संवाद तुमच्या मोबाईल, टॅब, संगणक किंवा लॅपटॉपवर देखील बघू शकता. याआधी २ जानेवारी २०१९ रोजी झालेल्या लोकसंवाद मध्ये प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांशी देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे लाभार्थ्यांशी थेट संवाद साधला होता.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत सोशल मीडिया पेजवर कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण होणार आहे. त्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. http://bit.ly/2FzqV2j

शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने अनेक योजनांची अंबलबजावणी सुरु केलेली आहे, त्यात सिंचन विहिरी, मागेल त्याला शेततळे, सूक्ष्म सिंचन, कृषी यांत्रिकीकरण, फळबागा, कांदा चाळ, स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, शेडनेट, अन्न प्रक्रिया, धानमंत्री पीक विमा योजना, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजना अश्या अनेक योजनानावर सरकारचे जोरात काम सुरु आहे. या योजनांचा लाभ किती लोकांना मिळाला आणि त्यातून त्यांचा काय फायदा झाला तसेच लोकांना काय अडचणी आल्या याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थेट शेतकऱ्यांसोबत बोलणार आहेत.


No Fields Found.

Leave A Reply

Your email address will not be published.