fbpx

गेल्या २५ महिन्यात लातूरमध्ये काय घडलं ?

हा प्रश्न वाचून तुम्ही अवाक झाला असाल. कारण यात २५ महिने असं म्हंटलं आहे. काय झालं होतं २५ महिन्यापूर्वी लातूरमध्ये ? आणि आत्ता त्याचा काय संबध असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण तुम्हाला ठाऊक आहेच कि सध्या विधानसभा निवडणुक जवळ येऊन ठेपली आहे आणि निवडणूक म्हटलं कि आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडायला सुरुवात होते.

आता कॉंग्रेसचे आमदार अमित देशमुख यांनी आपल्या प्रचारातून महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजपला प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे. पण मुळात ही निवडणूक आहे विधानसभेची आणि आरोप केल्याशिवाय निवडणुकीला रंग कसा चढणार. त्यामुळे त्यांनी महानगरपालिकेच्या गेल्या २५ महिन्यातल्या कामगिरीवर प्रश्न विचारण्यावर आपले लक्ष केंद्रित केले आहे.

(Source – Maharashtra Times)

विशेष म्हणजे, भाजपने त्या आधीच आपण लातूर महानगर पालिकेमध्ये लातूरसाठी गेल्या २५ महिन्यात काय काय केले याची पुस्तिकाच प्रकाशित केली आहे. पाहूयात गेल्या २५ महिन्यात भाजपने नक्की कोणकोणती कामे केली आहेत ते. भाजपने खेळाडूंसाठी लातूर क्रीडा संकुलात रनिंग ट्रॅक व विकिंग ट्रॅक केले आहेत, याशिवाय ऑफिसर्स क्लबचे काम शासकीय कॉलनीत सुरु केले आहे. दिव्यांगांसाठी पुनर्वसन केंद्राचे काम देखील सुरु केले आहे. अमृत योजनेअंतर्गत शहरात शेकडो किलोमीटरची नवीन पाईपलाईन टाकली आहे, शिवाय नव्या जलकुंभाचे म्हणजेच पाण्याच्या टाकीचे काम लवकरच सुरु होणार आहे.

तसेच शहरात २ कोटी रुपयांचे रस्ता रुंदीकरण प्रगतीपथावर आहे. राजस्थान शाळा ते PVR चौक दरम्यान असलेल्या दुभाजकाची दुरुस्ती चालू आहे. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल बांधून पूर्ण असून त्याचे लवकरच लोकार्पण होणार आहे. शहरात तब्बल ४४ कोटी रुपयांचे भुयारी विद्युतवाहिनीचे काम प्रगतीपथावर असून होणाऱ्या अपघातांना त्यामुळे आळा बसणार आहे. शाहू चौक ते विवेकानंद चौक रस्ता दुभाजकांचे काम लवकरच सुरु होणार आहे. लातूरमध्ये १३८ कोटी रुपयांचा मलनिस्सारण प्रकल्प लवकरच सुरु असून याद्वारे शुद्ध केलेले पाणी कारखान्यांना दिले जाणार आहे.

(Source – Third Pole)

वाव्यतिरिक्त ७० कोटींची रस्ते, नाले, ड्रेनेजची कामे प्रगतीपथावर आहेत. ग्रामदैवत श्री रामलिंगेश्वर मंदिराचा विकास होणार असून त्यासाठी १.५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. जन आरोग्य योजनेची प्रभावी अंमलबजावणी, अटल आरोग्य शिबिराचे आयोजन, उज्वला गॅस योजनेची प्रभावी अंमलबजावणी, मातृसंस्था पुरस्काराची सुरुवात, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्कचे सुशोभीकरण, स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून ‘मागेल त्याला शौचालय’, शहराचे विद्रूपीकरण रोखण्यासाठी बॅनर्स धोरण अशी तब्बल शंभर कामांची यादी भाजपने जाहीर करून कॉंग्रेसचे उमेदवार आणि विद्यमान आमदार अमित देशमुख यांना टिकेला जागाच ठेवली नाही.

मात्र ही विधानसभा निवडणूक आहे आणि त्यात महानगरपालिकेवर टीका करणे ही विसंगती आहे की आपल्या आमदारकीच्या कार्यकाळात विकासयोजना राबवण्यात आलेलं अपयश झाकण्याची केविलवाणी धडपड हे येत्या २१ तारखेला जनताच ठरवेल.

Leave A Reply

Your email address will not be published.