fbpx

गंगाखेड मतदारसंघात रत्नाकर गुट्टे आघाडीवर

गेल्या काही दिवसांपासून निवडणुकीच्या प्रचाराला रंग चढत आहे. प्रत्येक उमेदवार आपलं श्रेष्ठत्व आणि नेतृत्व सिद्ध करण्यासाठी जोर लावत आहे. गंगाखेड मतदारसंघातही प्रचार शिगेला पोहोचला आहे. नुकतीच शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांची पालममध्ये जाहीर सभा झाली. त्या सभेत त्यांनी गंगाखेडमधील उमेदवार रत्नाकर गुट्टे यांच्यावर निशाणा साधत टीका केली. अशा पद्धतीची टीकास्त्रे प्रत्येक जाहीर सभेमधून सोडली जात आहेत. परंतु, हि टीका होण्याआधी असलेली शिवसेना पक्षाची गेल्या काही काळातील कामगिरी लक्षात घेणेही तितकेच महत्वाचे आहे.

गेली पाच वर्ष सत्तेत असूनही शिवसेनेने कायमच विरोधी पक्षाची भूमिका घेत नाराजीचा सूर लावला होता. भाजप अध्यक्ष अमित शहा यांना जाहीरपणे “अफजलखान” संबोधण्यापर्यंत दोन पक्षांमधला तिढा गुंतला होता. नजीकच्या काळात झालेल्या आरे कॉलनीतीळ वृक्षतोडीलाही शिवसेनेने कडाडून विरोध नोंदवला आणि आपण सत्तेत आल्यानंतर या प्रकरणात असलेल्या सर्वांवर कडक कारवाई करू, असे विधानही केले. बहुदा, मित्रपक्ष म्हणून शिवसेना सत्तेत आहेच, हि गोष्ट ठाकरेसाहेब विसरले असावेत.

(Source – haribhoomi)

याआधीही नाणार प्रकल्पावरून दोन्ही पक्षांमध्ये बरेच मतभेद झाल्याचे निदर्शनास आले. भाजपाने जाहीर केलेला कर्जमाफीचा निर्णयही आपल्याला रुचला नसल्याचे विधान उद्धव ठाकरे यांनी केले होते. अनेकदा “आमचे राजीनामे तयार आहेत” असं म्हणत गेली पाच वर्षं सत्तेत राहूनही त्यांनी विरोधी पक्षाची भूमिका बजावली. इतकंच नाही तर आताही भाजपा आणि शिवसेना युती झालेली असली तरी दोन्ही पक्ष आपापला प्रचार विभक्त राहून करत आहेत. दोन्ही पक्षांनी आपले स्वतंत्र जाहीरनामे प्रकाशित केले आहेत. ही मैत्री टिकणार नसल्याचे संकेत दिले जात आहेत, असे म्हणायला हरकत नाही.

या सगळ्याचा इतका सविस्तर खुलासा करण्याचे कारण म्हणजे गंगाखेडचे उमेदवार रत्नाकर गुट्टे शिवसेनेपेक्षा भाजपाच्या जास्त जवळचे मानले जातात. तसेच भाजपातील उच्च पदावर कार्यरत असणाऱ्या अनेक बड्या नेत्यांसोबत त्यांचे जवळचे संबंध आहेत. एवढेच नव्हे तर गंगाखेड – धारखेड पूल निर्मितीचा प्रश्न बऱ्याच काळापासून शासन दरबारी प्रलंबित होता. परंतु सदर प्रश्नाला शासकीय यंत्रणेने विचारार्थ ठेवले होते. हा प्रश्न निकालात काढण्याचे काम रत्नाकर गुट्टे यांनी केले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन, सतत पाठपुरवठा करून गुट्टे यांनी सीआरएफ फंडातून पूल व बंधाऱ्यासाठी ३८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला. या कामाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व नितीन गडकरी यांच्या हस्ते पार पडले.

हे सगळं चित्र पाहता रत्नाकर गुट्टे यांना मत देणे म्हणजेच भाजपाला मत देणे अशी चर्चा आता गंगाखेड मतदारसंघात होऊ लागली आहे. तसेच स्थानिक भाजपा कार्यकर्ते आणि समर्थक यांचाही रत्नाकर गुट्टे यांना पाठिंबा आहे. त्यामुळे शिवसेनेच्या पोटात मात्र दुखत असणार यात काही शंका नाही. गुट्टे यांची भाजपाशी असलेली जवळीक शिवसेना पचवू शकते का नाही हे तर आता येणारी वेळच सांगेल.

Leave A Reply

Your email address will not be published.