fbpx

ब्रेकिंग – कुख्यात दहशतवादी मसूद अझहरचा मृत्यू

सध्याच्या पुलवामा अटॅक आणि त्यानंतर भारताने केलेल्या पाकीस्तानवरील AIR STRIKE मुळे दोन्ही देशातील वातावरण गढूळ झाले होते. यानंतर भारतासाठी आनंदाची आणि मोठी बातमी आहे. जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझहरचा मृत्य झाल्याची माहिती बाहेर येत आहे. श्रीनगरमध्ये हल्ला, संसदेवर आणि पठाणकोट सोबतच संपूर्ण देशाला हादरवून टाकणारा पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा तो सूत्रधार होता. याबात अधिकृत घोषणा झालेली नाही.

भारतासह संयुक्त राष्ट्रसंघानेही बंदी घातलेला जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझहरचा मृत्यू झाल्याची माहिती उच्चस्तरीय सूत्रांकडून ‘CNN News18’ ला मिळाली आहे. या सूत्रानुसार 2 मार्च रोजी म्हणजेच शनिवारी पाकिस्तानातील इस्लामाबाद इथं मृत्यू झालाच समझत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दहशतवादी मसूद अझहर किडनीच्या आजाराने त्रस्त होता, आणि या आजाराशीच झुंज देत असताना पाकिस्तानातील हॉस्पिटलमध्ये त्याचा मृत्यू झाल्याचं बोललं जात आहे. ‘CNN News18’ हि माहिती गुप्तहेर खात्यातील उच्चस्तरीय अधिकाऱ्यांकडून समजली आहे.

Image Source – Google

कोण आहे मसूद अझहर?

संपूर्ण भारतासह जगाला हादरवून टाकणाऱ्या पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपुरा हल्ल्याचं तो प्रमुख सूत्रधार होता. याच हल्ल्यात भारताच्या केंद्रीय राखीव दलाच्या तब्बल ४० जवानांचा मृत्यू झाला होता. यानंतर जैश ए मोहम्मद या संघटनेने एक विडिओ जरी करून या हल्ल्याची जबाबदारी घेतली होती. माहितीनुसार पुलवामा जिल्ह्यातील रहिवाशी आदिल अहमद उर्फ वकास या जैशच्या दहशतवाद्याने मसूद अझहरच्या सांगण्यानुसार हा आत्मघातकी हल्ला घडवून आणला होता

मसूद अझहर या नावाने भारताला फारच त्रास दिला आहे. आत्ताच झालेला पुलवामा हल्ला तसेच श्रीनगरमध्ये विविध हल्ले, विमानाचे अपहरण, संसदेवर आणि पठाणकोट हवाई तळावरील हल्ले अश्या विविध दहशतवादी हल्ल्यात मसूद अझहरच्या जैश ए मोहम्मद य संघटनेने घडवून आणले आहेत. याबाबत भारताने पूर्वीच संयुक्त राष्ट्रात याला दहशतवादी घोषित केले होते पण त्याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासाठी चीन सगळ्यात मोठी आडकाठी ठरत होता.

No Fields Found.

Leave A Reply

Your email address will not be published.