fbpx
Take a fresh look at your lifestyle.

नरेंद्र मोदी या मतदार संघातून लढणार लोकसभा निवडणूक

0 364

आगामी लोकसभा निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी भाजपाची राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक पार पडली. भाजपच्या या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी कुठल्या मतदारसंघातून निवडणूक लढणार यावरही चर्चा झाली. मागील २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीत मोदींनी वाराणसी आणि गुजरातमधील बडोदा अश्या २ ठिकाणी निवडणूक लढवली होती. बडोदा हे तर नरेंद्र मोदींचे होम ग्राउंड असे म्हणायला हरकत नाही.

narendra modi, loksabha 2019, varanasi constituency

२०१४ सालच्या निवडणुकीत बडोद्यामधून नरेंद्र मोदी ५ लाख 70 हजार 128 मतांच्या फरकाने जिंकले होते तर यूपीतील वाराणसी मधून आपच्या अरविंद केजरीवाल याना हरवत मोदी ३ लाख 71 हजार 784 मतांच्या फरकाने जिंकले होते. या सर्व गोष्टींचा अभ्यास करता २०१९ लोकसभा निवडणुकीसाठी नरेंद्र मोदी पुन्हा एकदा वाराणसी मतदारसंघातून रिंगणात उतरणार आहेत. याशिवाय मोदी अजून कोणत्या मतदार संघातून उभे राहतील याबद्दल अजून कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

भाजपाच्या या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीला राजनाथ सिंह, वैंकय्या नायडू, शिवराज सिंग चौहान, सुषमा स्वराज, अरुण जेटली व इतर दिग्गज नेते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.