fbpx

एक आतंकवादी ते भारतीय सैनिक : शहीद लान्स नायक नजीर वाणी ह्यांची वीर गाथा

Image Source - Google

हा महान सैनिक, पूर्वी एक आतंकवादी होता मग… कसा झाला त्याच्या आयुष्याचा कायापालट ?

माणूस हा चुकीचा पुतळा आहे असे म्हणतात. माणूस म्हटल कि तो चुकणारच, पण आपल्या चुका व केलेल्या गुन्ह्यांचा पश्चाताप करून तो वाईट मार्ग सोडून चांगल्या मार्गावर परतणाऱ्यास “महान माणूस” म्हटले जाते. कुमार्ग सोडून सन्मार्गावर चालणारे असे व्यक्ती समाजासाठी एक आदर्श बनतात. शहिद लान्स नायक नजीर वाणी हे सुद्धा समाजासाठी असेच एक आदर्श बनले आहेत. शहिद लान्स नायक नजीर वाणी ह्यांना मरणोपरांत अशोक चक्र ह्या सैन्यातील सर्वोच्च सम्मानाने सन्मानित करण्यात येणार आहे.

२ वेळा सेना मेडल मिळवणाऱ्या नजीर वाणी ह्यांच्या भूतकाळाविषयी जाणून घ्याल तर तुम्हालाही आश्चर्य वाटेल

२ वेळा सेना मेडल मिळवणाऱ्या नजीर वाणी ह्यांच्या भूतकाळाविषयी जाणून घ्याल तर तुम्हालाही नजीर वाणी ह्यांचे कौतुक वाटल्याशिवाय राहणार नाही. सैन्यदलातील सर्वोच्च पुरस्कार पटकवणारे नजीर वाणी पूर्वी स्वतःच आतंकवादी कारवायांमध्ये सहभागी झाले होते. स्वतः आतंकवादी गतिविधींमध्ये सामील असणारे नजीर वाणी ह्यांना एक दिवस आपल्या चुकांची जाणीव झाली व आपण केलेल्या कृत्यांचा पश्चाताप झाला व त्या क्षणापासून वाणी ह्यांनी देशसेवा करण्याचे व्रत अंगिकारले व ते शेवटपर्यंत निभावले. सैन्यात भरती झाल्यानंतर १६२ टेरिटोरियल आर्मी बटालियन जॉईन केली होती.

Nazir Vani was a terrorist once (Source – News18 इंडिया)

ह्या अतुल्य पराक्रमामुळे लान्स नायक नजीर वाणी ह्यांना अशोक चक्र पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. मागील वर्षी, २३ नोव्हेंबर २०१८ ला ड्युटीवर असतांना गुप्तचर खात्याकडून हि माहिती मिळाली कि शोपीयातील बटागुंड गावामध्ये ६ आतंकवादी लपलेले आहेत व त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आहेत.

वाणी व त्यांच्या सहकार्यांना आतंकवाद्यांचे पळण्याचे रस्ते बंद करण्याची जबाबदारी देण्यात आली. हि जबाबदारी तशी कठीणच होती. २३ नोव्हेंबर २०१८ ला घडलेल्या ह्या चकमकीत शहिद लान्स नायक नजीर वाणी व त्यांच्या सहकार्यांनी त्या सर्व ६ आतंकवाद्यांच्या खातमा केला व त्या ६ पैकी २ आतंकवाद्यांना स्वतः वाणी ह्यांनी यमसदनी पाठवले होते पण, ह्या चकमकीत ते स्वतः सुद्धा गंभीर जखमी झाले होते व उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

lance naik najir vani, nazir vani, Nazir Ahmad Wani, लान्स नायक नजीर वाणी, ashok chakra to nazir vani, terrorist to indian army, infobuzz, नजीर वाणी यांना अशोक चक्र
Lance Naik Najir Vani (Source – Zee News)

कुलगांमच्या अशमुजी गावाचे रहिवासी असलेले नजीर वाणी ह्यांना त्यांच्या गावातील समस्त गावकर्यांनी साश्रू नयनाने निरोप दिला. कधीकाळी स्वतः आतंकवादी असलेल्या वाणी ह्यांनी सैन्यात भरती होऊन देशाची जी अत्युच्च सेवा बजावली व आपले कर्तव्य बजावताना प्राण अर्पण केले व भारतातील तरुणांसमोर एक नवीन आदर्श प्रस्थापित केला आहे.

lance naik najir vani, nazir vani, Nazir Ahmad Wani, लान्स नायक नजीर वाणी, ashok chakra to nazir vani, terrorist to indian army, infobuzz, नजीर वाणी यांना अशोक चक्र
(Source – gujarati.news18.com)
No Fields Found.

Leave A Reply

Your email address will not be published.