fbpx

AIRSTRIKE चा सर्वांत मोठा पुरावा : ३०० दहशतवाद्यांचा आकडा आला कुठून पहा

पुलवामा येथील भागात झालेला भ्याड हल्ला, यानंतर देशभरात तयार झालेली एकच संतापाची लाट अन लोकभावना लक्षात घेऊन मोदी सरकारने अगदी संयमाने विविध स्तरावर केलेली पाकची कोंडी. यावरच न थांबता अचानक AIR STRIKE करून पाकची पळताभुई करून मोदींनी ५६ इंच छाती सुद्धा दाखवली. यानंतर काँग्रेसच्या एका जेष्ठ नेत्यानं कारवाईचे पुरावे सादर करावे असं म्हंटल होत, तितक्यात Air Strike मध्ये दहशतवाद्यांचे तळ उद्धवस्त करणारे सॅटेलाईट फोटो समोर आले होते, यानंतर AIRSTRIKE चा सर्वांत मोठा पुरावा समोर आला आहे.

दहशत वाद्यांनी जम्मू काश्मीर भागात भ्याड पुलवामा हल्ला केला आणि यात भारताच्या केंद्रीय राखीव दलाचे तब्बल ४० जवान शहीद झाले. यानंतर अवघ्या काही सेकेंदात जैश संघटनेने हल्ल्याची जबाबदारी घेतली अन देशभरात एकच संतापाची लाट तयार झाली. यानंतर लोकभावना लक्षात घेऊन मोदी सरकारने अगदी संयमाने विविध स्तरावर पाकची कोंडी करत अनेक निर्णय घेतले आणि अचानक AIR STRIKE करून पाकची पळताभुई करून टाकली. पण अनेकांनी यावर शंका घेत सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. पण आता AIRSTRIKE चा सर्वांत मोठा पुरावा समोर आल्यानंतर या शंका दूर होतील अशी आशा.

Image Source – Google

भारतीय गुप्तहेर खात्याच्या माहितीनुसार भारतीय हवाई दलाने बालकोट मध्ये केलेल्या हल्ल्याच्या वेळी जैश ए मोहम्मदच्या तळांवर काही काळ आदी तब्बल ३०० मोबाईल फोन ऍक्टिव्ह असल्याचे समोर येत आहे. भारतीय हवाई दलाने हल्ला करण्याचे निश्चित केल्या नंतर नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशन (NTRO) या संस्थेने या प्रातांतल्या तळावर नजर ठेवली होती अशी माहिती एएनआयने सूत्रांनि दिली आहे.

Image Source – deccanchronicle.com

काही काळ आधी जैश च्या त्या तळावर अगदी शेवटच्या क्षणप्रयन्त तब्बल ३०० मोबाइलला फोन ऍक्टिव्ह होते पण भारताच्या हवाई दलाने केलेल्या हल्ल्यानंतर ते अचानकच गायब झाले. याचा सरळ सरळ असा अर्थ निघतो कि किमान ३०० दहशतवादी आणि संबंधित लोक त्या तळावर त्यावेळी उपस्तित होते. आणि या माहिती मुळेच ३०० दहशतवादी मारल्याचा एकदा माध्यमांसमोर येत होता. हे काम आमचे नाही त्यामुळे हवाई दलाने यावर कोणतीही माहिती देण्यास नकार केला.

सॅटेलाईट फोटो आले समोर

26 फेब्रुवारीला पहाटे 3 वाजता भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमध्ये घुसून जैशच्या तळांना लक्ष केलं होत, आणि तब्बल बॉम्ब वर्षाव करून २१ मिनिटात मोहीम फत्ते केली होती. यामध्ये मिराज – 2000 या लडाखु विमानांचा सहभाग होता. भारताच्या या हल्ल्यामध्ये दहशतवाद्यांचं मोठं नुकसान होऊन तब्बल 200 ते 300 दहशतवादी ठार झाल्याची माहिती समोर आली होती. यानंतर पाकिस्ताननं कारवाई झालीच नाही असं म्हणत पुराव्याची मागणी केली होती. सोबतच भारतातील अनेक राजकीय पक्ष्यच्या नेत्यांनी सुद्धा पुरावे सादर करण्याची मागणी केली होती.

Image Source – Telegraph India

आता भारताने केलेल्या या धडाकेबाज कारवाईचे समर्थान करणारे काही फोटो समोर आले आहेत. यामुळे आपला शेजारी पुन्हा तोंडघशी पडणार यात वादच नाही. ज्या ठिकाणी बालाकोटमध्ये हल्ला झाला त्याठिकाणचे सिंथेटिक अॅपर्चर रडार (एसएआर) फोटो सरकारकडे सुपूर्त करण्यात आले आहेत. त्यामध्ये दहशतवाद्यांचे तळ उद्धवस्त केल्याचे अगदी स्पष्ट दिसत आहे. याबाबत अधिक सविस्तर वृत्त एनडीटीव्ही या वाहिनीने दिले आहे.

Image Source – Lokmat news 18

हवाई दलाच्या उच्च अधिकाऱ्यांना कारवाईच्या पुराव्याबाबत विचारला असता कारवाई केलेल्या मिरज २००० ला याबाबत कोणतेही फोटो घेता आले नाहीत पण सोबत असणाऱ्या सुखोई 30 ने मात्र कारवाई अगोदर आणि त्यानंतरचे फोटो घेतले आहेत. सरकारला सगळे पुरावे सादर केले आहेत पण ते कधी आणि कोणाला प्रसारित करायचे हे सरकार ठरवेल असेही त्यांनी सांगितले.

No Fields Found.

Leave A Reply

Your email address will not be published.