fbpx

Pink Talk : महिला दिनानिमित्त प्रसिद्ध वृत्त निवेदिका सौ ज्योती अंबेकर ह्यांच्याशी संवाद साधण्याची संधी

जागतिक महिला दिनानिमित्त पार्थ नॉलेज नेटवर्क आणि प्रगती इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर्स ह्यांच्या संयुक्त विद्यमानाने एका खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम शनिवार दिनांक ९ मार्च २०१९ रोजी सकाळी ११ वाजता होणार असून ह्या कार्यक्रमाचे नाव “पिंक टॉक” असे आहे. पिंक टॉक हा खास महिलांकरिता आयोजित विशेष लाईव्ह कार्यक्रम असून, ह्यात तुम्हाला दूरदर्शनच्या प्रसिद्ध वृत्त निवेदिका सौ ज्योती अंबेकर ह्यांच्याशी बातचीत करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. सौ. ज्योती अंबेकर या मुख्य वक्त्या म्हणून महाराष्ट्रातील सर्व महिलांशी लाईव्ह पद्धतीने संपर्क साधणार आहेत. हे एक लाईव्ह टेलिकास्ट असून तुम्हाला हा कार्यक्रम मोबाइल, लॅपटॉप व टॅबलेटवर पाहता येणार आहे. तमाम महिला वर्गांनी ह्या कार्यक्रमाचा जरूर लाभ घ्यावा. तुम्ही elearning.parthinfotech.in ह्या लिंकद्वारे “पिंक टॉक” ह्या लाईव्ह टेलीकास्टचा आनंद घेऊ शकता तसेच ह्या कार्यक्रमात थेट सहभागी होऊ शकता.

सौ ज्योती अंबेकर ह्यांचा अल्पपरिचय

ज्योती अंबेकर ह्या प्रसिद्ध वृत्त निवेदिका, मुलाखतकार आणि सूत्रसंचालक असून त्या संवाद कलेच्या क्षेत्रातील एक मानदंड मानल्या जातात. आज संवाद कलेच्या क्षेत्रात सौ ज्योती अंबेकर ह्यांचे नाव आदराने घेतले जाते. त्यांच्या आजवरच्या प्रवासातील विविध टप्पे व त्यांचा ह्या क्षेत्रातील अनुभव ह्या कार्यक्रमात त्या मनमोकळेपणाने मांडणार आहेत.

उस्मानाबाद शहरात जन्मलेल्या ज्योती अंबेकर ह्यांनी कशाप्रकारे ह्या क्षेत्रामध्ये यश संपादन केले व ह्या क्षेत्रात त्यांना कोणकोणते अनुभव आले, तसेच महिलांविषयीची त्यांची भूमिका त्या मनमोकळेपणाने ह्या कार्यक्रमात मांडणार आहेत. संवाद कला क्षेत्रातील तब्बल २० वर्षांचा अनुभव असलेल्या ज्योतीजी अंबेकर ह्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अश्या विविध मान्यवरांच्या लाईव्ह मुलाखती आपल्या २० वर्षांच्या कारकिर्दीत घेतल्या आहेत.

त्यांच्यासोबत संवाद साधण्याची संधी तुम्हाला ह्या कार्यक्रमाद्वारे मिळणार आहे. हा कार्यक्रम http://elearning.parthinfotech.in या लिंकद्वारे मोबाइलवरही बघण्याची सोय उपलब्ध आहे.* शनिवारी, दि. ०९ मार्च २०१९ रोजी सकाळी ११ वा. हा कार्यक्रम सुरू होईल. अधिक माहितीसाठी ०२२ – २७६४३००० या क्रमांकावर संपर्क साधता येईल.

No Fields Found.

Leave A Reply

Your email address will not be published.