fbpx

ताबडतोब हे अॅप डिलीट करा, अन्यथा बँक अकाउंट रिकामे होईल

सध्याच्या डिजिटल युगात ऑनलाईन बँकिंग सारख्या सुविधांमुळे आपली कामं अगदी सोपी झाली आहेत. लाईट बिल भरणे वगैरे अश्या कामांसाठी रांगेत उभे न राहता आपण पेमेंट अँपच्या मदतीने सगळी कामे करतो. परंतु सावधान, तुम्ही जर हे चुकीचे अँप डाउनलोड केले असेल तर तुमच्या खात्यातील सर्व पैसे चोरीला जाऊ शकतात, रिसर्व बँक ऑफ इंडियाने या संबंधी एक सूचना जरी केली आहे.

रिसर्व बँक ऑफ इंडियाने धोक्याची घंटा देत एक सूचना जरी केली आहे. RBI च्या म्हणण्यानुसार कुणीही जर ‘AnyDesk’ हे अँप वापरात असाल तर ताबडतोब ते तुमच्या लॅपटॉप किंवा मोबाईल मधून काढून टाका. कारण सायबर चोर AnyDesk या ऍपचा उपयोग करून तुमच्या बँक खात्यातील पैसे चोरत आहेत. त्यामुळे हे अँप तुमच्याकडे असेल तर ताबडतोब अनइन्स्टॉल करून टाका. हे अँप दिलीत न केल्यास कदाचित तुम्हाला त्याचे वाईट परिणाम भोगावे लागू शकतात.

anydesk app, upi fraud, anydesk app fraud, online banking, rbi on anydesk fraud
fraud using anydesk app (Source – ByScoop)

तुमच्या खात्यातील पैसे चोरण्यासाठी या सायबर चोरांनी नवीन युक्ती लढवली आहे. या चोरांनी बँकांचे फेक म्हणजेच खोटे अँप तयार केले आहे आणि त्याच्या मदतीने ते ग्राहकांच्या बँक खात्याची माहिती मागत आहेत. तुम्ही जर हि माहिती भरली तर खात्यातील सर्व पैसे हे चोर पळवून नेतील. या ऍपची जाहिरात सुद्धा सोहळा मीडियावर मोठ्या प्रमाणावर केली जात आहे. त्यामुळे लोकांनी सतर्क राहून अश्या कुठल्याही अँपल बळी पडू नये. अनेकांचे पैसे चोरीला गेल्याने रिसर्व्ह बँकेने हि नोटीस जरी केली आहे.

पैसे कसे चोरीला जातात ?

लोकांना या अँपची जाहिरात सोशल मीडियावर दिसते आणि लोक ते अँप डाउनलोड करतात. हे अँप चालू केल्यानंतर ते तुम्हाला तुमच्या मोबाईलचा ऍक्सेस मागतात आणि तुम्ही तो दिल्यास तुमच्या मोबाईल मधील सर्व पेमेंट अँप्सची माहिती AnyDesk या अँपला मिळते. तसेच तुमच्या मोबाईलवर एक नऊ अंकी कोड येतो आणि हे AnyDesk अँपवले तोच कोड बँकेच्या नावावर मागतात. शेवटी त्यांना तुमच्या बँकेचा रिमोट ऍक्सेस मिळाल्यावर ते सर्व पैसे चोरून पसार होतात.

anydesk app, upi fraud, anydesk app fraud, online banking, rbi on anydesk fraud
UPI-operator NCPI warns about ‘AnyDesk’ app fraud (Source – Zee Business)
No Fields Found.

Leave A Reply

Your email address will not be published.