fbpx

पुण्यातून सुरु होतोय भारताला क्रीडा क्षेत्रात महासत्ता बनविण्याचा प्रवास..


इन्फोबझ्झ वरील विविध लेखांचे आणि ताज्या बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला Facebook , Instagram आणि Twitter वर फॉलो करा.


आता तो दिवस दूर नाही जेव्हा भारत देश क्रीडा क्षेत्रात महासत्ता म्हणून ओळखला जाणार… कारण भारत सरकारने यासाठी एक महत्वाचं पाऊल उचललं आहे. बघुयात काय ते ?

पुणे…देशभरात विद्येचं माहेरघर म्हणून ओळखलं जाणारं शहर…महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून देखील पुण्याचेच नावलौकिक आहे…अगदी क्काय नाही आमच्या पुण्यात असं मूळ पुणेकर असणारे बरेच लोक विचारत असतात…पुणे तिथे काय उणे…? ह्या प्रश्नाचं उत्तर सहसा काहीच उणे नाही असं आजवर आपण देत आलोय.

आजपर्यंत पुणे म्हणजे शिक्षणाचं माहेरघर म्हणून लोक ओळखत आलेत पण आता खेळाचं वर्चस्व देखील पुण्यात तेवढंच वाढताना दिसणार आहे….कारण या साठी केंद्र व राज्य सरकारच्या क्रीडा मंत्रालयानेच पुढाकार घेतलाय…निमित्त आहे खेलो इंडिया युथ गेम्स (Khelo India Youth Games) या स्पर्धेचं…९ जानेवारी २०१९ पासून २० जानेवारी २०१९ पर्यंत भारतभरातील १७ आणि २१ वर्षाखालील वयोगटासाठी केंद्र सरकारच्या क्रीडा मंत्रालयातर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी हि स्पर्धा आयोजित करण्यात येतेय ती पुण्याच्या बालेवाडी स्टेडीयम मध्ये.

भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या उपस्थितीत इंदिरा गांधी इनडोअर स्टेडीयम, दिल्ली येथे मागील वर्षी ३१ जानेवारी रोजी या स्पर्धेच उद्घाटन झालं होतं. ८ फेब्रुवारी पर्यंत चाललेल्या या स्पर्धेत भारत भरातील राज्य आणि केंद्रशासीत प्रदेशांतील सुमारे ५००० शालेय विद्यार्ध्यांनी राष्ट्रीय स्तरावर देशाचं नाव उंचावण्याचं ध्येय डोळ्यासमोर ठेऊन या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. १७ वर्षाखालील वयोगटातील शालेय विद्यार्थ्यांसाठी झालेल्या या स्पर्धेत १९९ सुवर्ण, १९९ रौप्य आणि २७५ कास्य पदकं विजयी विद्यार्थ्यांना देण्यात आले होते. त्यात पहिल्या स्थानी राहिलं ते १०२ पदकं जिंकणारे हरियाणा राज्य. ३८ सुवर्ण, २६ रौप्य आणि ३८ कास्य पदकं जिंकण्यात हरियाणा राज्याला यश प्राप्त झाले होते. त्या खालोखाल पदक जिंकण्याचा क्रमांक होता तो महाराष्ट्राचा. एकून १११ पदकांसह महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर राहिला.

खालील फोटोमध्ये केंद्रीय क्रीडा मंत्री राज्यवर्धनसिंग राठोर हरियाणाच्या टीमला ट्रॉफी देताना तुम्हाला दिसतील.

Khelo India Youth Games, Khelo India 2019, Khelo India Scholarship Scheme, खेलो इंडिया युथ गेम्स, खेलो इंडिया 2019, खेलो इंडिया स्कॉलरशिप योजना, khelo india information in marathi, खेलो इंडिया माहिती

Haryana emerge champions, overtake Maharashtra on final day as Khelo India Games (Source – Scroll.in )

काय आहे नक्की “खेलो इंडिया युथ गेम्स”?

जगाच्या पाठीवर शक्तिशाली क्रीडा राष्ट्र म्हणून भारताची ओळख निर्माण व्हावी या उद्देशातून केंद्र सरकारने एक महत्वाचं पाऊल टाकलं आहे म्हणूनच उत्तम खेळाडू घडविण्यासाठी भारताच्या क्रीडा मंत्रालयाने पुढाकार घेत (Khelo India) हा उपक्रम सुरु केला आहे.

लहान वयातच खेळाडूंच्या कलागुणांना वाव देण्यासाठी भारताच्या क्रीडा मंत्रालयाने मागील वर्षी हि योजना सुरु केली आहे, ज्यात हॉकी, कबड्डी, कुस्ती, फुटबॉल यांसारख्या 18 खेळांची स्पर्धा घेतली जाईल.

खुद्द भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने या खेलो इंडिया युथ गेम्स हि संकल्पना मंजूर केली. याआधी राजीव गांधी खेल योजना नावाने असलेल्या योजनेची “खेलो इंडिया युथ गेम्स” हि सुधारित आवृत्ती आहे. भारतातील तळागाळातील विद्यार्थ्यांसाठी खास करून ग्रामीण भारतातील विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय स्थरावरील सर्वात मोठं क्रीडा व्यासपीठ म्हणून ह्या उपक्रमाकडे पाहिलं जातंय. संपूर्ण भारत भरातून पुण्यात होणाऱ्या या स्पर्धेत २९ राज्य आणि ९ केंद्र साशित प्रदेशांमधून ८,००० विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होतील.

Khelo India Youth Games, Khelo India 2019, Khelo India Scholarship Scheme, खेलो इंडिया युथ गेम्स, खेलो इंडिया 2019, खेलो इंडिया स्कॉलरशिप योजना, khelo india information in marathi, खेलो इंडिया माहिती

Prime Minister Narendra Modi at the Khelo India School Games. (Source – The Indian Express )

“खेलो इंडिया युथ गेम्स २०१९” मध्ये कोणकोणत्या खेळांची स्पर्धा होईल?

बैटमिंटन, स्विमिंग, कुस्ती, कबड्डी, फुटबॉल, Athletics, हॉकी, नेमबाजी, वेट लिफ्टिंग, बॉक्सिंग, कुस्ती, Gymnastic, जूडो, खो-खो, volleyball या सर्व खेळांची १७ वर्षाखालील गट आणि २१ वर्षाखालील गट अश्या दोन गटांमध्ये स्पर्धा होईल.

“खेलो इंडिया स्कॉलरशिप योजना”

महाभारत काळात द्रोणाचार्य यांचा धनुर्विद्या शिकणारा शिष्य एकलव्याने मारलेल्या बाणानंतर थेट भारताच्या राज्यवर्धन सिंह यांनी नेमबाजीत रौप्य पदक जिंकल्या नंतरचं भारतात धनुर्विद्येचं महत्व पुन्हा एकदा अधोरेखित झालं. परंतु २०१४ साली नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली बनलेल्या सरकार मध्ये भारताच्या पंतप्रधानांनी क्रीडा मंत्री हा एखादा उत्तम खेळाडूच असायला असा विचार करून ऑलम्पिक मध्ये नेमबाजीत रौप्य पदक जिंकून आलेल्या राज्यवर्धन सिंह राठोड यांनाचं थेट भारताचे क्रीडा मंत्री म्हणून जबाबदारी दिली आणि त्यानंतर प्रवास सुरु झाला भारताला जागतिक क्रीडा विश्वात महासत्ता बनविण्याचा.

…आणि त्या क्षणानंतर भारतात बॉक्सिंग खेळाची तुफान क्रेझ वाढली

क्रीडा मंत्रालयासमोर असलेल्या असंख्य आव्हानांना समर्थ पणे तोंड देत क्रीडा मंत्र्यांनी विविध खेळांना चालना देण्यासाठी वेगवेगळ्या रणनीती बनविण्यास सुरुवात केली. त्यातीलच एक रणनीती म्हणून “खेलो इंडिया युथ गेम्स” (Khelo India Youth Games) कडे पाहायला हवे. अर्थात नुसती रणनीती आखून युध्द जिंकता येत नाही तर युद्धात लागणारी सज्जता आणि प्रशिक्षण देखील हवे असते हे नेमबाज असलेल्या क्रीडा मंत्र्यांनी ओळखले असणार म्हणूनच केंद्र सरकारने २०१९-२०२० या एका वर्षाच्या कालावधीसाठी थोडे थोडके नव्हे तर तब्बल १७५६ करोड रुपये मंजूर केलेत. यावर्षीची खेलो इंडिया पुण्यात आयोजित करून महाराष्ट्राला आपली संस्कृती दाखविण्याची अजून एक संधी मिळाली आहे आणि यात महाराष्ट्र राज्य क्रीडा मंत्री श्री.विनोद तावडे यांचे योगदान मोठे आहे.

क्रीडा मंत्र्यांनी “खेलो इंडिया स्कॉलरशिप योजना” (Khelo India Scholarship Scheme) देखील सुरु केली त्याच शिष्यवृत्तीचा भाग म्हणून पुण्यात होणाऱ्या ह्या राष्ट्रीय स्पर्धेत जिंकणाऱ्या विद्यार्थ्यांना ५ लाख रुपये प्रोत्साहनपर शिष्यवृत्ती म्हणून पुढील ८ वर्षांकरिता देण्यात येतील. इतकंच नाही तर आजवर ऑलंपिक आणि एशियन गेम्स विजेत्या खेळाडूच्याच प्रशिक्षकांना मानधन दिले जात होते परंतु आता त्या खालील स्तरांवरील प्रशिक्षकांना देखील त्यांचे एकलव्य घडविण्यासाठी मानधन केंद्र सरकार तर्फे मिळणार आहे.

No Fields Found.

Leave A Reply

Your email address will not be published.