fbpx

Mumbai Indians चा भन्नाट ट्रेलर पाहिलात का ?

बहुप्रतीक्षित यावर्षीचे IPL वेळापत्रक कालच प्रदर्शित करण्यात आले, यावेळी मालिकेचा नारळ महेंद्रसिंग धोनीची चेन्नई आणि बंगरुळची विराटसेना यांच्यात फुटणार आहे. पुन्हा एकदा IPL मधील थरारक क्षणांचा आनंद क्रिकेट रसिकांना अनुभवायला मिळणार यात काही वादच नाही. आत्ताच थोड्यवेळापूर्वी जागतिक कंपनी नेटफ्लिक्सने Mumbai Indians चा भन्नाट ट्रेलर प्रदर्शित केला आहे.

सध्या तंत्रज्ञानामुळे सिनेसृष्टी बदलत चाललेली आहे, पूर्वी लोक घरच्या टीव्ही वर मालिका तासंतास पाहत होते. त्यानंतर आला थेटर जमाना जिकडे थेटरला जाऊन सिनेमा मोठ्या आवडीने लोक पाहत होते, पण सध्या आला आहे तो वेब सिरीजचा जमाना. याची भारतात सुरवात झाली ती अमेरिकन वेब सिरीज “गेम ऑफ थ्रोन्स” पासून आणि मग देसी “सिक्रेड गेम्स” नंतर तर अक्षरशः वेब सिरीज चा पूर आला आहे.

Mumbai Indians, Mumbai Indians ट्रेलर, Mumbai Indians Web series, Netflix, Mumbai Indians trailer
Image Source – KreedOn

भारतातील ‘इनसाइड एज’, सिक्रेड गेम्स, सिलेक्शन डे, ब्रीद आणि मिर्झापूर च्या प्रचंड यशानंतर ‘नेटफ्लिक्स’ कंपनी आता Mumbai Indians वर वेब सिरीज घेऊन येत आहे. त्यामुळे एन IPL च्या वातावरणात Mumbai Indians वर वेब सिरीज नक्कीच चाहत्यांना खुश करणार.

Mumbai Indians वर वेब सिरीजचा बहुप्रतीक्षित भन्नाट ट्रेलर आज प्रदर्शित झाला. ‘Cricket Fever: Mumbai Indians’ असं या ट्रेलरचं नाव आहे. येत्या १ मार्चपासून Mumbai Indians वरील वेब सिरीजचे स्ट्रीमिंग होणार आहे, त्यामुळे आपल्याला १ मार्च पर्यंत वेट करावा लागेल. अधिक माहितीनुसार या Mumbai Indians वर वेब सिरीजमध्ये ड्रेसिंग रूममधील महत्वाचे क्षण, टीम मेंबर्स च्या आतील गोष्टी तसेच मालक आणि टीम मधील विविध संभाषण पाहायला मिळणार आहेत.

Mumbai Indians, Mumbai Indians ट्रेलर, Mumbai Indians Web series, Netflix, Mumbai Indians trailer
Image Source – Scroll.in

आपण ट्रेलर पाहिलात तर लक्षात येईल कि गोष्टी Mumbai Indians च्या टीम बाबत अनेक गोष्टी रंजक पद्धतीने दाखवण्यात आल्या आहेत. याबाबत नेटफ्लिक्स ला विचारण्यात आल्यावर त्यांनी हि वेब सिरीज तुफान हिट होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.

Mumbai Indians चा भन्नाट ट्रेलर येथे पहा.

No Fields Found.

Leave A Reply

Your email address will not be published.