fbpx
Take a fresh look at your lifestyle.

धोनी म्हणतो, ‘एक वेळ मी खून करेन पण….’

0 2,712

महेंद्रसिंग धोनी म्हटलं कि त्याच्या चाहत्यांच्या डोळ्यासमोर दिसतात धोनीच्या नेतृत्वाखाली जिंकलेले २ वर्ल्डकप. भारताला २ वर्ल्डकप जिंकवून देणारा तो एकमेव कर्णधार आहे. त्याचे नेतृत्व कौशल्य आणि कुल स्वभाव यामुळे त्याचा चाहता वर्ग सुद्धा मोठा आहे. एवढेच नव्हे तर आयपीएल मध्ये धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्सने ३ वेळा विजेतेपद मिळवले आहे. परंतु स्पॉट फिक्सिंगच्या आरोपामुळे चेन्नईच्या संघावर २ वर्षांसाठी बंदी घालण्यात आलेली.

dhoni, chennai super kings, roar of lion, hotstar, dhoni documentary, chennai super kings banned, spot fixing, ipl
MS Dhoni (Source – BBC)

२ वर्षांच्या बंदीच्या काळात चेन्नईचे प्लेयर्स इतर संघांकडून खेळू लागले. परंतु या काळात धोनीने स्पॉट फिक्सिंगवर कधीही आपले मत मांडले नाही. पण Hotstar वर आता एक नवीन डोकमेन्ट्री येत आहे ज्याचं नाव आहे ‘रोअर ऑफ द लायन’. या डोकमेन्ट्री मध्ये तुम्हाला एम एस धोनी स्वतः दिसणार आहे. नुकत्याच रिलीझ झालेल्या या डोकमेन्ट्रीच्या प्रोमोमध्ये धोनी म्हणतो, ‘ मी एखाद्या वेळेस खून करेन पण स्पॉट फिक्सिंग नाही. स्पॉट फिक्सिंगमुळे आमचा पूर्ण संघ अडचणीत आला होता. माझ्यावर सुद्धा आरोप करण्यात आलेले. तो आमचा कठीण काळ होता. दोन वर्षांच्या बंदी नंतर परतताना तो क्षण भावनिक होता. पण मी नेहमी म्हणत आलोय, मी गोष्ट तुम्हाला मारू शकत नाही ती तुम्हाला आणखीन मजबूत बनवते, असे धोनी या डॉक्युमेंट्रीत बोलताना दिसत आहे.

dhoni, chennai super kings, roar of lion, hotstar, dhoni documentary, chennai super kings banned, spot fixing, ipl

हि डॉक्युमेंट्री येत्या २० मार्च पासून तुम्ही हॉटस्टार वर बघू शकता. लवकरच IPL सुद्धा सुरु होणार आहे आणि धोनी व चेन्नई सुपरकिंगचे चाहते मोठ्या उत्सुकतेने IPL सुरु होण्याची वाट बघत आहेत कारण त्यांच्या कॅप्टन कुल पुन्हा एकदा चेन्नई सुपरकिंग्जचे नेतृत्व करत मैदानात उतरणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.