fbpx

डिव्हिलियर्स, कोहली, धोनी नव्हे तर हा भारतीय बॅट्समन आहे आयपीएलमध्ये नंबर वन

२०-२० हा क्रिकेटचा फॉरमॅट सुरु झाला अन क्रिकेट विश्वच बदलून गेले. ह्याच फॉरमॅटवर आधारित इंडियन प्रीमियर लीग अर्थात आय पी एल ला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. साहजिकच ह्या आय पी एल स्पर्धांमध्ये प्रचंड पैसा बीसीसीआयला व खेळाडूंनाही मिळू लागला. भरपूर पैसे व ग्लॅमर देणाऱ्या ह्या स्पर्धेकडे जगभरातील दिग्गज क्रिकेटर आकर्षित झाले नसते तरच नवल. २०-२० फॉरमॅटमध्ये स्ट्राईक रेटला सर्वात जास्त महत्व असते. संथ खेळणाऱ्या फलंदाजाला इथे जागा नाही.

ipl 2019, ab develliers, chris gayle, virat kohli, suresh raine, ms dhoni, david warner, robin uthapa, gautam gambhir, ipl ranking, batman rankigs, ipl top batsman
IPL 2019 (DNA India)

जगभरातील स्फोटक फलंदाज ह्या स्पर्धेमध्ये सहभागी होतात व धावांचा रतीब घालतात. ए बी डिव्हिलिअर्स, ख्रिस गेलं, पोलार्ड असे एकाहून एक स्फोटक फलंदाज ह्या आय पी एल स्पर्धांमध्ये बघायला मिळतात. पण ह्या आयपीएल स्पर्धेमध्ये आजवरच्या सर्व सत्रांमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत प्रथम क्रमांकावर ना गेल आहे ना डिव्हिलियर्स ना आपला धोनी. मग कोण आहे प्रथम क्रमांकावर विराजमान ? कोण आहे ज्याने सार्वधिक धाव करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थान मिळवले. चला जाणून घेऊया सार्वधिक धावा करणाऱ्या टॉप १० फलंदाजांची नावे.

१०) ए बी डिव्हिलियर्स

१० व्या क्रमांकावर आहे, दक्षिण आफ्रिकेचा स्फोटक फलंदाज, जगातील क्रिकेट रसिकांचा आवडता फलंदाज ए बी डिव्हिलियर्स. ए बी डिव्हिलियर्सने १४१ सामने खेळले आहेत, त्यापैकी १२९ डावांत त्याने फलंदाजी केली आहे व १२९ डावांत मिळून ३९५३ धावा त्याने काढल्या आहेत ज्यात ३ शतकांचा व २८ अर्धशतकांचा समावेश आहे. आय पी एल मधील नाबाद १३३ धावा हि त्याची सर्वोच्च कामगिरी. ए बी डिव्हिलियर्स नुकताच आंतराष्ट्रीय क्रिकेटमधील तिन्ही फॉरमॅट्स मधून निवृत्त झाला आहे.

ipl 2019, ab develliers, chris gayle, virat kohli, suresh raine, ms dhoni, david warner, robin uthapa, gautam gambhir, ipl ranking, batman rankigs, ipl top batsman
Source – NDTV Sports

९) ख्रिस गेल

अनेक सत्रे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून गाजवल्यानंतर मागील सत्रापासून कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळण्यास प्रारंभ करणारा स्फोटक फलंदाज वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल ह्या यादीत ९ व्या क्रमांकावर आहे. रॉयल चॅलेंजर्स व किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळलेल्या ह्या स्फोटक फलंदाजाने ११२ सामन्यातील १११ डावांत मिळून तीन हजार ९९४ धावा केल्या असून, त्यात ६ शतके व २४ अर्धशतके समाविष्ट आहेत. त्याने आय पी एल मध्ये सर्वाधिक १७५ धावा करण्याचा विक्रमही नोंदवला आहे.

ipl 2019, ab develliers, chris gayle, virat kohli, suresh raine, ms dhoni, david warner, robin uthapa, gautam gambhir, ipl ranking, batman rankigs, ipl top batsman
Chris Gayle (Source – crictracker.com)

८) डेव्हिड वार्नर

३ शतके आणि ३६ अर्धशतकांसह ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वार्नर हा ८ व्या क्रमांकावर आहे. वार्नरने आय पी एलमध्यें ४ हजार १४ धावा केलेल्या असून, त्याची सर्वोच्च वयक्तिक धावसंख्या १२६ आहे. एका प्रकरणात एक वर्ष बंदीची शिक्षा भोगणाऱ्या वॉर्नरचा लवकरच ऑस्ट्रेलियाच्या संघात समावेश होणार आहे असे कळते. डेव्हिड वॉर्नरने सन रायजर्स हैद्राबादला आय पी एलचे विजेतेपदसुद्धा मिळवून दिले आहे. ह्या डावखुऱ्या फलंदाजाची शैली स्फोटक असून त्याचा स्ट्राईक रेटसुद्धा अतिशय चांगला आहे.

ipl 2019, ab develliers, chris gayle, virat kohli, suresh raine, ms dhoni, david warner, robin uthapa, gautam gambhir, ipl ranking, batman rankigs, ipl top batsman
David Warner (Source – thehindu.com)

७) महेंद्रसिंग धोनी

माही अर्थात सर्वांचा लाडका महेंद्रसिंग धोनी ह्या यादीत सातव्या क्रमांकावर आहे. काही सत्र वगळता महेंद्रसिंग धोनी आजपर्यंत चेन्नई सुपर किंग्जकडूनच खेळलेला आहे. आपल्या कर्णधारपदाच्या कारकिर्दीत त्याने भारतीय संघाला उज्वल यश मिळवून दिले आहे. तसेच त्याने चेन्नई सुपर किंग्जलासुद्धा अनेक आय पी एल सत्रांचे जेतेपद मिळवून दिले आहे. माहिने आजपर्यंत १५८ डावांत ४ हजार १६ धावा केल्या आहेत. नॉट आऊट ७९ हि त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे.

ipl 2019, ab develliers, chris gayle, virat kohli, suresh raine, ms dhoni, david warner, robin uthapa, gautam gambhir, ipl ranking, batman rankigs, ipl top batsman
M S Dhoni (Source – Hindustan Times)

६) शिखर धवन

भारताचा गब्बर अर्थात डावखुरा सलामीवीर शिखर धवन ह्या यादीत सहाव्या क्रमांकावर आहे. शिखरने १४३ सामने खेळले असून १४२ डावांमध्ये मिळून ४ हजार ५८ धावा केल्या आहेत. ह्यात ३२ अर्धशतकांचा समावेश आहे. शिखरची ९५ हि सर्वोच्च वयक्तिक धावसंख्या आहे. सन रायजर्स हैद्राबादचा शिखर धवन हा एक प्रमुख फलंदाज असून, डेव्हिड वार्नरसोबत तो हैद्राबादच्या डावाची सुरुवात करतो. विशेष म्हणजे शिखर धवन हा रोहित शर्मासोबत भारतीय संघात सलामीवीराची भूमिका पार पाडतो. रोहित शर्मा व शिखरची जोडी भारताच्या विजयात नेहमीच मोलाची भूमिका बजावते.

ipl 2019, ab develliers, chris gayle, virat kohli, suresh raine, ms dhoni, david warner, robin uthapa, gautam gambhir, ipl ranking, batman rankigs, ipl top batsman
Shikhar Dhawan (Source – NDTV Sports)

५) रॉबिन उथप्पा

अनेक सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलेला यष्टीरक्षक व आक्रमक फलंदाज रॉबिन उथप्पा ह्या यादीत पाचव्या क्रमांकावर असून, त्याने १६५ सामन्यांमध्ये ४ हजार ८६ धावा केल्या आहेत, ज्यात २३ अर्धशतकांचा समावेश आहे. उथप्पा गेले कित्येक दिवसांपासून आंतरराष्ट्रीय सामने खेळू शकला नाही. यष्टीरक्षक व उत्तम फलंदाज असलेला रॉबिन उथप्पा आपल्या कामगिरीमध्ये सातत्य न ठेवू शकल्यामुळे आज भारतीय संघात स्थान मिळवू शकलेला नाही. कोलकाता नाईट रायडर्सकडून अनेक हंगामांमध्ये खेळलेल्या उथप्पाने कोलकाता नाईट रायडर्स ह्या संघासाठी चांगले योगदान दिले आहे.

ipl 2019, ab develliers, chris gayle, virat kohli, suresh raine, ms dhoni, david warner, robin uthapa, gautam gambhir, ipl ranking, batman rankigs, ipl top batsman
Robin Utthapa (Source – DNA India)

४) गौतम गंभीर

दिल्ली व कोलकाता नाईट रायडर्स संघांकडून खेळलेला दिल्लीकर फलंदाज गौतम गंभीर ह्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. गौतमने नुकतीच सर्वप्रकारच्या फॉरमॅट्समधून निवृत्ती स्वीकारली आहे. विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात त्याने केलेल्या खेळीमुळे भारताला विश्वचषक जिंकता आला होता. गेले कित्येक मोसमात कोलकाता नाईट रायडर्सचे त्याने नेतृत्व केले होते. त्याने १५४ सामन्यात ४ हजार २१७ धावा केल्या आहेत. त्याने ३६ अर्धशतकं झळकावलेली आहेत. गौतम गंभीरला कोलकाताने ह्यावेळी खरेदी केले नव्हते त्यामुळे तो गत आय पी एल दिल्लीकडून खेळला पण तिथे तो विशेष प्रभाव पाडू शकला नाही.

ipl 2019, ab develliers, chris gayle, virat kohli, suresh raine, ms dhoni, david warner, robin uthapa, gautam gambhir, ipl ranking, batman rankigs, ipl top batsman
Gautam Gambhir (Source – DNA India)

३) रोहित शर्मा

भारताचा सलामीवीर मुंबईकर फलंदाज रोहित शर्मा ह्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने मुंबई इंडियन्सकडून खेळतांना, ४४९३ धावा कुटल्या आहेत. गेली अनेक सत्र रोहित शर्मा मुंबई इंडियन्सचा कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने प्रशंसनीय कामगिरी केली आहे. १०९ हि त्याची सर्वोच्च धावसंख्या असून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सार्वधिक षटकार खेचणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो लवकरच अव्वल स्थान मिळवेल असे दिसत आहे. आगामी विश्वचषकात रोहित शर्माचे फॉर्ममध्ये असणे भारतासाठी अत्यंत महत्वाचे आहे.

ipl 2019, ab develliers, chris gayle, virat kohli, suresh raine, ms dhoni, david warner, robin uthapa, gautam gambhir, ipl ranking, batman rankigs, ipl top batsman
Rohit Sharma (Source – Hindustan Times)

२) विराट कोहली

भारताचा कर्णधार व जगातील अव्वल फलंदाज विराट कोहली ह्या यादीत द्वितीय क्रमांकावर आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळत असलेला दिल्लीकर विराट कोहली एक आक्रमक कर्णधार असून त्याने रॉयल चॅलेंजर्सला चांगले यश मिळवून दिले आहे. भारतीय संघसुद्धा त्याच्या नेतृत्वाखाली चांगली कामगिरी करतोय. विराटने आय पी एलच्या १५५ डावांत मिळून ४ हजार ९४८ धावा केल्या असून त्यात ३४ अर्धशतकं व चार शतकांचा समावेश आहे. जगातील सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सचिन तेंडुलकर अव्वल क्रमांकावर आहे. खुद्द सचिनने सांगितले आहे कि त्याचा विक्रम जर कुणी तोडू शकत असेल तर तो केवळ विराट कोहलीच असेल.

ipl 2019, ab develliers, chris gayle, virat kohli, suresh raine, ms dhoni, david warner, robin uthapa, gautam gambhir, ipl ranking, batman rankigs, ipl top batsman

१) सुरेश रैना

२० – २० चा स्पेशलिस्ट असलेला सुरेश रैना हा ह्या यादीत अव्वल स्थानावर आहे. चेन्नई सुपरकिंग्जकडून खेळणाऱ्या सुरेश रैनाने आजपर्यंत १७२ आय पी एल सामन्यात ४ हजार ९८५ रन्स बनवले असून त्यात ३५ अर्धशतकांचा समावेश आहे. सुरेश रैनाने एक शतकही झळकाविले आहे. उत्तम क्षेत्ररक्षक असलेला सुरेश रैना सध्या भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी धडपडत आहे. मध्यंतरी काही सत्र तो गुजरात लायन्सकडून खेळाला होता. आयपीएलमधील सर्वाधिक सामने खेळणाऱ्या काही मोजक्या खेळाडूंमध्ये रैनाचा समावेश आहे.

ipl 2019, ab develliers, chris gayle, virat kohli, suresh raine, ms dhoni, david warner, robin uthapa, gautam gambhir, ipl ranking, batman rankigs, ipl top batsman
Suresh Raina (Source – espncricinfo.com)
No Fields Found.

Leave A Reply

Your email address will not be published.