fbpx

पुणेकरांनो…. कुणालाही मत देण्याअगोदर या गोष्टींचा एकदा जरूर विचार करा

गल्ली ते दिल्लीपर्यंत सत्ता देऊनही जर सामान्य पुणेकरांचे हाल होणार असतील तर त्यांनी विद्यमान सत्ताधाऱ्यांना पुन्हा मत का द्यावं असा प्रश्न नागरिक विचारू लागले आहेत.

२०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेमध्ये भारतात व महाराष्ट्रात भाजप – सेना युतीचे अनेक खासदार निवडून आले. महाराष्ट्रात लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणुकीतही महाराष्ट्राच्या जनतेने युती सरकारला कौल दिला. पुण्यातील मतदार राजाने तर गल्लीपासून दिल्लीपर्यंत, भाजपच्या पारड्यात मताचे भरभरून दान टाकले. पण त्या बदल्यात पुण्याला काय मिळाले ? पाणीकपात, वाहतुकीचा उडालेला बोजवारा, वाढलेली गुन्हेगारी, मोडकळीस व भंगारमध्ये टाकण्याजोग्या पीएमटीच्या बसेस ? पुणेकरांनी ह्यासाठी भाजपला मत नक्कीच दिलेले नव्हते.

भाजप सरकारने सत्तेत आल्याआल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मेट्रोचा प्रश्न निकाली काढावा अशी सर्वसामान्य पुणेकरांची अपेक्षा होती, पण भाजप सरकारने पुणे मेट्रोबाबत दुजाभाव केला व पुणे मेट्रोचे काम सुरु करण्यापूर्वी नागपूर मेट्रोचे काम चालू केले अशी लोकांमध्ये चर्चा आहे. आज नागपूर मेट्रोची यशस्वी चाचणी होऊन ती नागपूरकरांच्या सेवेत दाखल झाली आहे, पण पुणेकरांचं काय ? त्यांना अजून किती वाट पाहावी लागणार आहे ? अजून कितीकाळ त्यांना बसला लटकून, जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागणार ? बरं ज्या मेट्रोअभावी पुणेकर ज्या बसने प्रवास करतात, त्या पीएमटी बसेसची परिस्थितीसुद्धा किती दयनीय आहे हे वेगळं सांगायची गरज नाही.

pune, developement of pune, pune loksabha 2019, bjp, congress, pune smart city, problems in pune, pune metro, girish bapat, mohan joshi, pune mp, पुणे, पुणे लोकसभा २०१९, भाजपा, काँग्रेस, पुण्याचा विकास, पुणे मेट्रो, ट्राफिक, स्मार्ट सिटी, गिरीश बापट, मोहन जोशी
Pune PMPML (Source – HT)

रोज पीएमटी बसेसने प्रवास करतांना सामान्य पुणेकरांना कोणकोणत्या अडचणींना तोंड द्यावे लागते हे त्या पुणेकरांनाच माहित आहे. कारण सत्तेत असलेले सरकार व त्याच सरकारचे पुण्यातील प्रतिनिधी ह्यांना सामान्य पुणेकरांच्या समस्या जाणून घेण्यास वेळ नाही असेच दिसते आहे. मागील काही वर्षांपासून पुणेकर पाण्याच्या समस्येमुळे जितके हैराण आहेत तितके हैराण कधीच नसतील. पुण्यातील अनेक भागांत कमी दाबाने पाणी पुरवठा होतो ज्याबद्दल सत्ताधारी काहीच करत नाहीत. नळ स्टॉप परिसरातील एका भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची समस्या इतकी जास्त आहे कि तेथील संतप्त नागरिक मतदानावरच बहिष्कार टाकण्याचे विचार बोलून दाखवत आहेत.

हे सध्याच्या शासनकर्त्यांचे मोठे अपयश म्हणावे लागेल. गल्ली ते दिल्लीपर्यंत सत्ता देऊनही जर सामान्य पुणेकरांचे असे हाल होणार असतील तर त्यांनी विद्यमान सत्ताधाऱ्यांना पुन्हा मत का द्यावं असा प्रश्न नागरिक विचारू लागले आहेत. मोठा गाजावाजा करत केंद्रातील सरकारने स्मार्ट सिटी योजना चालू केली होती, भविष्यातील स्मार्ट सिटी बनविण्यासाठी केंद्र सरकारने पुण्याचीही निवड केली खरी, पण प्रत्यक्ष काम मात्र कोणतेच झाले नाही. स्वच्छ असणारे पुणे मागील काही काळामध्ये अजूनच अस्वच्छ बनले.

pune, developement of pune, pune loksabha 2019, bjp, congress, pune smart city, problems in pune, pune metro, girish bapat, mohan joshi, pune mp, पुणे, पुणे लोकसभा २०१९, भाजपा, काँग्रेस, पुण्याचा विकास, पुणे मेट्रो, ट्राफिक, स्मार्ट सिटी, गिरीश बापट, मोहन जोशी
(Source – indianexpress.com)

पुण्याचे शासनकर्ते ह्या नात्याने विद्यमान खासदार, आमदार ह्यांनी हे प्रश्न लोकसभेत व विधानसभेत मांडणे अपेक्षित असतांना विद्यमान खासदाराने कितीवेळा हे प्रश्न लोकसभेत मांडले होते हा हि एक चर्चेचा विषय आहे. पुण्याची लोकसंख्या झपाट्याने वाढत असतांना कमी पडत असलेल्या मूलभूत सुविधांसंबंधी विद्यमान खासदाराने कोणती पावले उचलली ह्याबद्दल एक डोळस पुणेकर जरूर प्रश्न विचारेल. शहरातील मुख्य रस्त्यांवर होणारी भयंकर वाहतूक कोंडी, त्यामुळे पुणेकरांना होत असलेला मनस्ताप ह्याविषयी मागील साडेचार वर्षात कोणतेही ठोस काम झालेले नजरेस पडत नाही.

भारतातील सर्वोत्तम शहरांपैकी एक असलेल्या पुण्यातील वाहतूक कोंडी आणि पुण्यातील पब्लिक ट्रान्स्पोर्टची दयनीय अवस्था ह्याविषयी इंग्रजी माध्यमांध्येही अनेकदा नकारात्मक बातम्या प्रसिद्ध झाल्या, ज्यामुळे विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे शहराच्या प्रतिष्ठेला गालबोट लागलेच, शिवाय झपाट्याने वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे पुण्याची अवस्था मुंबईसारखी होऊ शकते व त्यावर विद्यमान राज्यकर्त्यांनी कोणतीही उपाययोजना करण्याचा प्रयत्नदेखील केला नाही. राज्याचे जलसंपदामंत्री हे पुण्याचे असूनसुद्धा स्वतःच्याच शहरामध्ये पाणीपुरवठा व्यवस्थेचा उडालेला बोजवारा विद्यमान मंत्र्यांना दिसत नसेल का ? मग त्यावर त्यांनी कोणतीही उपाययोजना का केली नाही ? असे प्रश्न पुणेकर विचारेल व त्यात गैर काय ?

pune, developement of pune, pune loksabha 2019, bjp, congress, pune smart city, problems in pune, pune metro, girish bapat, mohan joshi, pune mp, पुणे, पुणे लोकसभा २०१९, भाजपा, काँग्रेस, पुण्याचा विकास, पुणे मेट्रो, ट्राफिक, स्मार्ट सिटी, गिरीश बापट, मोहन जोशी
(Source – The Indian Express)

सामान्य पुणेकरांना विश्वासात न घेता मनमानीपणे जी पाणीकपात राबवली गेली तो दोष कुणाचा ? जलसंपदा खाते व पुणे महानगरपालिकेतील समन्वयाअभावी पाणीपुरवठ्यातील चालत असलेला गोंधळ व त्याचा पुणेकरांना झालेला त्रास ह्याबद्दल जर पुण्याचे लोकप्रतिनिधी आवाज उठवणार नसतील तर त्यांना लोकसभेत पाठविण्याचा उपयोग काय असा प्रश्न सामान्य पुणेकरांच्या मनात आला तर त्यात काहीच चुकीचे नाही.

गेले कित्येक दशकांपासून प्रलंबित असलेली आणखीन एक मागणी म्हणजे पुण्यात आवश्यक असणारे उच्च न्यायालयाचे खंडपीठ. पुणे व कोल्हापूर इथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ होईल असे आश्वासन विद्यमान शासनकर्त्यांनी दिले, पण ते आश्वासन प्रत्यक्षात कधी उतरणार व पुण्याला हायकोर्टाचे खंडपीठ कधी होणार ह्या प्रश्नाचे उत्तर मात्र कुणीच देत नाही. पुणेकरांचे असे अनेक प्रश्न मार्गी लावण्यासाठी पुण्याला अश्या सक्षम, समंजस, संवेदनशील नेतृत्वाची गरज आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही व त्यासाठी योग्य नेतृत्व निवडण्याची संधी सर्वसामान्यांना ५ वर्षातून केवळ एकदाच येते.

Leave A Reply

Your email address will not be published.