fbpx

ही व्यक्ती भरवते उदयनराजे भोसलेंच्या मनात धडकी?

Source-Google

काही दिवसांपूर्वीच साताऱ्यात झालेल्या पत्रकार परिषदेत उदयनराजेंनी मी फक्त एकाच व्यक्तीला घाबरतो असं सांगितलं. आता सगळेच बुचकळ्यात पडले कि राजे नेमकं कुणाला घाबरतात हे माहीतच नव्हतं, उदयनराजेंच्या या वक्तव्यानं अनेकांना अगदी कोड्यात टाकलंय. आणि त्या वक्त्यव्यानंतर सगळ्यांनाच उत्सुकता लागलीय की राजेंच्या मनात धडकी भरवणारी ही व्यक्ती कोण आहे? तुमच्या पण मनात हाच प्रश्न आला असेलच?? बरोबर ना ?

साताऱ्याचे खासदार उदयनराजे कोणाला घाबरतील हे मुळात कुणाच्या स्वप्नात देखील येणार नाही पण खासदार साहेब अभिजित बिचकुले नावाच्या व्यक्तीलाच फक्त घाबरतात अशी माहिती आहे. आता पुन्हा प्रश्न आले असतील कोण आहे हा अभिजित बिचकुले??

#ताज्या बातम्या, जॉब संधी, मनोरंजन, लाईफस्टाईल टिप्स आणि बरंच काही अगदी मोफत तुमच्या व्हाट्सअँपवर, इन्फोबझ्झ जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

कोण आहे हा अभिजित बिचकुले??

भल्या भल्यांना शिंगावर घेणारे खासदार उदयनराजे भोसले ज्याला घाबरतात तो अभिजित बिचकुले नेमका कोण आहे हा प्रश्न आम्हाला पडला.अवघ्या सातारा मुलखात कवीमनाचे नेते म्हणून सुप्रसिद्ध असलेल्या AB अर्थात अभिजित बिचुकलेंपर्यंत आम्ही पोहोचलो. डॅशिंग अशा खासदार उदयनराजेंना अभिजित बिचकुलेंची भीती वाटण्याचं कारण म्हणजे त्यांनी आजवर भल्याभल्यांना दिलेलं आव्हान. लोकशाहीतली अशी कोणतीच निवडणूक नाही जिथे बिचकुलेंनी फॉर्म भरला नाही. नगरसेवक पदापासून ते चक्क देशाच्या राष्ट्रपतीपदासाठीसुद्धा त्यांनी प्रयत्नांची शर्थ केली. प्रसंगी मोदींनाही साकडं घातलं.

अर्थातच बिचकुलेंना कोणत्याही निवडणुकीत यश आलेले नाही हा भाग पूर्णपणे वेगळाच पण त्यांचे प्रयत्न अजूनही थांबले नाहीत. आता तर त्यांनी विधानसभेच्या 288 जागा लढवणार आणि 2019 चा मुख्यमंत्री मीच ठरवणार या त्यांच्या निर्धारपोस्टनं अनेकांच्या पोटात गोळा आणला असणार. या पठ्ठ््यानं या आधीही उदयनराजेना आव्हान दिलंय.

हे अभिजित बिचकुले महाशय फक्त निवडणुकाच लढवत नाहीत. तर कवी मनाच्या अभिजित यांनी गायनातही हात मारून पाहिलाय. त्यांनी केलेल्या स्वत:वरच्या त्यांच्या भन्नाट अल्बमने साताऱ्यात धुमाकूळ घातला होता.

नुकत्याच झालेल्या विधानपरिषदेच्या कडेगाव पलूसच्या निवडणुकीतही विश्वजित कदमांना बिचकुलेंनी यांनी आव्हान दिलं होतं पण काही वैयक्तिक कारणांनी ऐनवेळी एक पाऊल मागे घेतलं.साताऱ्याच्या राजकीय पटलावर कायम चर्चेत असणारं हे महत्त्वाकांक्षी अनोखं व्यक्तिमत्त्व उदयनराजेच्या वक्तव्यानं पुन्हा प्रसिद्धीच्या झोतात आलंय.

उदयनराजे, Udyanraje bhosale, Udyanraje, अभिजित बिचकुल, abhijeet bhichkule, खासदार उदयनराजे भोसले,
साताऱ्याचे खासदार उदयनराजे कोणाला घाबरतील हे मुळात कुणाच्या स्वप्नात देखील येणार नाही पण खासदार साहेब अभिजित बिचकुले नावाच्या व्यक्तीलाच फक्त घाबरतात अशी माहिती आहे.

No Fields Found.

Leave A Reply

Your email address will not be published.