fbpx

छत्रपती शिवाजी महाराजांचा तिसरा डोळा

Source-Google

फक्तवेशांतरच नाही तर समोरच्या माणसाच्या नकळत त्याच्या तोंडातून शब्द चोरण्याचं चातुर्य त्यांच्याकडे होते.ते विजापूरचा आदिलशहा आणि दिल्लीचा बादशहा ह्यांच्या महालात वेशांतर करुन जात व खुद्द अदिलशहा व बादशहा यांच्याकडून पक्की माहिती घेऊन येत.

शिवाजी महाराज म्हणजेच आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान.महाराजांनी आपल्यासाठी जे काही केलं आहे त्याची परतफेड आपण या काय कोणत्याच जन्मात करू शकत नाही.महाराजांनी जे स्वराज्य उभं केलं ते फक्त स्वतःच्या मेहनतीने आणि त्यांच्या सैन्याच्या साथीने.महाराजांच्या सैन्यातील पण महान लोकांबद्दल बोलायचं झालं तर त्यांचे पराक्रम ऐकून आजही ऊर अभिमानाने भरून येतो.महाराजांनी स्वराज्याचे व्यपस्थापन अतिशय चोखरीत्या चालावे यासाठी विविध खाते तयार करून त्या खात्यांना प्रमुख नेमले होते.आज आपण या लेखातून शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत.

गुप्तहेर म्हणजे अशी व्यक्ती जी गुप्तपणे कोणालाही संशय न येऊ देता आपली कामगिरी चोख बजावून आपल्याला गुप्त आणि सत्य वार्ता देते.हे काम वरकरणी जरी सोपं वाटत असलं तरी ते सोपं नाही.त्यासाठी अंगात नकळतपणे समोरील व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे चोख हेरता आले पाहिजे.आणि याच कामासाठी शिवाजी महाराजांना गरज होती अशाच एका कुशल व्यक्तीची जी सर्व गुप्त बातम्या पुरवून आपल्या स्वराज्याचे नुकसान होण्यापासून वाचवू शकेल.आणि याच शोधात असताना महाराजांना मिळाला बहिर्जी नाईक यांच्यासारखा कोहिनुर हिरा.बहुरूपी असलेले बहिर्जी नाईक वेष बदलून नक्कल करण्यात अतिशय पारंगत.एकदा महाराज मोहिमेवर असताना त्यांनी बहुरूपी आणि कर्तबगार आशा बहिर्जी नाईक यांना नकला करताना बघितले आणि त्यांच्यातील कसब बघून लगेचच राजांनी त्यांची नियुक्ती आपल्या गुप्तहेर खात्याच्या प्रमुख पदी केली.

म्हणून छत्रपती शिवराय यांनी परकीय चलन हद्दपार करून आपले चलन स्थापन केले.

बहिर्जी नाईक गुप्तहेर प्रमुख पदावर रुजू होताच त्यांनी अगदी जोमाने कामाला सुरुवात केली.बहिर्जी खुद्द विजापूरचा आदिलशहा आणि दिल्लीचा बादशाह यांच्या महालात कधी फकीर तर कधी कोळी तर कधी संत बनून जात आणि त्यांच्या मनातील गुप्त बातमी काढून ती राजांना देत. शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्यात हजारो लोक होते जे बहिर्जी यांच्या हाताखाली पारंगत झाले.बहिर्जी नाईकांनी त्यांच्या गुप्तहेरांसाठी एक वेगळी भाषा म्हणजेच आताच्या जमान्यात आपण ज्याला कोड लँग्वेज बोलतो ती तयार केली होती.ही भाषा फक्त बहिर्जी नाईक आणि त्यांच्या गुप्तहेरांनाच कळत असे.

बहिर्जी हे सर्वगुणसंपन्न असे व्यक्तिमत्व होते.ते जसे हेरगिरीत पारंगत तसेच ते तलवरबाजी आणि दांडपट्टातदेखील अतिशय पारंगत होते.शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील प्रत्येक छोट्या मोठ्या घटनेत बहिर्जी नाईक आपली कामगिरी नम्रपणे आणि चोख बजावत.अफजलखानाचा वध, पन्हाळ्यातून सुटका, शाहिस्तेखानाची बोटे मोडणे अशा मोठमोठ्या कामगिरीत बहिर्जी नाईकांच्या सिंहाचा वाटा होता. शिवाजी महाराजदेखील बहिर्जी यांना खुप मानत असत आणि त्यांच्या सल्ल्यानेच प्रत्येक कामगिरीला सुरवात करत असत.असा आपला जाणता राजा आणि आपल्या जाणत्या राजाचे सैन्य ज्यामुळे स्वराज्य उभे राहिले या सर्वांना मनापासून दंडवत.

बहिर्जी हे सर्वगुणसंपन्न असे व्यक्तिमत्व होते.ते जसे हेरगिरीत पारंगत तसेच ते तलवरबाजी आणि दांडपट्टातदेखील अतिशय पारंगत होते.शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील प्रत्येक छोट्या मोठ्या घटनेत बहिर्जी नाईक आपली कामगिरी नम्रपणे आणि चोख बजावत.अफजलखानाचा वध, पन्हाळ्यातून सुटका, शाहिस्तेखानाची बोटे मोडणे अशा मोठमोठ्या कामगिरीत बहिर्जी नाईकांच्या सिंहाचा वाटा होता.शिवाजी महाराजदेखील बहिर्जी नाईक यांना खुप मानत असत आणि त्यांच्या सल्ल्यानेच प्रत्येक कामगिरीला सुरवात करत असत.असा आपला जाणता राजा आणि आपल्या जाणत्या राजाचे सैन्य ज्यामुळे स्वराज्य उभे राहिले या सर्वांना मनापासून दंडवत.


Leave A Reply

Your email address will not be published.