fbpx

छत्रपती शिवरायांच्या जीवनातील धडे, जे तुमचे आयुष्य बदलून टाकतील

Image Source - Google

इन्फोबझ्झ वरील विविध लेखांचे आणि ताज्या बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला Facebook , Instagram आणि Twitter वर फॉलो करा.


“आज साडेतीनशे वर्षे झाली, कित्येक राजे होऊन गेले पण आज तुमच्या आमच्या स्मरणात फक्त एकच राजे राहिले ते म्हणजे आपला छत्रपती शिवाजीराजे. वयाच्या सोळाव्या वर्षी स्वराज्य निर्माण करण्याची शपथ घेतल्यापासून आयुष्यभर छत्रपती शिवराय यांनी प्रत्येक क्षण रामराज्य निर्माण करण्यासाठी घालवला. भारतासह महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या जीवनातील धडे, जे तुमचे आयुष्य बदलून टाकतील.”

जगात ३३ कोटी देव असताना पण कित्येक लोक एका ठराविक देवापुढेच नतमस्तक होताना दिसतात पण आपल्या सर्वांचे एक असे दैवत आहे ज्याचं नाव ऐकताच आपण सर्व नतमस्तक होतो, ते म्हणजे आपले छत्रपती शिवराय. ज्या महाराष्ट्रात शिवाजी महाराजांचे विचार, त्यांचे शौर्य, जिजाऊंचे संस्कार, शंभूराजांचे बलिदान आहे त्या राज्यात मी राहते याचा मला नुसता अभिमानच नाही तर गर्व आहे.

Image Source – वेबदुनिया

छत्रपती शिवरायांचा जन्म

छत्रपती शिवराय यांच्या जन्माच्या आधी कर्नाटकमध्ये एक मदमस्त हत्ती पिसाळला होता. त्याला रोखण्यासाठी तेव्हा दोन तुकड्या करण्यात आल्या. एक म्हणजे जाधव आणि दुसरे म्हणजे भोसले. जाधवांच्या तुकडीचे सेनापती होते दत्तोजी जाधव आणि भोसल्यांच्या तुकडीचे सेनापती होते संभाजी भोसले. पण या तुकड्या करूनही हत्ती राहिला बाजूला आणि भोसले व जाधव एकमेकांवर वार करून मारले गेले. भोसल्यांकडील लोक संभाजी भोसलेंसाठी रडत होते तर जाधवांकडील लोक दत्तोजी जाधवांसाठी रडत होते. पण त्या सर्वांत एकच अशी खंबीर स्त्री होती तिला कळत नव्हते कि तिने कोणासाठी रडावे. गेलेल्यापैकी एक त्या माऊलीचा भाऊ तर दुसरा तिचा दीर. कोणी भोसलेंसाठी रडले कोणी जाधवांसाठी रडले पण तेव्हा हि जिजाऊ माऊली रडली ते आपल्या नादान महाराष्ट्रासाठी.

आऊसाहेबांनी तडक जाऊन शिवाई देवीला प्रार्थना केली कि या नादान महाराष्ट्राला घडवण्यासाठी, कष्टकऱ्यांचा उद्धार करण्यासाठी मला एक पुत्र दे आणि मग दगडालाही पाझर फुटला, विजांचा लखलखाट झाला आणि शिवनेरीवर माझा शिवबा जन्माला आला.

स्वराज्याची सुरवात

Image Source – Pinterest

आज साडेतीनशे वर्षे झाली, कित्येक राजे होऊन गेले पण आज तुमच्या आमच्या समरणात फक्त एकच राजा राहिला तो म्हणजे आपला छत्रपती शिवाजी राजा. काय केलं नाही या राजानी आपल्यासाठी, स्वराज्य म्हणजे स्वतःच राज्य त्यांनी निर्माण केलं.पण हे स्वराज्य फक्त त्यांचंच नव्हतं.तर जो कोणी या मातीत जन्माला येईल, इथे राहील त्यानी स्वराज्य शब्दाचा उच्चार केला तर ते राज्य म्हणजे त्याचं स्वतःच राज्य असं त्याला वाटेल.आणि तो त्याच्या या स्वराज्यासाठी लढले, झगडेल आणि शिवरायांच्या सैन्यात सामील होईल.

एकेक करत सर्वांच्याच मनात हि भावना रुजू लागली आणि एकेक जण छत्रपती शिवराय यांच्या सैन्यात दाखल होऊ लागला. ६ जून १६७४ रोजी बत्तीस मुळांच्या सोन्याच्या सिहासनावर रूढ होऊन रायगडावर राज्याभिषेक होऊन आपले राजे छत्रपती राजे झाले.

असा झाला होता छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक !
असा झाला होता छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक !

आज आपल्याला छत्रपती शिवराय यांचा इतिहास किती माहित आहे ? आपल्याला महाराष्ट्र सरकारने चौथीला शिवरायांचं पुस्तक दिलं. महाराजांनी शाहिस्तेखानाची बोटं कापली, अफझल खानाचा कोथळा बाहेर काढला हे आम्हाला सांगितलं पण त्यांनी हे करताना काय मॅनेजमेंट केली ती आम्हाला कोणी सांगितलीच नाही.

अफझल खान महाराष्ट्रावर साठ हजार सैन्यासह चालून आला होता. पण जेव्हा तो प्रतापगडाच्या पायथ्याशी पोचला तेव्हा त्याच्या सोबत फक्त दोन हजार जणांचे सैन्य होते. अफझल खानला त्याचे निम्म्याहून अधिक सैन्य कोल्हापूरला ठेवावे लागले होते.

“आम्ही शिवाजी महाराजांची युद्धनीती वापरली म्हणून आमचा देश लहान असूनही अमेरिकेविरुद्ध एवढे मोठे युद्ध जिंकला.

  – व्हिएतनामचे राष्ट्रपती

Image Source – simple.wikipedia.org

छत्रपती शिवराय यांनी अफझल खानला भेटण्याची वेळ १२ वाजुज ३५ मिनिटांची ठरवली होती. कारण १२ वाजून ३५ मिनिटांनी सूर्य डोक्यावर असतो.अफझल खान शिवरायांपेक्षा उंचीने खूप मोठा होता.त्यामुळे अफझल खान जेव्हा शिवरायांकडे बघेल तेव्हा त्याच्या डोळ्यात सूर्याची किरणे जातील आणि त्याच वेळेचा फायदा घेऊन शिवाजी महाराज त्याच्यावर हल्ला करतील इतकी मोठी मॅनेजमेंट महाराजांनी त्यावेळी केली होती.पण आम्हाला कोणी ती सांगितलीच नाही.

छत्रपती शिवराय प्रतापगडावर अफझल खानला भेटायला गेले तेव्हा त्यांनी वधाच्या वेळी आपल्या सोबत नेण्याकरिता जिवा महालाला निवडले. शिवराय प्रतापगडाच्या पायथ्याशी आले तेव्हा अफझल खान मोठयाने बोलला, “आओ शिवाजी आओ, हमारे गले लग जाओ. “शिवरायांनी आत प्रवेश करताच त्याने महाराजांना आलिंगन दिले. पण त्याने दगा केला, खंजीर काढून त्याने ते महाराजांच्या पाठीत खुपसले.

Image Source – archerindia.com

पण त्याचा वार असफल ठरला कारण महाराजांनी चिलखत घातले होते.शिवाजी महाराजांनी क्षणातच अफझल खानाचा कोथळा बाहेर काढला हे बघून सय्यद बंडा पुढे आला पण जिवामहालाने आपल्या दानपट्ट्याने सय्यद बंडाचा हात कापून टाकला आणि अर्थातच होता जिवा म्हणून वाचला शिवा. हि गोष्ट आम्हाला पुस्तकात कधी वाचायलाच मिळाली नाही. आम्हाला पुस्तकात शिवाजी महाराजानी शाहिस्तेखानाची तीन बोटे कापली असे सांगितले पण त्याच्या पुढचा इतिहास आम्हाला कोणी का नाही सांगितला ?

शिवाजी महाराज शाहिस्तेखानाची बोटं कापून तिथून निघून गेले तेव्हा शाहिस्तेखानाची बहीण धावत येऊन त्याला बोलली, “भाईजान, भाईजान हमारी बेटी कही नजर नही आ रही, जरूर शिवाजी उसे उठा ले गया.”

तेव्हा शाहिस्तेखान बोलला, “शिवाजी किसिको मार सकता हैं, किसिकी उंगलिया काट सकता हैं…पर किसिकी माँ बेहेन के इज्जत पे हाथ नही डाल सकता.”याला बोलतात विश्वास जो महाराज्यांच्या दुश्मनाला देखील महाराजांवर होता.

Image Source – Intrepid Travel

जेव्हा व्हिएतनाम सारखा देश महाराजांपासून प्रेरणा घेता

जेव्हा व्हिएतनाम सारख्या छोट्या देशात आणि अमेरिकेसारख्या भल्यामोठ्या देशांदरम्यान सुमारे २५ वर्षे युद्ध चालू होतं तेव्हा ते युद्ध व्हिएतनामसारख्या छोट्या देशाने जिंकलं. तेव्हा पत्रकार परिषदेत तेव्हाच्या तिथल्या राष्ट्रपतींना युद्ध जिंकण्याचे रहस्य विचारण्यात आले तेव्हा ते बोलले, “We follow the rules of Shivaji… therefore we won the war”.

परदेशाला आपले शिवाजी महाराज समजले पण आम्हाला समजले नाहीत ते आम्हाला पुस्तकातून दिलेल्या तोकड्या ज्ञानामुळे.मुंबईवर जेव्हा २६-११ चा हल्ला झाला तेव्हा मीडियाने बऱ्याच लोकांना विचारलं कि आज महाराज असते तर त्यांनी कसाबचं काय केलं असतं?काही लोक बोलले महाराजांनी कसाबला उभं चिरलं असतं तर काही लोक बोलले महाराजानी कसाबचं मुंडकं छाटलं असतं. पण मला असं वाटतं कि तेव्हा जर आपले महाराज असते तर कसाब भारतात आलाच नसता.


छत्रपती शिवाजी महाराजांचा तिसरा डोळा गुप्तहेर बहिर्जी नाईक


Chhatrapati Shivaji Maharaj (Source – Free Press Journal)

महाराजांची दुरदृष्टी

आमचा राजा साडेतीनशे वर्षांपूर्वी आरमाराची उभारणी करून सांगतो कि महाराष्ट्राला फक्त जमिनीवरूनच नव्हे तर पाण्यातून देखील देखील धोका आहे. पण आज आम्ही ते विसरलो कारण आमच्यापैकी कित्येक जणांनी शिवचरित्र वाचलेच नाही. जर आज आपल्या सरकारसोबत आपल्या सर्वांना शिवचरित्र समजले असते तर २६-११ झालाच नसता.

कर्मवीर भाऊराव पाटलांनी रयत शिक्षण संस्था काढून त्या संस्थेला शिवाजी महाराजांचे नाव दिले. भाऊरावांनी जेव्हा हि संस्था काढली तेव्हा त्यांना संस्थेसाठी पैशांची गरज होती.

त्यावेळी एका व्यापाऱ्याने त्यांना एक लाख रुपये देऊ केले आणि त्यांच्या पुढ्यात एक अट टाकली. ती अट म्हणजे संस्थेला छत्रपती शिवराय यांचे नाव द्यायचे नाही. तेव्हा भाऊरावांनी ते एक लाख रुपये त्या व्यापाऱ्याच्या तोंडावर फेकले आणि बोलले कि एकवेळ मी माझ्या बापाचं नाव बदलेल पण महाराजांचे नाव बदलणार नाही.

आज आपल्या महाराष्ट्रात जातीयवाद वाढला. आज आपण शिवजयंती साजरी करतो पण शिवाजी कधी समजून घेतच नाही. शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले ते बारा बलुतेदार सोबत घेऊनच. जर आपल्या राजानी कधी जात बघितली नाही तर आपण का जातीच्या मागे पळतो. हा जातीयवाद, बलात्कार आणि समाजातील इतर विकृत प्रवृत्तींवर आळा घालण्यासाठी आज परत आपल्याला गरज आहे आपल्या शिवबाची.आणि तो शिवबा आपल्यालाच घडवावा लागणार आहे.हे सर्व करण्यासाठी, शिवबा घडवण्यासाठी आपल्याला शिवचरित्र वाचून ते समजून घ्यावे लागेल. तेव्हा विनंती करते कि प्रत्येकानी शिवचरित्र वाचून ते समजून घ्या आणि पुन्हा एकदा महाराजांचा वारसा पुढे चालवत स्वराज्य स्थापन करा.

!!जय जिजाऊ !! जय शिवराय!!

1 Comment
  1. अमर शिवाजी तोरस्कर says

    लेख आवडला.
    पण एक खंत आहे,जो बोलतो,लिहतो तो राजे यांचा
    उल्लेख छत्रपती शिवाजी महाराज अ सा करतो.तसा न करता “छत्रपती श्री शिवाजी महाराज “असा करावा.
    हि नम्र विनंती आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.