fbpx

जगातील सर्वात आदर्श समजली जाणारी शिवाजी महाराजांची न्यायव्यवस्था

छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा आणि अभिवादन. आपण मागील महिन्यातच म्हणजेच, १९ फेब्रुवारी २१०९ ला महाराजांची 389 वी जयंती साजरी केली आहे. शिवजयंती आपण दरवर्षी एखाद्या सनाप्रमाणे साजरी करतो. महाराजांबद्दल आजपर्यंत भरपुर लिखाण झालंय. महाराजांचं व्यक्तिमत्त्व हे सातासमुद्रापार पोहोचलेले आहे. जगाने त्यांची तुलना ज्युलियस सीझर, हनी बॉल यासारख्या योध्यांशी केली आहे. पण तरीही मला वाटते कि ज्युलियस सीझर व इतर योध्यांपेक्षा महाराजांचं कर्तृत्व मोठं आहे.

महाराज हे सह्याद्रीच्या कड्याकपारीमध्ये लढले. कुणाचंही साह्य नसताना लढले. शिवाजी महाराजांनी स्वतः आपली वेगळी अशी युद्धनीती निर्माण केली. ज्याला इंलिश मध्ये “Gorilla war” म्हटलं जातं. या युद्धतंत्राचे निर्माते छत्रपती शिवाजी महाराज आहेत. या नीतीचा वापर आधुनिक काळात, 350 वर्षानंतर सुद्धा व्हिएतनाम सारख्या छोट्या राष्ट्राने केला व अमेरिकेसारख्या मोठ्या देशालाही हरवले. महाराजांविषयी भरपूर लिखाण उपलब्ध आहे. पण तरीही पुरव्याला धरून केले गेलेले लिखाण पाहिजे तेवढ्या प्रमाणात उपलब्ध नाही. खरे शिवाजी महाराज हे त्यांनी लिहलेल्या पत्रात, फर्मानात, इंग्रज, पोर्तुगीज यांच्याशी केलेल्या पत्रव्यवहारात मला दिसतात. छत्रपती शिवरायांच्या पावलावर पाऊल ठेवत तो बनला जगातील सर्वश्रेष्ठ सेनापती

शिवाजी महाराजांची न्यायव्यवस्था, shivaji maharaj photos, shivaji maharaj information, shivaji maharaj story, shivaji maharaj in marathi, shivaji maharaj history, chhatrapati shivaji maharaj, shivaji maharaj history in marath, shivaji maharaj story, shivaji maharaj biography, shivaji maharaj mahiti, shivaji the great guerrilla, shivaji maharaj war tactics, ganimi kava, शिवाजी महाराज माहिती, शिवाजी महाराज गनिमी कावा, शिवाजी महाराज इतिहास, शिवाजी महाराज फोटो, judiciary system of shivaji maharaj
Shivaji Maharaj (Source – newsmobile.in)

सध्यातरी महाराजांची खूप कमी पत्रे उपलब्ध आहेत. त्यांची नक्कल पत्रे आणि अस्सल पत्रे मिळून साधारणपणे 200 ते 250 पत्रं उपलब्ध आहेत. त्यांची काही पत्रे आणि फर्माने खरंच विचार करायला लावणारी आहेत. महाराजांनी स्वतः लिहून घेतलेली अस्सल अशी थोडीच पत्रे आहेत ज्यात महाराज स्वतः बोलत आहेत किंवा आदेश देत आहेत. त्यातील एक पत्र आपल्या सर्वांच्या परिचयाचं आहे, ते म्हणजे रांझ ह्या गावच्या पाटलाचा महाराजांनी चौरंगा करण्यासंबंधी दिलेल्या आदेशाचं पत्र.

रांझच्या पाटलाचा महाराजांनी चौरंगा करविला होता. म्हणजे त्याचे दोन्ही हात आणि पाय तोडले होते. हे पत्र मी वाचलं आहे, त्यामूळे याचं पूर्ण विश्लेषण करावं अस मला वाटलं. हे पत्र आजही उपलब्ध आहे. हे पत्र महाराजांनी 28 एप्रिल 1646 साली लिहलेले आहे. याला “खुर्दखत” म्हणतात. म्हणजेच, सरकारी आदेश. या पत्रात लिहिलंय की बाबाजी बिन भिकाजी गुजर हा रांझ्याचा मोकदमी म्हणजे पाटील होता. “बिन” याचा अर्थ वडिलांचे असा होतो. या बाबाजी बिन भिकाजी गुजराची मोकादमी म्हणजे पाटीलकी महाराजांनी जप्त केली होती.

शिवाजी महाराजांची न्यायव्यवस्था, shivaji maharaj photos, shivaji maharaj information, shivaji maharaj story, shivaji maharaj in marathi, shivaji maharaj history, chhatrapati shivaji maharaj, shivaji maharaj history in marath, shivaji maharaj story, shivaji maharaj biography, shivaji maharaj mahiti, shivaji the great guerrilla, shivaji maharaj war tactics, ganimi kava, शिवाजी महाराज माहिती, शिवाजी महाराज गनिमी कावा, शिवाजी महाराज इतिहास, शिवाजी महाराज फोटो, judiciary system of shivaji maharaj
खुर्दखत (Source – sakhiradnye.in)

पत्रात अस म्हटलंय की याने बदअमल केला. बदअमल याचा अर्थ बलात्कार असा होत नाही, तर स्त्रीच्या संमतीने केलेला व्यभिचार असा होतो. जेव्हा ही बाब महाराजांना कळली, तेव्हा त्याला बोलवून त्याचा चौरंग केला गेला आणि त्याला त्याचा नातेवाईक सोनाजी बिन बनाजी गुजर ह्यांच्याकडे सोपवण्यात आले. याच सोनाजी बिन बनाजी गुजरने 200 होन एवढी रक्कम गुन्हगार ठरलेल्या, पाटलाला शिक्षा झाल्यावर सरकारी तिजोरीत जमा केली होती, तसेच त्याने महाराजांना विनंती केली की, ही मोकदमी माझ्या नावे करा.

कारण या पहिल्या पाटलाला म्हणजेच बाबाजी भिकाजी गुजर ह्याला कुणीही मुलबाळ नाही, आणि त्याची सर्व जबाबदारी मलाच सांभाळावी लागेल. हा उल्लेख पत्रात उपलब्ध आहे. यालाच दुमला करणे असं म्हणतात. यासाठी 300 होन या सोनाजी बिन बनाजी गुजरकडून घेण्यात आले. त्याकाळी कुणी गुन्हा केला तरी सरकारी तिजोरीत एक ठराविक रक्कम भरावी लागत असे, आणि माफी मिळाली तरी सरकारी तिजोरीत “शेरणी” भरावी लागे. शेरनीचा अर्थ “शिरीन” म्हणजेच गोड असा होतो.

शिवाजी महाराजांची न्यायव्यवस्था, shivaji maharaj photos, shivaji maharaj information, shivaji maharaj story, shivaji maharaj in marathi, shivaji maharaj history, chhatrapati shivaji maharaj, shivaji maharaj history in marath, shivaji maharaj story, shivaji maharaj biography, shivaji maharaj mahiti, shivaji the great guerrilla, shivaji maharaj war tactics, ganimi kava, शिवाजी महाराज माहिती, शिवाजी महाराज गनिमी कावा, शिवाजी महाराज इतिहास, शिवाजी महाराज फोटो, judiciary system of shivaji maharaj
(Source – Stars Unfolded)

या शेरणीचा उल्लेख पत्रात आहे. शिवकाळात ही मुकादमी दुसऱ्याला विकायची पद्धत होती.अर्धी मुकादमी विकण्याची पद्धत होती व यासंबंधीचे उल्लेख महाराजांच्या बऱ्याच पत्रात आहेत. “रांझ” हे गाव पुरंदर किल्याच्या अमलाखाली होते. हे पत्र म्हणजे खुर्दखत आहे, ज्यात मुकादमी एक व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे दिल्याचा आदेश आहे. महाराजांच्या अनेक पत्रात “दुमला करणे” असा उल्लेख आहे. दुमला याचा अर्थ नूतनीकरण असा होतो. पत्राची सुरुवात “आजरक्तखाने” राजश्री शिवाजी राजे अशी होत असते.

याचा अर्थ “आज” म्हणजे पासुन आणि “रक्तखाने” म्हणजे कचेरी आणि ज्याला लिहायचे आहे त्याला “बजानेप” अस लिहिलेलं असे. याचा अर्थ इंलिशमध्ये “TO” असा होतो. या रांझच्या गुजर पाटलाला महाराजांनी अवघ्या 16 व्या वर्षी शिक्षा ठोठावली होती. मोसे खोऱ्यातील एका व्यक्तीने असाच बदअमल केला होता, ज्याचं नाव होत रंगो त्रिमल. रंगो त्रिमलने बदअमल केला पण त्यानंतर तो खूपच घाबरला, आणि त्याला वाटायला लागले की शिवाजी महाराज आपला पण चौरंग करतील, म्हणून तो घाबरून चंदर राइत पळाला.

शिवाजी महाराजांची न्यायव्यवस्था, shivaji maharaj photos, shivaji maharaj information, shivaji maharaj story, shivaji maharaj in marathi, shivaji maharaj history, chhatrapati shivaji maharaj, shivaji maharaj history in marath, shivaji maharaj story, shivaji maharaj biography, shivaji maharaj mahiti, shivaji the great guerrilla, shivaji maharaj war tactics, ganimi kava, शिवाजी महाराज माहिती, शिवाजी महाराज गनिमी कावा, शिवाजी महाराज इतिहास, शिवाजी महाराज फोटो, judiciary system of shivaji maharaj
(Source – Awaaz Nation)

“चंदर राई” म्हणजे चंद्रराव मोरेच्या “जावळी” प्रदेशात पळून गेला. पण तिथेसुद्धा तो खूप घाबरून गेला होता, आणि त्यातच त्याचा घाबरून मृत्यू झाला. शिवाजी महाराजांचा एवढा दरारा होता. न्याय हा लगेच व्हायचा आणि शिक्षा सुद्धा लगेच. न्यायव्यवस्था कशी असावी याचं उत्तम उदाहरण महाराजांनी घालून दिलं आहे. त्याकाळी खोट्या शपथा घेण्याचे प्रकार नव्हते. निकाल म्हणजे मजहरनामा द्यायच्या अगोदर दिव्य पार पाडावी लागत असत. यामध्ये तीन प्रकारची दिव्यं होती.

एक “शीतल दिव्य”, ज्यात कृष्णेच्या पात्रात उभे राहून कृष्णा नदीची शपथ घ्यावी लागत असे. दुसरे दिव्य म्हणजे “तप्त दिव्य” ज्यामध्ये हातावर वडाचं पान ठेवून त्यावर लोखंडाचा तप्त लाल गोळा हातावर ठेवला जात असे. तिसरं “रवा दिव्य” ज्यात अर्धा शेर तेल आणि अर्धा शेर तूप उकळवून त्यात सोनं टाकलं जाई, आणि ते हाताने झटकन काढले जात असे. या सगळयात हाताला फोड वगैरे येऊ नये, कारण जर फोड आला, तर तुम्ही खोटे आहात असे समजले जाई. या सगळ्या कारणामुळे माणूस खोटं बोलत नसे. महाराजांच्या काळात या सगळ्या व्यवस्था अगदी मजबूत होत्या आणि त्या अस्तित्वात होत्या.

शिवाजी महाराजांची न्यायव्यवस्था, shivaji maharaj photos, shivaji maharaj information, shivaji maharaj story, shivaji maharaj in marathi, shivaji maharaj history, chhatrapati shivaji maharaj, shivaji maharaj history in marath, shivaji maharaj story, shivaji maharaj biography, shivaji maharaj mahiti, shivaji the great guerrilla, shivaji maharaj war tactics, ganimi kava, शिवाजी महाराज माहिती, शिवाजी महाराज गनिमी कावा, शिवाजी महाराज इतिहास, शिवाजी महाराज फोटो, judiciary system of shivaji maharaj
(Source – artstation.com)
No Fields Found.

Leave A Reply

Your email address will not be published.