fbpx

विद्यार्थ्यांना शिवाजी महाराजांची युद्धनीती शिकवणारे हे देशातील पहिले विद्यापीठ

महाराष्ट्रचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण आपल्यासाठी प्रेरणादायी आहे. शिवराय जगातील एकमेव राज्यकर्ते आहेत ज्यांनी जनतेसाठी राज्याची निर्मिती केली होती आणि म्हणूनच त्याला स्वराज्य म्हणून ओळखले जाई. हिंदवी स्वराजाच्या जडण घडणीमध्ये अनेक प्रसंग आहेत ज्यामधून आपल्याला शिवरायांच्या अनेक गुणांचा आणि निर्णय क्षमतांचा अंदाज येतो.

जगभरात छत्रपती शिवराय सगळ्यात जास्त फेमस आहेत ते त्यांच्या गनिमी कावा युध्य कौशल्यासाठी. महाराजांनी याच गनिमी कावाच्या जोरावर भल्याभल्याना चितपट केले आहे. आपल्याला आश्चर्य वाटेल पण जगभरातील अनेक संशोधक अजूनही त्यांच्या आग्रा मधून सुटकेच्या प्रसंगावर संशोधन करत आहेत, आजही अनेकांनी ठोस असं उत्तर देतात येत नाही कि महाराज नेमकं कश्याप्रकारे चकवा देऊन रायगडावर पोहोचले.

शिवाजी महाराजांची युद्धनीती. छत्रपती शिवाजी महाराज, महाराष्ट्रचं आराध्य दैवत, छत्रपती शिवराय, Chatrapati Shivaji Maharaj, Chatrapati Shivray, ganimi kawa, गनिमी कावा, Shivaji Maharaj History
Image Source – scroll.in

महाराष्ट्रात महाराजांच्या इतिहास हा रक्तातच असतो त्याला वेगळे असं शिकवाव लागत नाही. पण महाराजच्या विविध कौशल्यावर एखाद्या विठ्यापीठात आभासक्रम असण्याची आता पहिलीच वेळ आहे. कोल्हापूर मधील “शिवाजी विद्यापीठाच्या” व्यवस्थापनांनी “शिवाजी द मॅनेजमेंट गुरु” या शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीवर आधारित अभ्यासक्रम रचला आहे. आणि “शिवाजी विद्यापीठ”हे देशातील एकमेव विद्यापीठ आहे, जिथे असा अनोखा अभ्यासक्रम सुरु केला जात आहे.

४०० वर्षांपूर्वी शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्यासाठी जी राजनीती, युद्धनीती, गनिमी कावे,व्यवस्थापन, नेतृत्त्वगुण, संघटन कौशल्य इत्यादी गोष्टींचा या अभ्यासक्रमामध्ये समावेश असणार आहे. यामुळेच मराठी भाषिकांसोबतच जगभरातील विद्यर्थ्यांना आता छत्रपती शिवाजी महाराजच्या बद्दल अधिक योग्य प्रकारे संशोधन करता येणार आहे.

शिवाजी महाराजांची युद्धनीती. छत्रपती शिवाजी महाराज, महाराष्ट्रचं आराध्य दैवत, छत्रपती शिवराय, Chatrapati Shivaji Maharaj, Chatrapati Shivray, ganimi kawa, गनिमी कावा, Shivaji Maharaj History
Image Source – FreeImages.com

शिवाजी महाराजांचा पराक्रमी आणि जाज्वल्य इतिहासाचा सर्व विद्यार्थ्यांना अभ्यास करता यावा यासाठी हा नवीन अभ्यासक्रम सुरु करण्याचे योजिले आहे. या विषयाला एकूण ५० गुण असणार आहेत,आणि त्यातील १० गुण प्रात्यक्षिकासाठी असणार आहे. तसेच, या पुस्तकामध्ये एक व्यवस्थापकाने व्यवस्थापन कसें करावे याचबद्दल देखील मार्गदर्शक तत्वे सांगितले आहे. हा अभ्यासक्रम येत्या वर्षांपासून सुरु केला जाईल.”शिवाजी विद्यापीठ” यांच्या वेबसाइट वर या अभ्यासक्रमाबद्दल ची सर्व माहिती व सूचना सांगितल्या आहेत.

No Fields Found.

Leave A Reply

Your email address will not be published.