fbpx

हे फोटो पाहून तुम्ही पण म्हणाल ‘आज कुछ तुफानी करते है’

आजकाल स्मार्टफोन आणि सोशल मीडियामुळे अनेक गमतीदार व्हिडीओ आणि फोटोज व्हायरल होत आहेत. जगातील कोणत्याही कोपऱ्यात घडलेली घटना असो वा दुर्घटना काही मिनिटातच त्याविषयीची खबर संपूर्ण जगभर पसरते आहे. असेच गमतीदार व मजेदार फोटोज व्हायरल झाले आहेत, जे पाहून तुम्हाला वाटेल कि, कोण आहे हा फोटो काढणारा महान फोटोग्राफर आणि असे फोटो काढून घेणारे महान लोक.

आता ह्या कुत्र्याला अवार्ड द्यावा कि हा फोटो काढणाऱ्या फोटोग्राफरला असा प्रश्न तुम्हाला पडल्याशिवाय राहणार नाही. सर्कशीत असो वा डोंबाऱ्याच्या खेळात असो, तुम्ही अनेकदा एखाद्या स्त्री किंवा पुरुषाला अशी करामत करतांना पहिले असेल. पण ह्या फोटोत चक्क एक कुत्रा अशी करामत करताना दिसत आहे. टिनच्या डब्याची एक उतरंडी दिसत आहे, ज्यावर हा कुत्रा स्वतःचा तोल सावरत अगदी सफाईने उभा आहे. हे पाहून तुम्ही नक्की म्हणाल, क्या बात है!

(Source – bestofyoutube.net)

काही जणांना काहीतरी हटके करायची भारी हौस असते. त्यासाठी ते काय काय करतील ह्याचा नेम नाही. असे हटके मॉम डॅड लाभले आहेत, ह्या फोटोतील बाळाला, आपल्या मुलाची पप्पी घेण्याची अशी गजब स्टाईल तुम्ही कॉपी करू नका, ह्या फोटोतील आई बाबाने आपल्या छोट्याश्या मुलाला पूर्ण उलटा केलाय व त्याची पापी घेतानाचा हा फोटो आता चांगलाच व्हायरल झालाय, ह्या बाळाचे आई बाबा तर चांगलेच फेमस झाले, पण बिचारा मुलगा म्हणत असेल, कि कसले आई बाप माझ्या नशिबाला आलेत, जे फोटोसाठी मला असं उलटं लटकावत आहेत.

(Source – bestofyoutube.net)

तुम्ही कुण्याही बाइकवेड्याला विचारा कि तुझं पाहिलं प्रेम कोण आहे ? ह्यावर तो नक्कीच म्हणेल कि माझं पाहिलं प्रेम आहे माझी बाईक. आपण नेहमीच पाहत असतो कि कित्येक लोक आपल्या गाडीला आपल्या जीवापेक्षाही जास्त जपत असतात, तिची देखभाल करत असतात, पण ह्या तरुणाचं आपल्या बाइकबद्दलचं प्रेम पाहून तुम्हाला नक्कीच वाटेल कि स्वतःच्या बाईकवर प्रेम असावं तर असं ! हा तरुण चक्क एका रस्त्यावरील फुटपाथवर गादी टाकून अंगावर पांघरून घेऊन झोपलाय व आपल्या बाइकलासुद्धा त्याने त्याच गादीवर झोपवले आहे व त्या बाइकलाही आपल्या पांघरुणाने झाकून घेतले आहे. सांगा बरं ! कधी पहिला आहे का असा बाईक लव्हर, नसेलच पहिला, कारण असे लोक लाखातून एक असतात.

(Source – bestofyoutube.net)

आता हा फोटो बघा. बघा म्हणजे काय तुम्ही बघणारच आणि बघितल्यावर म्हणणारच कि, “क्या नसीब है इस गधे का”. एक सुंदर तरुणी ह्या गाढवाला किस करत आहे. ह्या गाढवालासुद्धा आपण जगातला सर्वात सुंदर व उमदा घोडा असल्याचं फिलिंग आलं असेल.

(Source – bestofyoutube.net)

आता थंडी संपून उन्हाळ्याची चाहूल लागायला सुरुवात झाली आहे. ह्या वर्षी थंडीही बऱ्यापैकी पडली होती, त्यामुळे जागो जागी लोक शेकोटी पेटवून उब घेत होते. पण ह्या माणसाला कदाचित जरा जास्तच थंडी वाजत असावी असे दिसत आहे. होय ! हा फोटो पाहून तुम्ही नक्कीच म्हणाल कि हा माणूस अंटार्क्टिक खंडात राहतो कि काय, जी त्याला एवढी थंडी वाजत आहे आणि ज्या पद्धतीने तो शेकोटी जवळ उभा आहे ते तर फारच हास्यास्पद आहे.

(Source – bestofyoutube.net)

केटीएम कंपनीची ड्यूक हि तरुणांची आवडती बाईक. अगदी छोट्या शहरांमध्ये सुद्धा आता ड्यूकचे शोरूम्स दिसू लागले आहेत. अनेक तरुण ड्यूक बाईकसोबत वेगवेगळे स्टंट करताना दिसत असतात. युट्युब वर लोक त्यांनी केलेल्या स्टंटचे व्हिडीओ सुद्धा टाकतात. पण ह्या फोटोमधील ड्यूकवर सवार तरुणांची हालत बघून तुम्ही पुढीलवेळी तुमच्या ड्यूकसह स्टंट करतांना दहावेळा विचार कराल. चुकीच्या पद्धतीने ब्रेक लावल्यामुळे ह्या दोन तरुणांचा आता कपाळमोक्ष होणार हे निश्चित.

(Source – bestofyoutube.net)

ह्याला म्हणतात परफेक्ट बॅलेन्स, ह्या सायकलस्वाराच्या कर्तबगारीचं आणि कॉन्फिडेन्सचं कौतूक करायलाच हवं, एकतर हा माणूस स्वतः सायकलवर स्वार, त्याच्या डोक्यावर एक वस्तू दिसत आहे, आणि त्यावर ह्या पठ्ठयाने चक्क टरबूज ठेवलाय. तुम्ही विचार करा कि हा टरबूज शेवपर्यंत असाच त्याच्या डोक्यावर राहिला असेल का ? कि रस्त्यातच तो टरबूज जमिनीवर पडून फुटला असेल ? हा फोटो पाहून तुम्हीही असंच काहीतरी भन्नाट करण्याचा विचार तर करत नाही ना !

(Source – bestofyoutube.net)

अशी व्यक्ती तुमच्या घरात असणे तर सोडाच पण, तुमच्या शेजारीपण असू नये, असे तुम्हाला वाटल्याशिवाय राहणार नाही. कारण हा तरुण LPG गॅसच्या सिलेंडरवर बंदुकीने नेम धरून बसलेला आहे. तो असं का करतोय हे देवच जाणे पण, असे नमुने आपल्या आजूबाजूलाही असू नयेत अशी प्रार्थना तुम्ही देवाकडे जरूर करा. असे काही भन्नाट व गजब लोक पहिले कि जरूर म्हणावे वाटते. नमुनो कि कमी नही है यारो इस दुनिया मे.

(Source – bestofyoutube.net)
No Fields Found.

Leave A Reply

Your email address will not be published.