fbpx

‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिका सोडणार का? काय म्हणाले अमोल कोल्हे

प्रथम छत्रपती शिवाजी महाराज आणि आता स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोचलेले अभिनेता अमोल कोल्हे यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून सगळ्यांनाच धक्का दिला. या आधी अमोल कोल्हे शिवसेनेमध्ये सक्रिय होते आणि त्यांनी पुणे भागातील निवडणुकीत सेनेसाठी कामही केले आहे.

सेनेचे शिवबंधन तोडून त्या ठिकाणी बारामतीचे घड्याळ बांधल्यानंतर राजकीय क्षेत्रात चर्चेचा विषय बनलेल्या डॉ. अमोल कोल्हे यांनी अनेकांना अजून एक झटका दिला आहे. नाशिकच्या मालेगावात त्यांनी स्वराज्यरक्षक संभाजी हि मालिका संपूर्ण झाल्यानंतर सिनेसृष्टीमधून किंवा मालिका विश्वातून काही काळासाठी निवृत्ती घेणार असल्याचे सांगितले आहे. डॉ कोल्हे यांनी केलेल्या या अचानक घोषणेमुळे मराठी सिनेसृष्टी सोबतच राजकीय क्षेत्रातील लोकही चकित झाले आहेत.

swarajya rakshak sambhaji, amol kolhe, zee marathi, sambhaji maharaj, sambhaji maharaj serial, स्वराज्यरक्षक संभाजी, अमोल कोल्हेंना दिडशे तलवारींची भेट, स्वराज्यरक्षक संभाजी, अमोल कोल्हे, छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवबंधन,  Amol Kolhe, Swarajya Rakshak Sambhaji, NCP, Shivsena, Loksabha 2019, Maharaja Sayajirao

लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजल्यानंतर लगेच कोल्हे मालेगावच्या दौऱ्यावर आले होते, यावेळी बडोद्याचे महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या जन्मोसोहळा या कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांना महाराजा सयाजी रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे, यावेळी सत्काराला उत्तर देताना स्वराज्यरक्षक संभाजी हि मालिका संपूर्ण झाल्यानंतर सिनेसृष्टीमधून किंवा मालिका विश्वातून काही काळासाठी निवृत्ती घेणार असल्याचे सांगितले तसेच स्वराज्यरक्षक संभाजी”च्या धर्तीवर महाराजा सयाजीराव यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारी एखादी मालिका, नाटक, चित्रपट करण्याचं आश्वासन दिल्याचं समजते.

No Fields Found.

Leave A Reply

Your email address will not be published.