fbpx

बाॅलिवूडशिवाय कंगाल होतील ‘हे’ पाकिस्तानी कलाकार

१४ फेब्रुवारी हाच तो दिवस ज्यादिवशी जैश या पाक पुरस्कृत दहशतवादी संघटनेने जम्मू काश्मीर भागात भारताच्या केंद्रीय राखीव दलाच्या जवानांवर भ्याड हल्ला केला आणि तब्बल ४० जवानांना यात प्राण गमवावे लागले. यानंतर देशभरात अक्षरशः सुडाची भावनां तयार झाली. अनेक लोकांनी तर सरकारवर युद्ध छेडण्याचा सल्ला दिला. लोक सोशल मीडियासह रस्त्यावर उतरून झालेल्या घटनेचा निषेध करत होते.

यानंतर मोदी सरकारने अगदी संयमाने घेत, विचारपूर्वक पाकीस्तानची विविध स्तरावर डिप्लोमॅटिक कोंडी करण्यास सुरवात केली. भारताने मोस्ट फेव्हर्ड हुद्दा काढून घेतला, त्यानंतर पाकिस्तानच्या मालावर कर तब्बल २०० टक्क्यांनी वाढवण्यात आला. यानंतर अनेक निर्णय घेऊन पाकची पुरती कोंडी केली आणि यात भारत आंतराराष्ट्रीय स्थरावर अधिक उजवा ठरला.

पाकिस्तानी कलाकार, आतिफ अस्लम, अली जाफर, राहत फतेह अली खान, विना मलिक, मारवरा हुकैननं, rahat fateh ali khan, ali jafar, atif aslam, veena malik, Mawra Hocane, bollywood-pakistani-artist
Image Sourec – Dainik Bhaskar

यात पाकिस्तानच्या कलाकारांवर बंदी घालण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आला, पण हा निणर्य अधिकृत भारताच्या सरकारचा नाही तर फिल्म असोशिअनने घेतला आहे. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, खरंच मोदी सरकारने अधिकृतपने पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यास काय होईल? माहितीनुसार काही कलाकार आहेत जे फक्त बॉलीवूड वर अवलंबून आहेत आई बाॅलिवूडशिवाय कंगाल होतील.

१. आतिफ अस्लम
गायक म्हणून सगळ्यात जास्त ओळख बॉलीवूड मधून मिळवली आहे. सगळ्यात जास्त काम हिंदी चित्रपटाच्या माध्यमातून मिळते त्यामुळे बंदी घातलीच तर याला कंगाल होण्याशिवाय पर्याय नाही. आतिफ असलमला ओळखत नाही किंवा त्याचे गाणे ऐकले नाही असा व्यक्ती सापडणं अवघड आहे. तरुणाईत अतिफचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. विशेष करून ‘पेहली नज़र मे’ हे त्याचे गाणे बरेच गाजले होते. आतिफ असलमचा जन्म एका पंजाबी मुस्लिम परिवारात वजिराबाद इथे झालेला. अतिफने कम्प्युटर सायन्समध्ये पदवी घेतलेली आहे.

पाकिस्तानी कलाकार, आतिफ अस्लम, अली जाफर, राहत फतेह अली खान, विना मलिक, मारवरा हुकैननं, rahat fateh ali khan, ali jafar, atif aslam, veena malik, Mawra Hocane, bollywood-pakistani-artist
Image Source – Daily Times

२. अली जाफर
पार्श्वगायन करण्यासोबतच अभिनेता म्हणून ओळख आहे, सगळ्यात जास्त काम बॉलीवूडच्या माध्यमातून त्यामुळे अचानक घातलेल्या बंदीमुळे याना नक्कीच गोष्टी अवघड होतील. अली जाफरचा जन्म मुस्लिम पंजाबी परिवारात लाहोर इथे झाला होता. अली जाफर केवळ एक अभिनेता नसून तो उत्तम गायक, कम्पोजर, मॉडेल, पेंटर तसेच प्रोड्युसर सुद्धा आहे. आपल्या करिअरची सुरवात अली जाफरने पाकिस्तान टीव्हीवर केली होती. पुढे जाऊन त्याने बॉलिवूडमध्ये सुद्धा आपला जम बसवला. बॉलिवूडमधील त्याचा पहिला चित्रपट ‘तेरे बिन लादेन’ साठी अलीला फिल्मफेअर बेस्ट डेबुटंट ऍक्टरचा अवॉर्ड देखील मिळाला होता.

पाकिस्तानी कलाकार, आतिफ अस्लम, अली जाफर, राहत फतेह अली खान, विना मलिक, मारवरा हुकैननं, rahat fateh ali khan, ali jafar, atif aslam, veena malik, Mawra Hocane, bollywood-pakistani-artist
Image Source – reacho.in

३. राहत फतेह अली खान
बंदी नंतर सगळ्यात जास्त फटका बसणारे व्यक्तिमत्व. पाक पेक्षा भारतात जास्त चाहते आणि कमी सुद्धा. राहत फतेह अली खान हे नाव काही भारतातल्या लोकांसाठी नवे नाही. मोठमोठ्या स्टार्ससाठी राहत फतेह अली खान यांनी गायन केलेलं आहे. राहत यांचा जन्म एका मुस्लिम पंजाबी परिवारात झाला होता. अनेक पिढ्यांपासून त्यांच्या परिवाराला संगीताचा वारसा लाभला आहे. दिग्गज गायक नुसरत फतेह अली खान हे राहत यांचे काका आहे.

पाकिस्तानी कलाकार, आतिफ अस्लम, अली जाफर, राहत फतेह अली खान, विना मलिक, मारवरा हुकैननं, rahat fateh ali khan, ali jafar, atif aslam, veena malik, Mawra Hocane, bollywood-pakistani-artist
Image Source – The Express Tribune

४. विना मलिक
तशी यशस्वी अभिनेत्री नाहीय पण जे काम मिळत आहे ते बॉलीवूडच्या जीवावर, त्यामुळे करिअरला स्टॉप मिळण्याशिवाय पर्याय नाही. विना मलिक एक मॉडेल, अभिनेत्री तसेच टीव्ही होस्ट आहे. बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये ती झळकली आहे. विना मालिकचा जन्म पाकिस्तानातील रावळपिंडी या शहरात झाला आहे. अनेक वादग्रस्त गोष्टींमध्ये विनाचे नाव घेतले जाते. विना मलिक भारतीय बिग बॉसमध्ये सुद्धा दिसली होती. शेवटच्या ६ स्पर्धकांपर्यंत विना बिग बॉसमध्ये होती.

पाकिस्तानी कलाकार, आतिफ अस्लम, अली जाफर, राहत फतेह अली खान, विना मलिक, मारवरा हुकैननं, rahat fateh ali khan, ali jafar, atif aslam, veena malik, Mawra Hocane, bollywood-pakistani-artist
Image Source – Business Today

५. मारवरा हुकैननं
सनम तेरी कसम या सिनेमातून ओळख निर्माण केलेली मारवरा हुकैननं वर बंदी नंतर पण मोठा परिणाम होईल. यामुळे ती फक्त पाकीस्तानी मालिकेपुरती राहील.

पाकिस्तानी कलाकार, आतिफ अस्लम, अली जाफर, राहत फतेह अली खान, विना मलिक, मारवरा हुकैननं, rahat fateh ali khan, ali jafar, atif aslam, veena malik, Mawra Hocane, bollywood-pakistani-artist
Image Source – tribune.com.pk
No Fields Found.

Leave A Reply

Your email address will not be published.