fbpx

पाकिस्तानवर झालेल्या एअर स्ट्राईकवर बॉलिवूडकरांनी दिलेल्या प्रतिक्रिया

पुलवामा हल्ल्यातील शहिदांना आज खऱ्या अर्थाने श्रद्धांजली मिळाली असं म्हणावं लागेल. केवळ २१ मिनिटाच्या एअर फोर्सच्या घातक कारवाईत जैश ए मोहम्मद व मसूद अजहरची कंबर तोडली आहे. ह्या धक्क्यातून पाकिस्तान कित्येक दिवस सावरणार नाही. आजची प्रत्येक भारतीयाची सकाळ नक्कीच आनंदाची झाली असेल आणि याला बॉलिवूड सेलिब्रेटीजसुद्धा अपवाद नव्हते. भारतीय हवाई दलाने केलेल्या ह्या कारवाईचे बॉलिवूड कलाकारांनी कौतुक केले आहे. पुलवामा हल्ल्यानंतर बॉलीवूडने पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातली होती.

सकाळी ३.३० वाजता भारतीय हवाई दलाने पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर केलेल्या हल्ल्याचे कौतूक बॉलिवूड सेलिब्रिटींनी पुढील शब्दात केले आहे. अजय देवगण आपल्या ट्विटमध्ये म्हणतो “Mess with the best, Die like the rest” आणि पुढे त्याने इंडियन एअरफोर्सला सॅल्यूट या ट्विटच्या माध्यमातून केले आहे. ह्या ट्विटमध्ये अजयने पंतप्रधान नरेंद्र मोदींना सुद्धा टॅग केले आहे. परेश रावल यांनी ह्या कारवाईचं कौतुक करतांना म्हटलेलं आहे कि, “खरंच दिवसाची सुरवात चांगली झाली.”

परेश रावल ह्यांच्यासोबतच विवेक ओबेरॉय, अनुपम खेर, अभिषेक बच्चन ह्यांनी देखील भारतीय हवाई दलाच्या ह्या जबरदस्त कारवाईचे कौतुक केले आहे. अनुपम खेर म्हणतात कि “आजच्या चांगल्या दिवसाची सुरवात नरेंद्र मोदींना सॅल्यूट करून करूयात” , राहुल गांधी ह्यांनी ह्या कारवाईचे संपूर्ण श्रेय भारतीय हवाई दलाला दिले व म्हटले आहे कि “मी इंडियन एअर फोर्सच्या वैमानिकांना सलाम करतो”, पुलवामा इथे झालेल्या भ्याड हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवरील बंदीचे सर्व बॉलिवूड कलाकारांनी समर्थन केले होते.

सलमान खान सुद्धा यात मागे राहिलेला नसून त्याने देखील या घटनेवर ट्विट केले आहे. त्याने ट्विट करत ‘भारतीय वायुदलाचा अभिमान असल्याचे म्हटले.’ फेमस सिंगर कैलाश खेर यांनी “नयी दिशा नयी दशा.. नयी रीति नयी नीति.. नए भारत को, सच्चे भारत के सपूतों को शत शत नमन” असे ट्विट केले. नेहमी भारतीय सैन्याला बढावा देणाऱ्या अक्षय कुमारने ‘अंदर घुसके मारो’ असे ट्विट केले. त्यात अक्षयने भारतीय वायुसेनेचा अभिमान असल्याचेही सांगितले. भारतीय हवाई दलाने केलेल्या ह्या घातक कारवाईत अंदाजे २०० पेक्षा जास्त दहशतवादी ठार झाल्याचे समजते आहे. हा आकडा वाढू शकतो असाही अंदाज आहे.

No Fields Found.

Leave A Reply

Your email address will not be published.