fbpx

तुम्हाला अभिनंदन आणि रजनीकांत यांचं हे कनेक्शन माहीत आहे?

सध्या दोनच गोष्टींची चर्चा आहे. एक म्हणजे विंग कमांडर अभिनंदन वर्थमान आणि दुसरी म्हणजे त्यांची मिशी. त्यांच्या पराक्रमाबरोबरच लोक त्यांच्या मिशीचेही चाहते बनले आहेत. तरुणांमध्ये तर त्यांच्यासारख्या मिश्या ठेवायची चढाओढच लागली आहे. भारताच्या कानाकोपऱ्यांमध्ये लोक अभिनंदन व त्यांची मिशी ह्यांचे फॅन झाले आहेत.

पण, स्वतः अभिनंदन मात्र साऊथ सुपरस्टार रजनीकांत ह्यांचे फॅन आहेत. रजनीकांतचा फॅन नाही असा कोणताच तरुण तुम्हाला तामिळनाडूमध्ये सापडणार नाही. स्वतः अभिनंदनसुद्धा तामिळनाडूचे सुपुत्र आहेत. विंग कमांडर अभिनंदन ह्यांच्या मिशीसारखी मिशी तुम्हाला रजनीकांत ह्यांच्या पेटा सिनेमात बघायला मिळणार आहे.

abhinandan varthaman, abhinandan moustache style, india, pakistanअभिनंदन आणि रजनीकांत, अभिनंदन, रजनीकांत, Abhinanadan, Rajnikant, connection bet Abhinanadan and Rajnikant

रजनीकांतच्या प्रत्येक चित्रपटात त्यांचा अलग अंदाज, वेगळी स्टाईल पाहायला मिळते. त्यांच्या कबाली चित्रपटातील त्यांचा लुक प्रचंड गाजला होता. जेष्ठ अभिनेते रजनीकांत हे त्यांच्या लुक आणि स्टाईल बद्दल अतिशय प्रयोगशील आहेत. त्यांचा आगामी पेटा हा चित्रपट आगामी काळात प्रदर्शित होणार आहे. त्यातील त्यांनी ठेवलेली मिशी विंग कमांडर अभिनंदन ह्यांच्या मिशीसारखीच दिसत आहे.

रजनीकांत ह्यांचा रोबो २.० सिनेमा नुकताच येऊन गेला होता, रजनीकांत ह्यांना मानणारा मोठा वर्ग दक्षिणेत आहे. विशेषतः तरुण मंडळी त्यांच्या प्रत्येक स्टाईलची कॉपी करतांना दिसतात. तामीळ चित्रपटसृष्टीतील अतिशय महागड्या अभिनेत्यांमध्ये सुपरस्टार रजनीकांत ह्यांचा क्रमांक लागतो. अभिनंदन वर्धमान आणि सुपस्टार रजनीकांत ह्यांच्यातील ह्या साम्याची चर्चा होत आहे.

अभिनंदन आणि रजनीकांत, अभिनंदन, रजनीकांत, Abhinanadan, Rajnikant, connection bet Abhinanadan and Rajnikant
Image Source – Lokmat News 18

तुम्ही अनेकवेळा हे पाहिलं असेल कि दक्षिणेतील अनेक कलाकार आपल्या मिशी व दाढीसह नेहमीच वेगळा लुक व वेगळी स्टाईल ठेवत असतात. साहजिकच अभिनंदन हे सुद्धा इतर तामिळ तरुणांप्रमाणेच तामिळ अभिनेत्यांच्या ह्या दाढी व मिशीच्या स्टाईलचे फॅन असणार. विंग कमांडर अभिनंदन ह्यांना एअरफोर्समधील त्यांचे सहकारी गमतीने वीरप्पन म्हणत असत. ह्याचे कारण त्यांच्या भारदस्त मिश्या

No Fields Found.

Leave A Reply

Your email address will not be published.