fbpx

२६ /११ दहशतवादी हल्ल्यातील त्या ‘मेजर’ वर येतोय चित्रपट

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सध्याचे वातावरण चांगलेच तापलेले आहे. भारतात अनेक दहशतवादी हल्ले झाले परंतु पाकिस्तानने त्यांच्या जमिनीवर अजूनही दहशतवाद्यांना आश्रय दिलेला आहे. पाकिस्तान त्यांच्यावर कुठलीच कारवाई करत नाही म्हणून भारताने एक नव्हे तर दोन वेळा पाकिस्तानच्या हद्दीत जाऊन सर्जिकल स्ट्राईक केला. याच दरम्यान एका चित्रपटाचे पोस्टर रिलीझ करण्यात आले आहे ज्याने सगळ्यांचीच उत्सुकता वाढवली आहे.

२६/११ चा दहशतवादी हल्ला प्रत्येक भारतीय मनाला वेदना देणारा आहे. तो काळा दिवस कुणीच विसरणार नाही. पाकिस्तानी दहशतवाद्यांनी मुंबईत घुसून अनेक निरपराध नागरिकांचा बळी घेतला होता. ह्या दहशतवादी हल्यात १४ पोलीस कर्मचारी व अधिकारी शाहिद झाले होते. ह्यात हेमंत करकरे, तुकाराम ओंबळे, विजय साळस्कर, ह्यांचा समावेश होता. तसेच ह्या दहशतवादी हल्ल्यात अजून एक वीर जवान शहिद झाला होता. त्याचे नाव आहे, मेजर संदीप उन्नीकृष्णन.

major, mahesh babu, Major Sandeep Unnikrishnan, 26/11 attack, movie, Adivi Sesh
Major Sandeep Unnikrishnan (Source – IndiaTimes)

पंचविशीतील मेजर संदीप ह्यांनी दहशतवाद्यांविरुद्धच्या ह्या लढाईत अतुलनीय पराक्रम गाजवला होता. आता ह्याच मेजर संदीप उन्नीकृष्णन ह्यांच्या आयुष्यावर आधारित बायोपिक लवकरच आपल्या भेटीस येत आहे. प्रसिद्ध तेलगू अभिनेता महेश बाबू ह्याची निर्मिती संस्था जीएमबी एंटरटेनमेंट ह्या चित्रपटाची निर्मिती करत असून, ह्या चित्रपटाचे नाव “मेजर” असेठेवण्यात आले आहे. संदीप उन्नीकृष्णन हे एनएसजी कमांडो अर्थात राष्ट्रीय सुरक्षा पथकामध्ये कमांडो म्ह्णून कार्यरत होते. ते राष्ट्रीय सुरक्षा पथकामध्ये मेजर ह्या पदावर कार्यरत होते.

major, mahesh babu, Major Sandeep Unnikrishnan, 26/11 attack, movie, Adivi Sesh
Adivi Sesh’s Major Movie Produced By Mahesh Babu (Source – Social News XYZ)

म्हणून त्यांच्या मेजर ह्याच हुद्द्याचे नाव चित्रपटाला देण्यात आले आहे. अभिनेता आदिवी सेश ह्या चित्रपटात मेजर संदीप ह्यांच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहे. आदिवी सेश ह्याने ह्यापूर्वी बाहुबली ह्या गाजलेल्या चित्रपटातसुद्धा काम केलेले आहे. अभिनेता महेश बाबू ह्यानेच ह्या चितपटाच्या निर्मितीविषयी त्याच्या ट्विटर हँडलवर हि माहिती दिली आहे. महेश बाबूच्या जीएमबी बरोबरच सोनी पिक्चर्स सुद्धा ह्या चित्रपटाच्या निर्मितीत सहभागी आहे. हा चित्रपट हिंदी व तेलगू ह्या दोन्ही भाषेमध्ये प्रदर्शित होणार असल्याचे कळते आहे. ह्या चित्रपटाद्वारे सोमी पिक्चर्स तेलगू चित्रपट निर्मितीत पदार्पण करत आहे.

major, mahesh babu, Major Sandeep Unnikrishnan, 26/11 attack, movie, Adivi Sesh
Adivi Sesh in Major (Source – Deccan Chronicle)
No Fields Found.

Leave A Reply

Your email address will not be published.