fbpx

सलमान खान या मतदार संघातून लढवणार लोकसभेची निवडणूक?

लोकसभा निवडणुकीची तारीख जाहीर होण्यासाठी थोड्याच दिवसांचा अवधी शिल्लक आहे. ११ मार्चला निवडणुकीची तारीख जाहीर होईल अशी शक्यता आहे. निवडणुकीच्या तोंडावर अनेक सेलिब्रिटी मंडळी वेगवेगळ्या पक्षाला जवळ करतात. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या एका मराठी अभिनेत्याची चर्चा सध्या रंगात असतांनाच आता एक नवीन बातमी समोर आली आहे ती सलमान खान ह्याच्या आगामी लोकसभा निवडणूक लढविण्यासंबंधीची.

सलमान खान, लोकसभा २०१९, काँग्रेस, मध्य प्रदेश, मुख्यमंत्री कमलनाथ, Salman khan, Salman khan to contest loksabha, kamalnath, Mp

हाती आलेल्या वृत्तानुसार सलमान खान आगामी निवडणूक लढविणार असून, तो काँग्रेस पक्षाकडून हि निवडणूक लढविणार आहे असे समजते. स्वतः सलमानकडून ह्यासंबंधी अधिकृत दुजोरा मिळाला नसला तरी, सध्या चालत असलेल्या घडामोडींवरून असा अंदाज बांधण्यात येत आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ ह्यांनी आपल्या कामाचे प्रगतीपुस्तक सादर करण्यासाठी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली व हि कॉन्फरन्स शेवटच्या टप्प्यावर असतांना त्यांनी हि माहिती दिली.

१ एप्रिल ते १८ एप्रिल ह्या कालावधीत सलमान खान मध्यप्रदेशातील संस्कृती आणि पर्यटन विकास ह्याचे प्रमोशन करण्यासाठी मध्य प्रदेशात येणार आहेत. मध्यप्रदेश मुख्यमंत्री कमलनाथ ह्यावेळी म्हणाले कि “माझं आत्ताच सलमान खान ह्यांच्याशी बोलणं झालं आहे व ते एक एप्रिल ते अठरा एप्रिल ह्या कालावधीमध्ये मध्यप्रदेशात असतील”. सलमान ज्या कालावधीत मध्यप्रदेशात येणार आहे.

त्या काळात देशभरात निवडणूक आचारसंहिता लागू होणार आहे, त्यामुळे काँग्रेसचा प्रचार करणे सलमानला ह्या कालावधीत शक्य नाही, त्यामुळे असा अंदाज बांधण्यात येतोय कि काँग्रेस सलमानला आगामी निवडणुकीत तिकीट देण्याच्या विचारात आहे. सलमान ह्यावर काही बोलला नाही. आगामी काळात नेमकं काय होत हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

No Fields Found.

Leave A Reply

Your email address will not be published.