fbpx

अबब ! डॉ अमोल कोल्हेंना भेट मिळालेल्या तलवारींचा आकडा किती माहित आहे का ?

ऐंशी – नव्वद च्या दशकात जेव्हा रामायण आणि महाभारत या मालिका लागायच्या तेव्हा देशातील सगळी लोकं टीव्ही समोर बसलेली असायची. तशीच काहीशी परिस्थिती सध्या महाराष्ट्रात आहे असे म्हणायला हरकत नाही. झी मराठी वरील ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेचे चाहते चुकूनही या मालिकेचा एकही भाग चुकवत नाहीत. यात मोलाचा वाट आहे तो म्हणजे डॉ अमोल कोल्हेंचा. त्यांनी संभाजी महाराजांच्या भूमिकेला पुरेपूर न्याय दिला आहे.

स्वराज्यरक्षक संभाजी ह्या मालिकेने लोकप्रियतेचे नवीन रेकॉर्ड्स प्रस्थापित केले आहेत. अमोल कोल्हे प्रमुख भूमिकेत असलेल्या ह्या मालिकेने आबालवृद्धांच्या मनात स्थान मिळवले आहे. लोक ९ वाजण्याची आतुरतेने वाट बघत असतात इतकी हि मालिका लोकांना आवडली आहे. ह्या मालिकेतील शंभूराजेंची भूमिका साकारत असलेल्या डॉ अमोल कोल्हेना चाहत्यांचे भरभरून प्रेम लाभत आहे. डॉ अमोल यांनी यापूर्वी राजा शिवछत्रपती या मालिकेत शिवाजी महाराजांची भूमिका साकारली व ती भूमिकासुद्धा लोकांना प्रचंड आवडली होती.

swarajya rakshak sambhaji, amol kolhe, zee marathi, sambhaji maharaj, sambhaji maharaj serial, स्वराज्यरक्षक संभाजी, अमोल कोल्हेंना दिडशे तलवारींची भेट
Swarajyarakshak Sambhaji  (Source – dnilesh.net)

चाहत्यांनी विविध कार्यक्रमांत भेट म्हणून आजवर तब्बल १५० तलवारी, अमोल कोल्हेना भेट म्हणून दिल्या आहेत. एवढ्या तलवारी भेट म्हणून क्वचितच अन्य कुण्या कलाकाराला मिळाल्या असतील. अमोल कोल्हेनी सुरुवातीच्या काळात “शंभूराजे” ह्या नाटकाचे सुमारे ५२० प्रयोग केले होते, तसेच त्यांनी “शिवपुत्र संभाजी राजे” ह्या महानाट्याचेसुद्धा १०० पेक्षा जास्त प्रयोग केले आहेत. सध्या सुरु असलेल्या स्वराज्यरक्षक संभाजी ह्या झी मराठीवरील मालिकेने तमाम शिवप्रेमी व शम्भूप्रेमींना आपलेसे केले आहे.

swarajya rakshak sambhaji, amol kolhe, zee marathi, sambhaji maharaj, sambhaji maharaj serial, स्वराज्यरक्षक संभाजी, अमोल कोल्हेंना दिडशे तलवारींची भेट
Sambhaji Mahanatya (Source – News18 Lokmat)

ह्याच प्रेमापोटी अनेक चाहते डॉ अमोल कोल्हेना विविध कार्यक्रमात तलवारी भेट देत असतात. आता त्यांच्याकडे ह्या भेटस्वरूप मिळालेल्या तलवारींची संख्या १५० झाली आहे. ह्या १५० पैकी केवळ दोनच तलवारी त्यांनी स्वतःजवळ ठेवल्या आहेत व बाकी तलवारी ते आपल्या टीममधील इतर सदस्यांना देत असतात. स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेत संभाजी राजेंच्या आयुष्यातील प्रत्येक प्रसंग अत्यंत बारकाईने दाखवला जात आहे. सर्वच कलाकारांचा अभिनय व मालिकेतील संवाद ह्यामुळे हि मालिका दिवसेंदिवस अधिक लोकप्रिय होऊ लागली आहे.

swarajya rakshak sambhaji, amol kolhe, zee marathi, sambhaji maharaj, sambhaji maharaj serial, स्वराज्यरक्षक संभाजी, अमोल कोल्हेंना दिडशे तलवारींची भेट
(Source – MarathiStars.com)
No Fields Found.

Leave A Reply

Your email address will not be published.