fbpx

‘कॉफी विथ करण’च्या गिफ्ट हॅम्पर मध्ये काय असतं ? करण जोहरने केला उलगडा

बॉलिवूड दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहरचा ‘कॉफी विथ करण’ हा शो बऱ्याच वर्षांपासून चालू आहे आणि तो नेहमी चर्चेत देखील असतो. या ‘शो’चं चर्चेत राहण्याचं कारण म्हणजे इथे बॉलिवूड स्टार्सच्या खासगी आयुष्यातले उलगडणारे सत्य आणि त्यामुळे तयार होणाऱ्या कॉंट्रोव्हर्सी. यावर्षी ‘कॉफी विथ करण’चा सहावा सिझन चालू आहे. विशेष म्हणजे सध्या चालू असलेला सिझन चर्चेत राहिला तो हार्दिक पंड्याच्या वादग्रस्त विधानांमुळे.

coffee with karan, gift hamper, karan johar, koffee with karan hamper
(Source – Google)

गेल्या ६ वर्षांपासून कॉफी विथ करण या शोची एक प्रथा आहे. करण जोहर शो मध्ये आलेल्या कलाकारांसोबत रॅपिड फायर राउंड खेळतो आणि जो कुणी हा गेम जिंकेल त्याला एक ‘गिफ्ट हॅम्पर’ विनर प्राईझ म्हणून दिल्या जातं. अनेक स्टार्स हे गिफ्ट हॅम्पर मिळवण्यासाठी फार उत्सुक असतात. कारण हे गिफ्ट हॅम्पर फार महाग असून त्याची मांडणी देखील आकर्षक असते. तेव्हा अनेक लोकांना प्रश्न पडतो कि ‘कॉफी विथ करण’ शो मध्ये दिल्या जाणाऱ्या गिफ्ट हॅम्परमध्ये काय असत ?

coffee with karan, gift hamper, karan johar, koffee with karan hamper
(Source – Google)

तर खुद्द करण जोहरने याविषयी बोलत या गिफ्ट हॅम्परमध्ये काय असते याचा उलगडा केला. या हॅम्परमध्ये फ्रान्समधील फ्रेन्च चॉकलेट, ऑडी एक्स्प्रेसो कॉफी मोबिल, डोल्से अॅन्ड गब्बानाचे महाग गॉगल, महाग परफ्युम, शॅम्पेन, ब्राउनिज, चॉकलेट्स, कुकिज तसेच इतर गुडीजचा समावेश असतो. याव्यतिरिक्त या सिझन मध्ये एक विशेष गिफ्ट देण्यात आले आहे. हे गिफ्ट म्हणजे चक्क ऑडी कार होती. अजय देवगणने या सिझन मध्ये ऑडी कर जिंकली आहे.

coffee with karan, gift hamper, karan johar, koffee with karan hamper
(Source – CarAndBike)
No Fields Found.

Leave A Reply

Your email address will not be published.