fbpx

तुळजाभवानीच्या मंदिराला हात लावाल तर कुराणाची शपथ आहे.

Image Source - Loksatta

पाचशे वर्षांपूर्वीची एक सनद सापडली आहे, जी अस्सल आदिलशाहीची असल्याचे बोलले जात आहे. या सनदीमुळे सगळ्यांची झोप उडवणारा खुलासा झाला आहे

काही दिवसांपूर्वीच छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानीचे नाते सांगणारा अलंकार तुळजापूरच्या मंदिरात सापडला होता, याच बरोबर डोळे दिपवणारा कुलस्वामिनीचा खजाना देखील समोर आला होता. त्यांनतर मागच्याच आठवड्यामध्ये तिकोना किल्य्यावर एक गुहा सापडली होती जी आतापर्यन्त कोणालाच माहित नव्हती. एवढ्या जास्त इतिहासातील घडामोडी समोर आणणारे अनेक गोष्टी या महिन्यात सापडणे म्हणजेच एक योगायोग म्हणावा, कारण आता तब्बल पाचशे वर्षांपूर्वीची आदिलशाहची सनद तुळजापुरात सापडली आहे आणि त्यावरचा मजकूर वाचून अनेकजण आश्चर्यचकित झाले आहेत.

लोकसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार पाचशे वर्षांपूर्वीची एक सनद सापडली आहे, जी अस्सल आदिलशाहीची असल्याचे बोलले जात आहे. या सनदीमुळे सगळ्यांची झोप उडवणारा खुलासा झाला आहे, यामध्ये महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानीच्या मंदिराला तसेच तेथील पुजार्यांना कोणत्याही प्रकारची इजा पोचवू नये, तुळजाभवानीचा अपमान होईल असे कोणतेही कृत्य करू नये असा स्पष्ट उल्लेख मिळालेल्या सनदी मध्ये असल्याचे वृत्त अनेक वाहिन्यांनी दिले आहे. पुढे असे कृत्य करणार्यां मुसलमानांना कुराणाची, तर ब्राम्हण आणि मराठ्यांना त्यांच्या त्याच्या दैवी विश्वास असणाऱ्या गोष्टींची शपथ देण्यात आली आहे.

विशेष म्हणजे हि संवाद छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माच्या १४० वर्षे पूर्वीचे असल्याचे जाणकार सांगत आहेत. या सनदी मुळे इतिहासातील अनेक गोष्टींवर प्रकाश पडण्याची शक्यता आहे.

तुळजाभवानी, छत्रपती शिवाजी महाराज,  महाराष्ट्राची कुलस्वामिनी, आदिलशहा, युसूफ आदिलशाह, महाराष्ट्र इतिहास, Maratha History, Adilshah, Tulajabhavani
Image Source – Google

कोणाची आणि कधीची आहे सनद

तुळजापुरातील पुजारी विलासराव वाळके यांच्या घराचे डागडुजीचे काम करत असताना घराच्या एका भिंतीमधील संदूकामध्ये हि सनद सापडली होती. माहितीनुसार एक संवाद आकाराने १ फुटाची तर दुसरी तब्बल ७.२ फुटाची असल्याचे समोर आले आहे. सापडलेली सनद मोदी लिपी मध्ये असल्याने त्याचे पुराभिलेख प्रमाणपत्र असणाऱ्यांकडून भाषांतरित करून घेतली आहे. या दोन्ही सनदी आदिलशाहच्या संस्थापक असलेल्या युसूफ आदिलशहा याने १४८९ मध्ये तुळजापूरला या सनद शक्यता आहे.

याव्यतिरिकीय मिळालेल्या सनदी मध्ये त्याकाळच्या आदिलशहा युसूफ बद्दल अनेक माहिती उपलब्ध झाली आहे, जसे त्यांचा राज्यकारभार, राज्यचा वलय, इतर सरदार घराणे तसेच भौगोलिक दृष्ट्या महत्वाच्या असणाऱ्या अनेक ठिकाणांबद्दल माहिती यामधून उपलब्ध झाले आहे. यातून छत्रपती शिवाजी महाराजच्या जन्माच्या आधीचा महाराष्ट्र नेमका कसा होता याची झलक पण पाहायला मिळते.


No Fields Found.

Leave A Reply

Your email address will not be published.