fbpx

…आणि एका क्षणात सम्राट अशोकाने भारतभर पसरवलेल्या मौर्य साम्राज्याचा अंत झाला

मौर्य साम्राज्य केवळ भारतापुरते मर्यादित नसून अफगाणिस्तान, पाकिस्तान, बलुचिस्तान पर्यंत पसरले होते

आपल्या देशातील संस्कृती, धर्म व परंपरा यांना हजारो वर्षांचा इतिहास लाभलेला आहे. आपली भारतीय संस्कृती जगातील सर्वात प्राचीन संस्कृतींपैकी एक मानली जाते. भारताला लाभलेल्या अमाप व अतुलनीय अशा नैसर्गिक साधनसंपत्तीमुळे इथली जनता समृद्ध होती. त्यामुळे, अनेक वर्षांपासुन भारत हा जगाच्या व्यापारी नकाशावर केंद्रस्थानी असलेला देश आहे.

भारतात असलेल्या अमाप संपत्तीमुळे अनेक शासनकर्ते भारताकडे आकर्षित झाले. पण, आज आपण परकीय किंवा बाहेरून आलेल्या शासनकर्त्यांविषयी जाणुन घेणार नाही आहोत. तर आपण त्या भारतीय राज्यकर्त्यांविषयी जाणून घेणार आहोत ज्यांनी मध्ययुगाच्या प्रारंभीच्या काळात भारतावर राज्य केले. आपण असे सुध्दा म्हणु शकतो की आलिकडच्या राजवटींपेक्षा जुन्या राजवटींच्या काळामध्ये भारताची एकुण भरभराट जास्त झाली.

Maurya Empire, mauryan empire map, mauryan empire achievements, 	mauryan empire timeline, mauryan empire facts, bindusara, gupta empire, brihadratha maurya, maurya empire history, chandragupta maurya son, chandragupta maurya cast, chandragupta maurya family tree, chandragupta maurya in marathi, ashoka history, samrat ashok history marathi, maurya samrajya, चंद्रगुप्त मौर्य, मौर्य साम्राज्याचा अंत, सम्राट अशोका
Chandragupta Maurya (Image Source – Famous People)

भारतात पुर्वीपासुन अनेक राजवटींनी राज्य केले त्यात चालुक्य, गुप्त, मौर्य, श्रृंग, नंद इत्यादी घराण्यांनी भारतावर सत्ता चालवली. या काळात संपूर्ण भारतात अनेक सामाजिक, राजकिय व कलाक्षेत्रांमध्ये अनेक अमुलाग्र बदल झाले. आपण बारकाईने अभ्यास केला तर, असे लक्षात येईल की या प्रत्येक राजवटीमध्ये एक वेगळी सामाजिक परिस्थिती निर्माण होत होती. या काळामध्ये भारतात अनेक धर्म, संस्कृती उदयास आल्या. एकुणच जो धर्म राजाचा तोच प्रजेचा असे समीकरण होते. पण त्याकाळातील उल्लेखनीय गोष्ट ही की, त्याकाळी धर्मपरिवर्तनाचे स्वातंत्र्य होते व लोक एकमेकांच्या भावनांचा आदर करत असत. दुर्दैवाने आजच्या भारतात तसे दिसत नाही.

या सर्व काळात एका घराण्याने भारताच्या अर्वाचीन इतिहासात आपलं मानाचं पान राखून ठेवलं. ते घराणं म्हणजे मौर्य घराणं. एका सामान्य तरूणाने आपल्या गुरूच्या मार्गदर्शनाने उभी केलेली राजवट म्हणजे मौर्य राजवट असे आपणास म्हणता येईल. या राजवटीत भारताच्या सांस्कृतिक व कला क्षेत्राचा विकास मोठ्या प्रमाणात झालेला आपल्याला दिसतो. आचार्य चाणक्य यांनी धनानंदाचे आव्हान स्विकारून त्याची जुलमी राजवट उलथवून लावण्यासाठी नंद घराण्याप्रमाणेच कोणत्याही क्षत्रिय घराण्यातुन न आलेल्या एका सामान्य मेंढपाळाच्या मुलाला राजकारणाचे धडे दिले व नंद कूळातील शेवटचा राजा धनानंद याचा बिमोड करून त्याच्या कुळाचा नाश केला. त्यानंतर एका नविन राजवटीची स्थापन केली, त्याला आपण आज मौर्य राजवट म्हणुन ओळखतो.

Maurya Empire, mauryan empire map, mauryan empire achievements, 	mauryan empire timeline, mauryan empire facts, bindusara, gupta empire, brihadratha maurya, maurya empire history, chandragupta maurya son, chandragupta maurya cast, chandragupta maurya family tree, chandragupta maurya in marathi, ashoka history, samrat ashok history marathi, maurya samrajya, चंद्रगुप्त मौर्य, मौर्य साम्राज्याचा अंत, सम्राट अशोका
Maurya Empire Map (Image Source – Pinterest)

त्या सामान्य मेंढपाळाच्या मुलाचे नाव होते चंद्रगुप्त मौर्य. हाच तो राजा ज्याने या महान मौर्य राजवटीची सुरूवात केली. चंद्रगुप्त मौर्याने सबंध उत्तर भारत म्हणजे मगध, रांची या व इतर प्रदेशांवर आपले साम्राज्य प्रस्थापित केले. नंतर त्याचा मुलगा बिंदूसार याने त्याचा राज्यविस्तार थोड्या प्रमाणात केला. चंद्रगुप्ताने त्याच्या शेवटच्या क्षणी आपले राज्य त्याग करून जैन धर्म स्विकारला.

त्यानंतर मौर्य साम्राज्याची धुरा बिंदूसार याच्यावर आली. त्याने आपल्या परीने मौर्य साम्राज्याचा विस्तार केला. पण, त्याची कामगिरी काही फार मोठी नव्हती. त्यानंतर, त्याचा मुलगा “अशोक” हा गादीवर आला. अशोक आपल्या सुरूवातीच्या काळात खुप रागीट व महत्वाकांक्षी होता. त्याने मौर्य साम्राज्य सबंध भारत, अफगाणिस्तान, पाकिस्तान इत्यादी भागात पसरवले. पण भारतातील फक्त एक राज्य त्याला खालसा करता आले नव्हते ते म्हणजे ‘कलिंग.’ कलिंगचा राजा हा सुध्दा प्रचंड महत्त्वकांक्षा असलेला व दृढनिश्चयी होता.

अशोकाला आपले राज्य बळकाऊ द्यायचे नाही असा त्याचा दृढ निश्चय होता. परंतु, अशोकाला कलिंग कोणत्याही परिस्थितीत हवं होतं. त्यामुळे त्याने कलिंगवर आक्रमण केले. कलिंगची लढाई अतिशय भयावह होती. आपण म्हणु शकतो की अशोकाची ती शेवटची लढाई होती. कारण, त्यानंतर अशोकाने बुध्दाची शिकवण आचरून बौध्द धर्म स्विकारला आणि बौध्द धर्माची शिकवण जगभरात पोहचवण्याचे काम हाती घेतले. सर्व जगभर बौध्द धर्माच्या प्रचारासाठी प्रचारक पाठवले.

Maurya Empire, mauryan empire map, mauryan empire achievements, 	mauryan empire timeline, mauryan empire facts, bindusara, gupta empire, brihadratha maurya, maurya empire history, chandragupta maurya son, chandragupta maurya cast, chandragupta maurya family tree, chandragupta maurya in marathi, ashoka history, samrat ashok history marathi, maurya samrajya, चंद्रगुप्त मौर्य, मौर्य साम्राज्याचा अंत, सम्राट अशोका
Ashoka Pillar, Sarnath (Image Source – The Mysterious India)

आज आपल्या देशाची राजमुद्रा ही सारनाथ येथील स्तंभावरची आहे. ती सुध्दा मौर्य साम्राज्यानेच आपल्या देशाला दिलेली देण आहे. पण आपल्या कार्यकर्तृत्वाने इतिहासाला आपली दखल घ्यायला लावणार्या व अखंड भारतावर आपल्या साम्राज्याचा झेंडा फडकवणार्या या साम्राज्याचा अंत झाला तरी कसा ?

मौर्य साम्राज्याचा अंतची गोष्ट ही याच साम्राज्यात लपलेल्या फितुरांची साक्ष देणारी आहे.या साम्राज्याला अंतापर्यंत पोहचवण्यासाठी ह्या साम्राज्यातील आपलेच लोक कारणीभूत ठरले. एक वाक्य आपल्याला खुप काही सांगुन जातं ते म्हणजे,

” शत्रूची फौज कीती आहे हे मोजू नका तर आपल्यामध्ये फितुर किती आहेत हे मोजा, तुम्हाला तुमचा पराभव का झाला ते कळेल.”

त्याचप्रमाणे फितुरीच ह्या साम्रज्याच्या अंतास कारणीभूत ठरली. अशोकानंतर मौर्य साम्राज्याला उतरती कळा लागण्यास सुरूवात झाली. अशोकाचा नातू बृहंदत्त हा मौर्य साम्राज्याच्या गादीवर असताना त्याच्याच मंत्रीमंडळामध्ये त्याला हरवण्यासाठी प्रयत्न सुरू होते.

बृहंदत्त हा राजा मौर्य साम्राज्याला शोभणारा होता पण इतिहासाने दखल घ्यावी असे काही कार्य त्याच्या हातून घडले नव्हते. त्याच्या विरूध्द शत्रु खुप सक्रिय होते. त्याच्या दरबारातील एक मंत्री पुष्यमित्र श्रुंग हा बृहंदत्त वर नाराज होता. दरबारातील इतर दरबारींना सुद्धा त्याने आपल्या बाजुने करून घेतले होते. त्याने बृहंदत्ताच्या शत्रुशी हात मिळवणी केली होती व त्याची नजर मौर्य साम्राज्याच्या गादीवर होती. त्याने एक दिवस पूर्ण मंत्रीमंडळामध्ये असंतोष पसरवून कपटाने बृहंदत्ताची भर दरबारात हत्या केली व तिथेच मौर्य साम्राज्याचा अंत झाला. मंत्र्यांना सोबत घेऊन स्वतः गादीवर बसला व नविन श्रुंग राजवटीची सुरूवात केली. मौर्य साम्राज्याच्या तुलनेत त्याचे साम्राज्य अगदीच कमकुवत व अन्यायी होते.

आपल्याच माणसांवर टाकलेला विश्वास व त्या विश्वासाचा केलेला घात यामुळे भारतातील अनेक साम्राज्य लयास गेली. त्यामधील एक म्हणजे मौर्य साम्राज्याचा अंत होय. आपल्या कार्यकर्तुत्वाने सबंध भारताला उभ करणारे हे साम्राज्य. मौर्य साम्राज्याचा अंत मात्र आपल्याच अविश्वासू सेवकांमुळे झाला असे आपण म्हणु शकतो. त्यामुळे विश्वास हा खुप महत्वाचा ठरतो.

विश्वास योग्य माणसावर ठेवला तर छोटे साम्राज्यसुध्दा नवीन भरारी घेते, आणि जर तो अयोग्य माणसावर टाकला तर मौर्य साम्राज्यासारखे भले मोठे साम्राज्यसुध्दा लयास जाते.

No Fields Found.

Leave A Reply

Your email address will not be published.