fbpx

“स्वराज्य रक्षक संभाजी” च्या तलवारीची धार वाढली. TRP मीटर मध्ये अनेकांना धोबीपछाड

Image Source - Zee Marathi

महाराष्ट्रात घरोघरी सासू आणि सुनेच्या भांडणाच्या मालिका पाहणारे घर आता संभाजी महाराजांचे पराक्रम पाहण्यासाठी एकत्र बसते हेच सगळ्यात मोठे मालिकेचे यश आहे.

एक वेळ होती महाराष्ट्रातील जनतेला हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती आणि शिवपुत्र संभाजी महाराज यांच्याबद्दल फक्त नकारात्मक आणि रंगवलेला इतिहासाचं माहित होता. अगदी पानिपतकार आणि सनदी अधिकारी विश्वासराव पाटील यांनी शंभूराजेंच्या या बदनामीचे अगदी मार्मिक वर्णन लेखणीतून केले होते आणि लोकांच्या समोर खरा इतिहास आणण्याच्या उद्देशाने सबळ पुरावे शोधून “संभाजी” नावाची कादंबरी लिहिली.

काळ लोटला आणि पुस्तकी युगाला मागे टाकत सोशल मीडिया नावाचे वादळ घोंगावू लागले तसे संभाजी महाराजांचा खरा इतिहास जगासमोर आणण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या समूहाला मोठे बळ आले. नाही नाही म्हणता याचे रूपांतर मोठ्या चळवळीत झाले म्हणायला अगदीच आक्षेप नसावा. आणि याच चळवळीने मोठा बदल घडवून आणला.

स्वराज्य रक्षक संभाजी, संभाजी महाराज इतिहास, मराठा इतिहास, शिवपुत्र, संभाजी TRP मीटर मध्ये अव्वल, Swarajya Rakshak Sambhaji, SambhajiRaje History
Image Source – Zee Marathi

सध्या छत्रपती शिवरायांसोबतच शंभूराजेंची क्रेझ सुद्धा वाढत चालली आहे. कोणी त्यांना “धर्मवीर” म्हणतो तर कोणी “शंभूराजे” तर कोणी “धाकलं धनी”. ज्याला अय्याशीत बुडालेला, स्त्रीच्या नशेत राहणारा आणि शिवरायांची बिघडलेली अवलाद म्हणून हिनवले त्याच शंभूराजेंचा खरा इतिहास समोर आला आणि लोक आता त्यांच्या पराक्रमाची उदाहरणे देत आहेत. काही लोकांनी रंगवलेल्या इतिहासात शंभूराजेंचा पराक्रम पुसण्याचा प्रयत्न केला पण म्हणतात ना “सूर्याला कितीही झाकण्याचा प्रयत्न करा पण तो सोनेरी किरणे घेऊन उगवतोच”. अगदी खऱ्या अर्थाने ज्यांनी हि चळवळ उभी केली, चालवली आणि मोठी केली त्या तमाम वीरांचे जीवनच सार्थकी लागले.

आपल्या सगळ्यांना माहीतच आहे छत्रपती शिवरायांचा इतिहास मालिकेच्या माध्यमातून घरोदारी घेऊन जाणाऱ्या “अमोल कोल्हे” यांनी विशेष प्रयत्न करून छत्रपती संभाजी महाराजांवर मालिका काढण्याची तयारी केली आणि त्यामध्ये त्यांना स्वतःचे घर सुद्धा विकावे लागले हे सगळ्यांना ज्ञानतच आहे. त्यांच्या या प्रयत्नांना “झी मराठी” समूहाने दिलेली मदत सुद्धा मोलाची ठरली आणि “स्वराज्य रक्षक संभाजी” मालिका साकार झाली.

महाराष्ट्रात घरोघरी सासू आणि सुनेच्या भांडणाच्या मालिका पाहणारे घर आता संभाजी महाराजांचे पराक्रम पाहण्यासाठी एकत्र बसते हेच सगळ्यात मोठे यश आहे. आता तर या मालिकेने अनेक दिग्गज मालिकांना धोबीपछाड केले आहे कारण ताज्या रिपोर्ट नुसार मराठी मध्ये स्वराज्य रक्षक संभाजी मालिका TRP मीटर मुसंडी मारली आहे आणि थेट दुसऱ्या क्रमांकावर पोचली आहे, क्षेत्रात पहिल्यांचाच वाचकांनी एका इतिहासावर आधारित मालिकेला एवढी पसंद दिली आहे. प्रेक्षकांचा प्रतिसाद असाच राहिला तर लवकरच मालिका महाराष्ट्रात TRP मीटर मध्ये अव्वल ठरण्यास वेळ लागणार नाही.

स्वराज्य रक्षक संभाजी, संभाजी महाराज इतिहास, मराठा इतिहास, शिवपुत्र, संभाजी TRP मीटर मध्ये अव्वल, Swarajya Rakshak Sambhaji, SambhajiRaje History
Image Source – Zee Marathi

कोण आहेत टॉप १० मधील मालिका?

नंबर ५
गेल्या अनेक आठवड्यापासून “चला हवा येऊ द्या” हि हास्याची मालिका सतत पाचव्या स्थानी आहे आणि अजिबात जागा सोडलेली नाही. हवेच्या टीम ने त्यांच्या मालिकेमध्ये अनेक नवीन बदल केले आहेत पण तरीही ती काही वरचढ ठरलेली नाही.

नंबर ४
संबोध भावेंची जादू चालणारी “तुला पहाटे रे” मालिका मागच्या वेळेस दुसऱ्या क्रमांकावर होती आता चक्क ती चोथ्या क्रमकावर आली आहे.

नंबर ३
गेल्या अनेक आठवड्यापासून तिसऱ्या क्रमांकावर असलेली “तुझ्यात जीव रंगला” मालिका आपले तिसरे स्थान भक्कमपणे राखून आहे.

नंबर २
स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमावर आधारित “स्वराज्य रक्षक संभाजी” मालिकेने जोरदार मुसंडी मारत दुसऱ्या क्रमांकांवर झेप घेतली आहे.

नंबर १
गेल्या अनेक आठवड्यापासून क्रमांक ०१ वर आपले स्थान अबाधित ठेवणारी “माझ्या नवऱ्याची बायको” पुन्हा आपले स्थान राखण्यात यशस्वी ठरली आहे पण आता स्वराज्य रक्षक संभाजी तिला पायउतार होण्यास भाग पडणार का ? हे पाहुणे उत्सुकतेचे ठरणार आहे.


No Fields Found.
2 Comments
  1. […] “स्वराज्य रक्षक संभाजी” च्या तलवा… […]

  2. Datta Kakade says

    Jay shivaray Jay shambhuraj

Leave A Reply

Your email address will not be published.