fbpx

पावसाळ्यात तंदुरुस्त राहण्यासाठी आपल्या आहारामध्ये या गोष्टींचा समावेश असावा

Image Source - Google

इन्फोबझ्झ वरील विविध लेखांचे आणि ताज्या बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आमचे

फेसबुक पेज नक्की लाईक करा – Facebook.com/Infobuzzz

पावसाळ्यातील आहार पुढीलप्रमाणे असावा….

आलं
 1. पावसाळ्यातील आहार रोज आलं खाल्याने पोटाचे विकार होत नाही तसेच पोट साफ होण्यास मदत होते.
 2. रोजच्या प्रत्येक पदार्थात ,चहात, सगळ्या भाज्यांमध्ये, चटणी मध्ये आलं वापरावे.
 3. आल्याने शरीरात वात होत नाही, पचन क्रिया सुरळीत राहते.
 4. आल्याचा पाक करून देखील घेऊ शकतात. सर्दी खोकला साठी सुद्धा आलं उपयुक्त आहे.
तंदुरुस्त राहण्यासाठी असा असावा पावसाळ्यातील आहार diet plan for rainy days to stay fit
Health benefits of ginger (Source – Dr. Axe)
गवती चहा 
 1. पावसाळ्यात रोज गवती चहा प्यावा.
 2. गवती चहा ने आपल्या शरीरात उष्णता निर्माण होते जी की आपल्याला या दिवसां मध्ये उपयुक्त असते.
 3. गवती चहा मध्ये अँटिऑक्सिडंट्स चा पण भरपूर प्रमाणात समावेश असतो.
 4. गवती चहा, आलं व दालचिनी वापरून आपल्याला गवती चहाचा काढा ही बनवता येऊ शकतो.
तंदुरुस्त राहण्यासाठी असा असावा पावसाळ्यातील आहार diet plan for rainy days to stay fit
Benefits of lemon grass tea (Source – PCMC News Marathi)
दालचिनी 
 1. दालचिनी सर्दी मध्ये खूप उपयुक्त आहे
 2. दालचिनी पावडर मधा मध्ये एकजीव करून ते सकाळ, दुपार आणि रात्री चाटावे, सर्दीला हा रामबाण उपाय आहे.
 3. पावसाळ्यातील आहार मध्ये  जर तळलेले पदार्थ खाऊन खोकला येत असेल तर दालचिनी पावडर 1 चमचाभर व मिरे पूड 1/2 चमचा कोमट पाण्यात एकत्रित करून दिवसभरात 2 वेळा प्यावे.
तंदुरुस्त राहण्यासाठी असा असावा पावसाळ्यातील आहार diet plan for rainy days to stay fit
Benefits of Cinnamon (Source – Onlymyhealth)
लिंबू
 1. पावसाळ्यातील आहार मध्ये लिंबू आवर्जून खावे, त्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते व त्यामुळे आपण वारंवार
  आजारी पडत नाही.
 2. लिंबु सरबत प्यावे, त्यामधे अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. तसेच पोटाचे कार्य सुरळीत चालते.
 3. या दिवसांत अस्थमाचा पण बर्याच लोकांना त्रास होतो, रोज एक ग्लास लिंबू पाणी प्यायला ने तो त्रास सुद्धा कमी होण्यास मदत होते.
तंदुरुस्त राहण्यासाठी असा असावा पावसाळ्यातील आहार diet plan for rainy days to stay fit
Benefits of Lemon (Source – One Green Planet)
हळद 
 1. हळद ही खूप जास्त गुणकारी आहे.
 2. खोकला जर झाला असेल तर 1/2 चमचा हळद 1 ग्लास दुधात थोडी सुंठ टाकुन उकळी आणावी व रोज रात्री झोपताना प्यावे.
 3. हळद ही रक्त शुद्धीत करते आणि रक्तातील साखरेचे प्रमाण सुद्धा नियंत्रित ठेवते.
तंदुरुस्त राहण्यासाठी असा असावा पावसाळ्यातील आहार diet plan for rainy days to stay fit
Benefits of turmeric (Source – Mother Nature Network)
पाणी
 1. पावसाळ्यात पाण्याचे प्रमाण अधिक ठेवावे, त्यामुळे शरीरातील टॉक्सिन्स (Toxins) बाहेर पडायला
  मदत होते.
 2. पाण्याने रक्तप्रवाह सुरळीत राहतो.
तंदुरुस्त राहण्यासाठी असा असावा पावसाळ्यातील आहार diet plan for rainy days to stay fit
Benefits of drinking water (Source – Everyday Health)
लसुण
 1. ह्या दिवसांत हृदयविकार/हृदय झटका येण्याची खुप जास्त शक्यता असते. हृदय विकार असलेल्या रुग्णांनी रोज ५-६ कच्या लसणाच्या पाकळ्या सॅलडमध्ये खाल्ल्या तर त्याचा चांगला फायदा होतो.
तंदुरुस्त राहण्यासाठी असा असावा पावसाळ्यातील आहार diet plan for rainy days to stay fit
Benefits of eating garlic (Source – The Kitchn)
हिंग 
 1. हिंग रोजच्या प्रत्येक भाजीच्या फोडणीमध्ये काही प्रमाणात टाकावा.
 2. ह्या दिवसांत आपली पचनक्रिया मंदावते व त्यामुळे गॅसेस भरपुर प्रमाणात होतात, हिंग गॅसेस न होण्यासाठी उपयोगात येते.
तंदुरुस्त राहण्यासाठी असा असावा पावसाळ्यातील आहार diet plan for rainy days to stay fit
Health Benefits of Asafoetida (Source – 1mg)
गुळाचा चहा 
 1. पावसाळ्यामध्ये गुळाचा चहा प्यावा. चहामध्ये साखरेऐवजी गुळ टाकून चहा करावा.
 2. गुळ हा उष्ण असतो आणि उष्णतेची गरज आपल्याला पावसाळ्यात जास्त प्रमाणात भासते.
तंदुरुस्त राहण्यासाठी असा असावा पावसाळ्यातील आहार diet plan for rainy days to stay fit
Benefits of drinking jaggery tea (Source – Zee News – India.com)
तुळस 
 1. पावसाळ्यात तुळस आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढवते.
 2. तुळशीचे रोज ५ पानं खाल्याने आपले शरीर निरोगी राहण्यासाठी मदत होते.
 3. तुळशीचा काढा पावसाळ्यातील सर्दी, खोकल्यावर खुप उपयुक्त आहे.
तंदुरुस्त राहण्यासाठी असा असावा पावसाळ्यातील आहार diet plan for rainy days to stay fit
Benefits of Basilica (Tulsi) plant. (Source – Zee News – India.com)

दुधाचे विविध प्रकार आणि फायदे – तोटे तुम्हाला माहित आहेत का ?

लवंग 
 1. पावसाळ्यातील आहार मध्ये लवंगचा समावेश केल्यास फार उपयुक्त ठरते.
 2. लवंग भाजुन जर तोंडात चघळत राहिले तर खोकला नाहीसा होतो.
 3. लवंग भाजुन व मधा मध्ये मिसळुन चाटण घेतल्यास फायदा होतो.
तंदुरुस्त राहण्यासाठी असा असावा पावसाळ्यातील आहार diet plan for rainy days to stay fit
Health benefits of cloves (Source – LikeMarathi)
ग्रीन टी
 1. ग्रीन टी हा अँटिऑक्सिडंट्सने भरपूर असतो. ग्रीन टी पिल्याने शरीरातले टॉक्सिन्स बाहेर पडायला मदत होते.
 2. ग्रीन टी मध्ये आलं, गवती चहा, तुळस, पुदिना टाकून सुद्धा पिऊ शकतो.
तंदुरुस्त राहण्यासाठी असा असावा पावसाळ्यातील आहार diet plan for rainy days to stay fit
Health benefits of green tea (Source – Beauty & Health Tips)

Disclaimer – इन्फोबझ्झ एक इंफोटेन्मेन्ट पोर्टल आहे, आम्ही तुम्हाला विविध गोष्टीची माहिती देऊन अपडेटेड ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. आरोग्यविषयक माहिती तज्ञ व्यक्तींसोबत चर्चा करून दिलेली आहे. अधिक माहिती हवी असल्यास आहारतज्ज्ञ पूजा देवरे यांना संपर्क साधावा. कोणत्याही नुकसानीस इन्फोबझ्झ जबाबदार राहणार नाही.

3 Comments
 1. […] पावसाळ्यात तंदुरुस्त राहण्यासाठी आप… […]

 2. […] पावसाळ्यात तंदुरुस्त राहण्यासाठी आप… […]

Leave A Reply

Your email address will not be published.