fbpx

दहशतवाद्यांना पळता भूई थोडी, 21 मिनिटांचा #surgicalstrike2

१४ फेब्रुवारीला झालेल्या दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात भारताच्या केद्रीय राखीव दलाचे तब्बल ४० जवान शाहिद झाले अन देशभरात एकाच संतापाची लाट उसळली. प्रत्येकाच्या मनात फक्त बदला घेण्याची आगच संचारली होती. अनेकांनी मात्र पाकीस्थानसोबत चर्चा करून यावर तोडगा काढण्याचं सांगितलं तर अनेकांनी चक्क पाकला पाठिंबा दिला पण या सगळ्यांना जनतेच्या मोठ्या रोषाला सामोरे जावे लागले.

बालाकोट येथे घुसून भारतीय हवाई दलानं पाक व्याप्त काश्मीरमध्ये मोठा हवाई हल्ला केला आहे, अधिक माहितीनुसार हा हल्ला पहाटेच्या सुमारास करण्यात आला आहे. या कारवाईनंतर मात्र पाकिस्थान पूर्णपणे बिथरला असून सैन्याची जुळवा जुळवा करण्यास लागला आहे. हवाई दलाच्या केलेल्या या कारवाईमध्ये पाक व्याप्त काश्मीर मध्ये वास्तव्यास असलेल्या 200 ते 300 दहशतवादी ठार झाल्याची माहिती समोर येत आहे पण अजून हवाई दलाने याबाबत कोणतेही अधिकृत वृत्त दिल नाहीय.

बालाकोट येथे घुसून भारतीय हवाई दलानं पाक व्याप्त काश्मीरमध्ये येथे Air strike करून पाकला अद्दल घडवण्याचा निर्णय हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतल्याची माहिती न्यूज18च्या सुत्रांनी दिली आहे. हल्ल्यानंतर राजकीय नेतेमंडळींसह देशभरातील सर्वसामान्य लोकांनी याचा तीव्र निषेध करत झालेल्या हल्ल्याचा बदला घेण्याबद्दल सरकारला सुनावले होते, तेव्हा पंतप्रधानांनी स्पष्ट केले होते कि आम्ही गप्प बसणार नाही पण बदल घेण्याची वेळ आणि जागा भारतीय सैन्यच ठरवेल आणि या कामाला पूर्ण रूप देऊन पाकिस्थानाला आयुष्यभरात सगळ्यात मोठी अद्दल घडवेल.

हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे, राजकीय नेतेमंडळींसह देशभरातील सर्वसामान्य लोकांनी याचा तीव्र निषेध करत झालेल्या हल्ल्याचा बदला घेण्याबद्दल सरकारला सुनावले आहे. यानंतर हल्ल्याची तीव्रता पाहता मोदी सरकारने तातडीची कारवाई करत सैन्याला पूर्ण मोकळीक दिली आहे. आताच आलेल्या माहितीनुसार जैश चा कमांडर सैन्याचा हल्ल्यात मारला गेला आहे. या आधी भारताने पाकिस्थानाला NFN दर्जा काढून जोरदार दणका दिला होता.

No Fields Found.

Leave A Reply

Your email address will not be published.