fbpx

#BhimaKoregaon : काय आहे भीमा कोरेगावचा इतिहास ?

Image

महाराष्ट्रातील भीमा-कोरेगाव मध्ये 2018 ला झालेल्या जातीय हिंसाचाराला आता वर्षपूर्ती झाली आहे. या संपूर्ण प्रकरणावर बरीच खलबते झाली आहेत, संपूर्ण प्रकरणाची अजूनही चौकशी चालू आहे.

तब्बल 200 वर्षं पूर्ण झालेल्या या पराक्रमाबद्दल मागील वर्षीपर्यंत एवढे महत्व प्राप्त झाले नव्हते पण २०१८ मध्ये म्हणजेच मागच्या वर्षी झालेल्या जातीय दंगलीमुळे अख्खा महाराष्ट्र हादरला, इतकच काय या घटनेने महाराष्ट्रासह देशाचं वातावरण ढवळून गेलं, अनेक समाजकंटकांनी याचा फायदा घेत अजून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला, तर प्रत्येकाने आपली पोळी भाजून घेतली. आज वर्षपूर्ती होत आली मात्र क्रिया-प्रतिक्रीया अजूनही थांबायला तयार नाहीत. आज 1 जानेवारी 2019 ला इतिहासातील भीमा-कोरेगावच्या लढाईतील विजयी दिवसाला २०१ वर्षे पूर्ण होत आहेत, पण अजूनही अनेक लोकांना भीमा कोरेगावचा नेमका इतिहास काय ? याची कल्पना नाही. म्हणूनच जाणून घेऊया भीमा कोरेगावचा इतिहास काय ……

bhima koregaon, bhima koregaon in marathi, bhima koregaon news, bhima koregaon history, bhima koregaon violence, In marathi, भीमा कोरेगाव, भीमा कोरेगावचा इतिहास, दलित अस्मिता
Image Source – Goodreads

इंग्रजांची मराठ्यांशी टक्कर

जेम्स ग्रांट डफ या इंग्रज अधिकाऱ्याने आपल्या ‘ए हिस्टरी ऑफ द मराठाज’ नावाच्या पुस्तकात लढाईचा उल्लेख केला असल्याचे आढळते. मराठा – इंग्रज सैन्यामध्ये पहिले युद्ध संपले होते आणि बराच काळ लोटला होता, आता पुन्हा इंग्रजांना हिंदुस्थान काबीज करण्याची आस होती पण मध्ये मराठा (पेशवे) सत्ता येत होती. यातूनच 1 जानेवारी 1818 रोजी रघुनाथराव यांचे पुत्र पेशवा दुसरा बाजीराव आणि इंग्रजांमध्ये हे युद्ध झाले. यावेळी पुणे इंग्रजी सैन्याच्या अधिपत्याखाली होते, राजधानी पुणे मिळवण्याच्या उद्देशाने पेशवा दुसरा बाजीराव मोठ्या फौज फाट्यासह पुण्याच्या दिशेने चालून गेला.

पेशव्यांच्या या चालीबाबत इंग्रजांना माहिती मिळताच त्यांनीही दोन हात करण्यासाठी सैन्याची पूर्ण तयारी केली, देशातील इतर भागातून अधिकचे सैन्य सुद्धा बोलवण्यात आले. यावेळी नेतृत्व कॅप्टन फ्रांन्सिस एफ. स्टॉन्टन यांच्या हाती देण्यात आले. इतिहासकारांच्या माहितीनुसार पेशव्यांकडे २८००० हजार सैन्य होते तर इंग्रजांकडे फक्त ८०० लोकांचं सैन्य होत. आता याबाबत अधिकृत माहिती कुठेही नाही पण वेगवेगळ्या इतिहासकारांच म्हणणं वेगवेगळं आहे.

bhima koregaon, bhima koregaon in marathi, bhima koregaon news, bhima koregaon history, bhima koregaon violence, In marathi, भीमा कोरेगाव, भीमा कोरेगावचा इतिहास, दलित अस्मिता
Image Source – Scroll.in

दोन्ही सैन्य एकमेकांच्या दिशेने चालून आले, भीमा नदीच्या काठावर भीमा कोरेगाव इथं सैन्याची गाठ पडली आणि दोघांत तुंबळ हाणामारी झाली. इंग्रज सैन्यात “बॉम्बे नेटिव्ह इन्फँट्री” नावाची तुकडी होती ज्यात ५०० महार सैनिक होते, याच तुकडीने पेशव्यांच्या बलाढ्य सैन्याला एक इंचही पुढे सरकू न देता तब्बल १२ तास रोखून धरलं. यानंतर देशभरातून बोलावलेल्या इंग्रज सैन्याच्या इतर तुकड्या येत असल्याची जाणीव पेशव्यांना झाली. त्यामुळे पेशवा दुसरा बाजीरावने युद्धातून काढता पाय घेतला.

या ऐतिहासिक लढाईमध्ये इंग्रजांच्या फक्त २७५ सैनिकांचा मृत्यू झाला तर बलाढ्य पेशव्यांचे ५०० ते ६०० च्या आसपास सैनिक मृत्युमुखी पडल्याचे दाखले अनेक पुस्तकामधून देण्यात आले आहेत. हा लढाई जिंकण्याच्या दिवस १ जानेवारीची पाहत होती. या लढाईत “बॉम्बे नेटिव्ह इन्फँट्री” च्या महार सैनिकांनी शौर्य दाखवले म्हणूनच विजय मिळाला, आणि त्याच प्रतीक म्हणून इंग्रजांनी त्याठिकाणी विजय स्तंभ उभा करून धारातिर्थी पडलेल्या सैनिकांची नाव कोरली.

या युद्धाला दुसरे मराठा – इंग्रज युद्ध म्हणून सुद्धा ओळखले जाते. पण जर लढाई पेशवे आणि इंग्रजांमध्ये झाली तर मराठ्यांचं नाव का घेतलं जाते ?

मराठ्यांचं नाव का घेतलं जाते ?

या युद्धाला दुसरे मराठा – इंग्रज युद्ध म्हणून सुद्धा ओळखले जाते. पण जर लढाई पेशवे आणि इंग्रजांमध्ये झाली तर मराठ्यांचं नाव का घेतलं जाते ? याच कारण असं आहे मराठ्यांचं राज्य पेशवाईत ब्राह्मणांच्या हाती होतं. पण हे राज्य संभाजीपुत्र शाहूंच्या नावानेच चालवले जात होते. या लढाईमध्ये पेशवे पूर्ण ताकदीनिशी लढले होते.

ब्रिटिशांना पेशवाईला उध्वस्त करून आपली सत्ता आणायची होती, आणि म्हणूनच त्याकाळी अतिशय अपमानास्पद वागणूक दिली जाणाऱ्या महार समाजातील व्यक्तींना ब्रिटिशांनी हाताशी घेऊन पेशवाई संपुष्टात आणली.

bhima koregaon, bhima koregaon in marathi, bhima koregaon news, bhima koregaon history, bhima koregaon violence, In marathi, भीमा कोरेगाव, भीमा कोरेगावचा इतिहास, दलित अस्मिता
Image Source – Dr. BR Ambedkar’s Caravan

दलित अस्मिता

त्यावेळी दलित लोकांना अतिशय अपमानास्पद वागणूक दिली जात असे. दलितांना त्यांचे मूलभूत अधिकारही मिळत नव्हते आणि याची प्रचंड सल त्यांच्या मनात होती. झालेल्या अन्यायाचा वचपा काढण्याच्या उद्देशानेच दलितांनी ब्रिटिशांशी हातमिळवणी केली आणि आपल्या प्राणाची बाजी लावून युद्धात लढले. या प्रयत्नात त्यांनी पेशव्यांना हरवले आणि हा विजय “दलित अस्मितेचं प्रतिक” बनलं.

०१ जानेवारी १९२७ रोजी बाबासाहेब आंबेडकरांनी भीमा कोरेगावला येऊन या विजयी स्तंभाला भेट देऊन आदरांजली अर्पण केली होती, यानंतर दरवर्षी ०१ जानेवारीला इथं येऊन अभिवादन करण्याची प्रथा पडली.


No Fields Found.
4 Comments
 1. एक वाचक says

  ब्राम्हणांनी मराठ्यांचा नाव बदनाम केले पानिपत असो किंवा भीमा कोरेगांव

  1. Anirudh Gautam Pawar says

   वेळीच बामनांचे षडयंत्र ओळखून बौद्ध मराठा एक व्हावे

   1. Anonymous says

    बरोबर

 2. Vaibhav says

  Aani tyanchymulech marathi samrajya maharashtra baher gele agdi atkepar

Leave A Reply

Your email address will not be published.