fbpx

स्वराज्याच्या सरसेनापतींचा पराक्रम आता रुपेरी पडद्यावर

‘छत्रपती शिवाजी महाराज कि जय’ असं म्हटलं कि महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या अंगातलं रक्त सळसळायला लागतं. स्वराज्य उभं राहिलं ते शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाने आणि कुठलाही विचार न करता महाराज आणि स्वराज्यासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या सरदार आणि मावळ्यांमुळे. स्वराज्याच्या अनेक शूरवीर सरदारांवर चित्रपट येऊन गेलेत आणि अश्याच एका सरदाराच्या पराक्रमाची गाथा मांडणारा चित्रपट लवकरच तुमच्या भेटीला येणार आहे.

स्वराज्यरक्षक संभाजी ह्या मालिकेतून स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते ह्यांची पुन्हा एकदा नव्यानं ओळख सर्वाना झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर शंभूराजेंच्या पाठीशी ठामपणे उभे राहणारे स्वराज्याचे सरसेनापती आणि पराक्रमी योद्धा हंबीरराव मोहिते ह्यांचा जीवनप्रवास मांडणार आहेत सुप्रसिद्ध दिग्दर्शक व अभिनेता प्रवीण तरडे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज ह्या दोन्ही छत्रपतींच्या काळात, स्वराज्याचे सेनापती पद निष्ठेने सांभाळणारे व आपल्या पराक्रमाच्या जोरावर स्वराज्याला समृद्ध करण्यास मदत करणारे सेनापती हंबीरराव मोहिते ह्यांच्यावर आधारित ह्या चित्रपटात अनेक दिग्गज कलाकारांची फौज असणार आहे.

pravin tarade, sarsenapati hambirrao mohite,  hambirrao mohite biopic, shivaji maharaj, hambirrao mohite film, शिवाजी महाराज, संभाजी महाराज, सरसेनापती हंबीरराव मोहिते, हंबीरराव मोहितेंवर चित्रपट
Pravin tarade announce hambirrao mohite biopic (Source – Times Now)

हा चित्रपट २०२० साली प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून, त्यात हंबीरराव मोहितेंची भूमिका कोण साकारणार आहे ते अजून जाहीर करण्यात आलेले नाही. चित्रपटाची कथा,पथकथा व संवाद ह्याची धुरा प्रवीण तरडे यांच्या खांद्यावर असून ह्या चित्रपटाची निर्मिती शिवनेरी फाऊंडेशन करणार आहे. हंबीरराव मोहिते हे महाराणी सोयराबाईंचे बंधू होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर राजाराम महाराजांनी छत्रपती बनावे अशी अनेकांची इच्छा होती व त्यासाठी अनेक कट कारस्थानं करण्यात आली होती.

pravin tarade, sarsenapati hambirrao mohite,  hambirrao mohite biopic, shivaji maharaj, hambirrao mohite film, शिवाजी महाराज, संभाजी महाराज, सरसेनापती हंबीरराव मोहिते, हंबीरराव मोहितेंवर चित्रपट
(Source – Google)

पण अश्या परिस्थितीत सेनापती हंबीररावांनी शम्भूराजेंनाच साथ दिली. त्या परिस्थितीत शंभूराजेंनीच छत्रपती व्हावे ह्यासाठी सेनापती हंबीररावांनी शंभूराजेंना भक्कम साथ दिली. अश्या ह्या शूर व पराक्रमी मराठा मावळ्याचा जीवनप्रवास रुपेरी पडद्यावर पाहणे निश्चितच सुखावह ठरणार आहे. कथा,पटकथा ,संवाद व दिग्दर्शन प्रवीण तरडे ह्यांचे असेल, तर चित्रपटाची गीतं प्रवीण कुलकर्णी ह्यांनी लिहिली आहेत व त्याला संगीतबद्ध केले आहे, नरेंद्र भिडे ह्यांनी. चित्रपटाचे निर्माते आहेत संदीप मोहिते पाटील, सौजन्य निकम व धर्मेंद्र बोरा.

pravin tarade, sarsenapati hambirrao mohite,  hambirrao mohite biopic, shivaji maharaj, hambirrao mohite film, शिवाजी महाराज, संभाजी महाराज, सरसेनापती हंबीरराव मोहिते, हंबीरराव मोहितेंवर चित्रपट
Pravin Tarades next film on biopic of Hambirrao Mohite (Source – Loksatta)
No Fields Found.

Leave A Reply

Your email address will not be published.