fbpx

खेलो इंडिया यूथ गेम्समध्ये “महाराष्ट्राचा डंका”

सरकारने आयोजित केलेल्या ‘खेलो इंडिया यूथ गेम्स’मध्ये महाराष्ट्रातील ग्रामीण आणि आदिवासी भागातील अनेक खेळाडू पदकांची अक्षरशः लयलूट करून छाप पाडत आहेत.

महाराष्ट्राचे सांस्कृतिक माहेरघर पुणे येथील शिवछत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स,बालेवाडी येथे संपन्न होत असलेल्या “खेलो इंडिया” ह्या भव्य क्रीडा सोहळ्यात महाराष्ट्राने अव्वल स्थान पटकावत पदकांची अक्षरशः लयलूट केली आहे.

जलतरण

महाराष्ट्रासाठी मंगळवार हा विशेष दिवस ठरला. जलतरण स्पर्धेमध्ये मुंबईच्या ज्योती पाटील हिने २१ वर्षांखालील मुलींच्या गटात २०० मीटर ब्रेस्टस्ट्रोक प्रकारात सुवर्णपदक पटकावले व महाराष्ट्राच्या खात्यात बहुमूल्य अशा सुवर्ण पदकाची भर घातली.

खेलो इंडिया, खेलो इंडिया यूथ गेम्स, महाराष्ट्राचा डंका, Khelo India Youth Games, Khelo India, Khelo India in marathi
Image Source – The Indian Express

ज्योती पाटीलने हे अंतर केवळ २ मिनिटे आणि ४३.५४ सेकंदात पार केले. ह्या क्रीडा प्रकारात केवळ एका सेकंदाच्या फरकावर सामन्याचा निकाल अवलंबून असतो व अशा ह्या चुरशीच्या शर्यतीमध्ये ज्योती पाटील हिने गुजरातची कल्याणी सक्सेना व कर्नाटकची हर्षिता जयराम ह्या दोघींचा पराभव करत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. तर दुसरीकडे आकांक्षा बुचडे हिने २१ वर्षांखालील बटरफ्लाय प्रकारातील १०० मीटरच्या स्पर्धेत रौप्यपदक पटकावले.

खो-खो

खो-खो मध्ये केरळ व आंध्रप्रदेशचा पराभव करत मुले व मुलींच्या खो-खो संघाने उज्वल यश संपादन केले. खो-खो मुलींच्या संघाने आंध्रप्रदेश संघाचा १२ गूण फरकांनी दणदणीत पराभव केला पण महाराष्ट्राच्या मुलांच्या खो-खो संघाला केरळवर विजय मिळवताना मात्र चांगलाच घाम गाळावा लागला. अटीतटीच्या सामन्यात मुलांच्या खो खो संघाने केरळवर १७-१३ अशा ४ गुणांनी मात केली

खेलो इंडिया, खेलो इंडिया यूथ गेम्स, महाराष्ट्राचा डंका, Khelo India Youth Games, Khelo India, Khelo India in marathi
Image Source – Scroll.in

कबड्डी

कबड्डी ह्या क्रीडाप्रकारात मात्र महाराष्ट्राची काहीशी निराशा झाली. ह्या क्रीडा प्रकारातील २१ वर्षांखालील मुलींच्या गटाने आंध्रप्रदेशचा ३१-१९ असा धुव्वा उडवला व पुढील फेरीत प्रवेश मिळवण्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकले तर ह्याच क्रीडाप्रकारातील १७ वर्षाखालील मुलींच्या संघाला हरियानाकडून पराभव पत्करावा लागला.

बास्केटबॉल

बास्केटबॉल क्रीडा प्रकारात मात्र महाराष्ट्राने उत्तरप्रदेशचा सहज पराभव करून आपले सामर्थ्य दाखवून दिले. ह्या सामन्यात महाराष्ट्राचा समीर कुरेशी ह्याने केलेली उल्लेखनीय कामगिरी महाराष्ट्राच्या संघासाठी अतिशय मोलाची ठरली. महाराष्ट्राच्या २१ वर्षाखालील मुलांच्या संघाने उत्तरप्रदेश संघाला ७४-६७ असे नमविले. तर मुलींच्या १७ वर्षाखालील गटातील सामन्यामध्ये महाराष्ट्राला तामिळनाडूकडून ६३-७१ असा पराभव स्वीकारावा लागला.

बॉक्सिंग

आपल्या अप्रतिम खेळाच्या बळावर बॉक्सिंग क्रीडा प्रकारात देविका घोरपडे आणि लक्ष्मी पाटील ह्या महाराष्ट्राच्या खेळाडूंनी उपांत्य फेरीत धडक मारली देविका घोरपडेने ४६ किलो वजन गटात गोव्याची बॉक्सर आरती चौहान हिला ५-० अशा गुणफरकाने पराभूत केले तर दुसरीकडे लक्ष्मी पाटीलने मध्यप्रदेशच्या बॉक्सरला सहज पराभूत केले.

खेलो इंडिया, खेलो इंडिया यूथ गेम्स, महाराष्ट्राचा डंका, Khelo India Youth Games, Khelo India, Khelo India in marathi
Image Source – Latestly

वेटलिफ्टिंग

वेटलिफ्टिंग प्रकारात २१ वर्षांखालील मुलींच्या गटात स्नेहल भोंगळेने सुवर्ण पदकाची कमाई करत स्वतःचाच जुना विक्रम मोडीत काढला. हि कामगिरी स्नेहलने ८७ किलो वजनी गटात करून दाखविली. त्या खालोखाल उत्तर प्रदेश व केरळच्या खेळाडूंनी अनुक्रमे रौप्य पदक व कांस्य पदक जिंकून आपापल्या राज्यांच्या पदक संख्येमध्ये मोलाची भर घातली.

टेनिस

टेनिसमध्ये देखील हं कुछ काम नही हे महाराष्ट्राने सिद्ध केले. १७ वर्षाखालील मुलांच्या स्पर्धांमध्ये आर्यन भाटियाने हरियाणाच्या खेळाडूवर ६-४, ६-४ असा विजय मिळवला व स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. ह्याच वयोगटातील दुसऱ्या सामन्यात सानिष ध्रुवने पुद्दुचेरीच्या अभिषेक रुद्रेश्वर ह्याला सहज पराभूत केले. २१ वर्षाखालील मुलींच्या गटात गुणी टेनिसपटू मिहिका यादवने आपली प्रतिस्पर्धी काव्या बालसुब्रमण्यम हिला ६-०, ६-२ असे नमविले.


No Fields Found.

Leave A Reply

Your email address will not be published.