fbpx

धूलिवंदन आणि रंगपंचमी या दोन दिवसांमध्ये काय फरक आहे ? रंग कोणत्या दिवशी खेळतात ?

फाल्गुन शुद्ध पौर्णिमा म्हणजे होळी पौर्णिमा. होळीचं अजून एक नांव “हुताशनी पौर्णिमा” असे सुद्धा आहे.

हिरण्यकश्यपूची बहीण होलिका हिने विष्णू – भक्त प्रल्हादाला मांडीवर घेऊन अग्नीत प्रवेश केला आणि त्याला मारण्याचा प्रयत्न या दिवशी केला होता. होलिकेला अग्निदेवाचे वरदान होते की, ती कोणत्याही प्रकारच्या अग्नीने जळणार नाही, पण तिने ह्या वरदानाचा उपयोग वाईट कामासाठी केला, त्यामुळे ती अग्नीत जळून भस्मसात झाली अशी आख्यायिका ह्या होळी पौर्णिमेची आहे.

द्वापरयुगात सुध्दा गोकुळात बालगोपाळ, कृष्ण आणि सगळे सवंगडी मित्र आपल्या पिचकारीने रंगीत पाणी उडवीत आणि त्यातून वसंत ऋतुतील उन्हाची तीव्रता कमी करीत असत, आणि त्यातून एकमेकांच्या खोड्या काढून मजा – मस्ती करत असत. फाल्गुन कृष्ण पंचमीला रंग-पंचमी हा सण साजरा केला जातो. होळीच्या दिवशी सुरू होणार्या वसंतोत्सवाला रंगपंचमीला पाच दिवस पूर्ण होतात. आधी होळी, दुसऱ्या दिवशी धुलीवंदन (धुळवड), नंतर येणारी रंगपंचमी. भक्त प्रल्हादाची होळीची गोष्ट आपल्याला माहीतच आहे, पण आधुनिक होलिका दहनामध्ये सर्व अनिष्ट गोष्टी व विचार रूढी, परंपरा नष्ट करणे अपेक्षित आहे.

धूलिवंदन, रंगपंचमी, होळी, होळीचं महत्व, holi festival, holi 2019, holi in marathi, rangpanchami, dhuliwandan

The Holi Puja (Source – freepressjournal.in)

होळीची पुजा होते आणि त्यानंतर साजुक तुप घातलेल्या गरमागरम पुरणपोळ्या, तूप, आमटी, भात, भजे, पापड असा फक्कड बेत जमतो. प्रत्येक सण-समारंभामागे सर्व परिवाराने एकत्र येणे आणि आनंद साजरा करणे हाच उद्देश असतो. धुलीवंदन, रंगपंचमी (आजकाल दोन्हीमधला फरक समजत नाही अनेकांना) ची तर मजा काही औरच असते. पूर्वी होळी पेटवून त्याची झालेली राख दुसऱ्या दिवशी अंगाला लावून मग अंघोळ केली जायची, त्याला धुलीवंदन किंवा धुळवड म्हणतात. ही राख औषधी असल्याने त्वचारोगात लाभदायक असायची तसेच शरीरातील उष्णता सुद्धा कमी होते असे.

नंतर ५ दिवस अशी धुळवड साजरी करून पंचमीला रंगीत पाणी उडवून रंगपंचमी साजरी होत असे. आपले आयुष्य किती रंगीबेरंगी आहे याची जाणीव करुन देणारा हा सण. कडक उन्हामधे गारवा देणारे रंग (अर्थात ते हर्बल असतील तरंच). पाण्याचे फुगे, पिचकाऱ्या, पाण्याच्या हौदात रंग घालून डुंबणे, त्यात खेळणे म्हणजे लहान मुलांसाठी तर चांगलीच चंगळ असते, आणि अश्या प्रकारे बालपणाचा खरा आनंद देणारा हा सण आहे. भगवान श्रीकृष्णाने मथुरा आणि वृंदावन येथे गोप-गोपींसह रंगपंचमी खेळल्याची अनेक उदाहरणे आहेत.

धूलिवंदन, रंगपंचमी, होळी, होळीचं महत्व, holi festival, holi 2019, holi in marathi, rangpanchami, dhuliwandan
Holi celebration in Mathura (Source – TripSavvy)

त्यावरची काव्ये आणि चित्रे पण चांगलीच लोकप्रिय आहेत. पण आजकाल प्रत्येक सणांचे स्वरूप बीभत्स होत चालले आहे. तशीच रंगपंचमी सुद्धा इतकी मोहक राहिलेली नाही. रंगपंचमीच्या दहा – पंधरा दिवस आधीपासूनच पाण्याने भरलेले फुगे,अंडी मुली आणि महिला यांच्यावर फेकले जातात. दुधवाले, भाजीवाले, दुचाकीस्वार, कुत्रे, शेळ्या, गाई, मांजरे, गाढव ह्यांना सुद्धा टारगट मुले रंग व पाणी टाकून सळो की पळो करून टाकतात. यातून काहींना तर जन्माचे वैगुण्य आल्याच्या अनेक घटना वाचनात आहेत.

त्या विरोधात कायदे बनवले असले तरी ते पुरेसे नाहीत. ही एक प्रकारची विकृती म्हणावी लागेल. अगदी शाळेतच या गोष्टीला प्रारंभ होतांना दिसतो. होळी आणि मद्यपान हे अविभाज्य असल्यासारखे वागून संस्कृतीची विकृती झाली आहे. या सगळ्यामुळे रंगपंचमीचा ‘रंग’ पार बिघडला आहे. त्याचबरोबर वापरलेल्या रंगामधील रासायनिक घटकांचे दुष्परिणाम अनेकांना भोगावे लागतात. सणाचा आनंद मिळण्याऐवजी त्यामुळे जर दुःख अथवा त्रास होत असेल तर आपले नक्कीच कुठेतरी चुकत आहे असे म्हणावे लागेल.

धूलिवंदन, रंगपंचमी, होळी, होळीचं महत्व, holi festival, holi 2019, holi in marathi, rangpanchami, dhuliwandan
Kids Colourful Holi (Source – FirstCry Parenting)

रंग खेळताना काय काळजी घ्यावी व अनैसर्गिक प्रकारच्या रंगांचा परिणाम आरोग्यावर कसा होतो ते थोडक्यात पाहू.

  • रासायनिक द्रव्य किंवा जड धातूचा अगदी लहान कण जरी गुलालात असला, तर ऍलर्जी होऊन पुरळ येतात.
  • गुलाल कानांच्या मागे जमा झाल्यास बुरशी येऊन कानांच्या मागे मोठे पुरळ येतात.
  • केसात रंग तसाच राहून गेला तर केसांमध्ये कोंडा होतो आणि केस गळण्यास सुरुवात होतो. हा एकप्रकारचा त्वचारोग आहे.
  • नाकात रंग गेल्यास नाकातून सतत पाणी वाहने व सर्दी, डोकेदुखी सारखे त्रास सुरु होतात.
  • रंग खेळण्यात लहान मुलांचे प्रमाण सर्वात जास्त असते. ही मुले स्वच्छ आंघोळ करत नाहीत आणि रंग अंगावर थोड्या प्रमाणात राहून जातो. विशेषत: केसात, परिणामी बुरशीजन्य त्वचारोग होतात असे तज्ञ डॉक्टर सांगतात.
  • रंगामध्ये रांगोळी किंवा बर्याचदा चकाकी येण्यासाठी काचेच्या पावडरचा वापर करतात, याचा डोळ्यांना त्रास होतो.
  • डोळ्यांमध्ये रंग गेल्यास डोळ्यांच्या बुबुळांवर चरे, जखम अथवा पांढरे डाग पडून डोळ्यांना कायमचा अपाय होतो.
  • रंग जर पोटात गेला तर उलट्या आणि जुलाबाचा त्रास होण्याची शक्यता असते.
  • रंग जर फुफ्फुसात गेला तर कालांतराने श्वसनविकार उद्भवतात.

No Fields Found.

Leave A Reply

Your email address will not be published.