fbpx

भारतीय वायुसेनेचे १० खुंखार लढाऊ विमानं, वायुसेनेच्या ताकदीचा तुम्हाला अंदाजा पण नाही

Image Source - Google

भारतीय वायुसेनेने २६ फेब्रुवारीला मंगळवारी पहाटे केलेल्या भीषण एअर स्ट्राईकने भारतीय वायुसेनेच्या शक्तीची, सामर्थ्याची चर्चा पुन्हा एकदा सुरु झाली. मिराज – २००० ह्या जगातील सर्वश्रेष्ठ विमानांपैकी एक असलेल्या ह्या विमानाने पाकिस्तानात घसून तब्बल १००० किलो वजनाचे बॉम्ब दहशतवादी तळावर सोडले, ज्यात दहशतवादी कॅम्प्सच्या चिंधड्या उडाल्या. अश्या ह्या शक्तिशाली भारतीय वायुसेनेचे प्रेरणा वाक्य आहे, “नभ:स्पृश्यम दीप्तम”.


गीतेतील ११ व्या अध्यायातून घेतलेले हे वाक्य भगवान विष्णूला उद्देशून आहे. म्हणजेच, नभाला स्पर्श करणारा दैदिप्यमान!. तर, नभाला स्पर्श करण्यासाठी असलेली भारतीय वायुसेनेतील आयुधे म्हणजे वायुसेनेकडे असलेली अमूल्य लढाऊ विमाने. जाणून घेऊया त्याबद्दल काही खास. भारतीय वायू सेना (IAF) ही १,४०,००० सक्रिय कर्मचारी आणि सुमारे १८२० सक्रिय विमानं असलेली जगातील चौथी सर्वात मोठी वायुसेना आहे. आय.ए.एफ. (IAF) ची मुख्य जबाबदारी म्हणजे, भारतीय वायुक्षेत्र सुरक्षित राखण्यासाठी हवाई युद्ध करणे, तसेच थल सेना आणि नौ दल ह्यांना सहकार्य करणे. सध्या जे भारतीय वायुसेनेद्वारे वापरात असलेली मुख्य १० प्रकारची विमानं आहेत, त्यांची माहिती जाणून घेऊया.

१. सुखोई सु – ३० एम.के.आय.

सुखोई सु – ३० एम.के.आय. हे रशियामध्ये सुखोई डिझाइन ब्यूरोकडून विकसित केलेलं एक बहुपयोगी लढावू विमान आहे, आणि त्यासाठी भारताचे एच ए एल (HAL) परवाना प्राप्त आहे. भारतीय वायुसेनेत सध्या २००, सु -३० एम.के.आय जेट विमाने सक्रिय आहेत. या जेटला दोन लयुल्का अल-३१ एफ पी थ्रस्ट वेक्टरिंग टर्बो फॅनद्वारे चालविण्यात येते, जे प्रत्येकी २७,५६० पौंड शक्ती निर्माण करतात. हे जेट २१०० कि.मी. प्रति तास पर्यन्त सर्वोच्च गती मिळविण्यास सक्षम आहे. हे तांत्रिकदृष्ट्या सर्वोत्कृष्ट जेट आहे, आणि आपल्या वायुसेनेचे मुकुट आहे.

indian air force, iaf, fighter jets, fighter planes, indian air force power, mig 29, sukhoi 30, rafale, mirage 2000, tejas, sepecat jaguar, mig21
Sukhoi-30 MKI  (Source – Russia Beyond )

२. डेसॉल्ट राफेल  

डसॉल्ट राफेल हे डेसॉल्ट एविएशन कंपनीने विकसित केले असून, फ्रेंच ट्विन-इंजिन मल्टिरोल असलेले लढाऊ विमान आहे. हे कॅनडा अप-फ्रंट तसेच डेल्टा-विंग डिझाइनच्या अद्वितीय टेक्नॉलॉजीमुळे ओळखले जाते. २०१२ मध्ये, भारतीय वायुसेनेने डेसॉल्ट राफेलची निवड सगळ्यात आवडते सर्वसाधारण लढाऊ विमान म्हणून केली आहे. या विमानात १९२० किमी / तासापेक्षाही जास्त वेग आहे, आणि हे मीटियर बव्रॅम मिसाईलने सुसज्ज केले आहे.

indian air force, iaf, fighter jets, fighter planes, indian air force power, mig 29, sukhoi 30, rafale, mirage 2000, tejas, sepecat jaguar, mig21
Dassault Rafale (Source – janes.com)

३. मिकॉयन मिग – २९

मिग – २९ सोव्हिएत युनियन अंतर्गत मिकॉयनने बनवलेले जेट लढाऊ विमान आहे. मिग – २९ ह्या मॉडेलची भारतीय वायुसेना ही पहिली आंतरराष्ट्रीय खरेदीदार आहे. १९९९ च्या कारगिल युद्ध काळात हे विमान काश्मीर भागात आय.ए.एफ. ने मोठ्या प्रमाणात वापरले होते. याचे अनबर्निंग टर्बो फॅन प्रत्येकी १८३०० पौंड क्षमतेचे आहेत. याचा वेग जास्तीत जास्त २४०० किमी / तास पर्यंत आहे. रशिया व भारताचे मैत्रीपूर्ण संबंध ह्या विमानांच्या खरेदीत महत्वपूर्ण ठरले होते.

indian air force, iaf, fighter jets, fighter planes, indian air force power, mig 29, sukhoi 30, rafale, mirage 2000, tejas, sepecat jaguar, mig21
Mig 29 (Source – newsbeezer.com)

४. डेसॉल्ट मिराज २०००

डसॉल्ट मिराज २००० म्हणजे, डॅसॉल्ट एव्हिएशनमध्ये तयार झालेल्या फ्रेंच मल्टीरोल ह्या चौथ्या पिढीचे लढाऊ जेट विमान आहे. १९८० मध्ये भारतीय वायुसेनेने ४९ मिराज – २००० खरेदी केले. त्यापैकी ४२ सिंगल सीटर्स आणि ७ विमाने २ सीटर क्षमतेचे आहेत. २००४ मध्ये, सरकारने आणखी १० मिराज खरेदी करायला वायुसेनेला मान्यता दिली. हे विमान एक SNECMA एम ५३-पी २ नंतरच्या आफ्टर बर्न टर्बोफॅनद्वारे चालवले जाते. ते २३३६ किमी / तास ह्या सर्वोच्च गतीने प्रवास करू शकते. जरी जुनी टेक्नॉलॉजी असली, तरी ते भारतीय वायुसेनेतील सर्वात बहुगुणी लष्करी जेट्सपैकी एक आहेत.

indian air force, iaf, fighter jets, fighter planes, indian air force power, mig 29, sukhoi 30, rafale, mirage 2000, tejas, sepecat jaguar, mig21
IAF Mirage-2000 (Source – News18.com)

५. एच ए एल तेजस

एचएएल तेजस एअर फोनेटिकल डेव्हलपमेंट एजन्सी (ए.डी.ए) आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एच.ए.एल.) यांनी भारतीय वायुसेना आणि भारतीय नौदल ह्या दोघांनाही उपयोग करता येईल अश्याप्रकारे विकसित केले आहे. हे सिंगलसीट मल्टि-रोल तरीही लाइटवेट असलेले फाइटर जेट आहे. विमान २०५ किमी / तास वेगाने उडू शकते, व १५,२०० मीटरच्या जास्तीत जास्त उंचीपर्यंत वर जाऊ शकते. ह्या लढाऊ विमानाच्या सुधारित डिज़ाइनमुळे हे विमान अधिक चांगला हाय – अल्फा परफॉर्मन्स देते, जे युद्धामध्ये निर्णायक भूमिका बजावते.

indian air force, iaf, fighter jets, fighter planes, indian air force power, mig 29, sukhoi 30, rafale, mirage 2000, tejas, sepecat jaguar, mig21
Tejas (Source – Force)

६. SEPECAT जग्वार

जग्वार हे एस.ई.पी.ई.सी.ए.टी.ए कडून निर्माण केलेलं एंग्लो-फ्रेंच जेट लढाऊ विमान आहे. भारतीय वायुसेनेने युरोपमध्ये तयार केलेल्या ४० जग्वार आणि मनीकर – शमशेर ह्या भारतीय कंपनीला मिळून १२० परवाना धारित विमान तयार करण्याची ऑर्डर देण्यात आली. विमानामध्ये दोन रोल्स-रॉयस टर्बोमेका अॅडूर एमके 102 टर्बोफॅन वापरले जातात, जे प्रत्येकी ५,११५-पौंड क्षमतेचे बल देतात. हे विमान ११,००० मीटर पर्यंत उंच आणि १६९९ किमी ताशी वेगाने उडण्यास सक्षम आहे.

indian air force, iaf, fighter jets, fighter planes, indian air force power, mig 29, sukhoi 30, rafale, mirage 2000, tejas, sepecat jaguar, mig21
Sepecat Jaguar (Source – Flickr)

७. मिकॉयन-ग्युरविच मिग -२१

मिग -२१ हे एक सुपर-सॉनिक लष्करी जेट विमान असून ते सोव्हिएत युनियनमधील मिकॉयन-ग्युरविच डिझाइन ब्यूरोने डिझाइन केलेले आहे. भारतीय वायुसेना ही मिग – २१ चा जगातील सर्वात जास्त वापर करणारी सेना आहे, जी सुमारे २५२ मिग -२१ विमान ताफा बाळगून आहे. विमानामध्ये सिंगल तुमांस्की. आर २५-३०० टर्बो फॅन इंजिन दिले आहे, ज्यामुळे विमानाला १५६५० पौंड क्षमतेचे जोरदार बल मिळते. हे जेट विमान २,१७५ किमी / तास वेग घेऊ शकते. मिग – २१ हे जगातील सर्वात भरभक्कम लढाऊ विमानांपैकी एक आहे.

indian air force, iaf, fighter jets, fighter planes, indian air force power, mig 29, sukhoi 30, rafale, mirage 2000, tejas, sepecat jaguar, mig21
MiG-21 (Source – Military-Today.com )

८. बोईंग सी -१७ ग्लोबमास्टर iii

१९८९ च्या दशकात अमेरिकेच्या वायुसेनेसाठी मॅकडोनल डगलस ह्याने विकसित केलेले सी -७ ग्लोबमास्टर तिसरे सगळ्यात मोठे सैन्य वाहतूक करणारे विमान आहे. फेब्रुवारी २०११ साली भारतीय वायुसेना आणि बोईंग १० ह्यांच्यात करार सहमत झाला, तो सी -१७ विमानांच्या खरेदीसाठी आणि भारतीय वायू सेनेच्या ताफ्यात हे लढाऊ विमाने शामिल झाले. हे विमान चार प्रॅटव्हिटनी एफ ११७ -पी-डब्ल्यू- १०० टर्बोफॅन वापरून चालविले जाते. यामध्ये प्रत्येकी ४०,४४० पाउंड क्षमता आहे. हे जेट विमान ८२९ किलोमीटर / तासाच्या क्रूझ गतीने उडण्यास सक्षम आहे. शस्त्रे आणि सैन्याच्या वाहतूक करण्याच्या दृष्टीने हे भारतात असणाऱ्या सर्वोत्कृष्ट विमानांपैकी एक मुख्य विमान आहे.

indian air force, iaf, fighter jets, fighter planes, indian air force power, mig 29, sukhoi 30, rafale, mirage 2000, tejas, sepecat jaguar, mig21
boeing c 17 globemaster iii iaf (Source – Indian Defence Forum)

९. लॉकहीड मार्टिन सी-१३०जे. सुपर हरक्यूलिस

सुपर हरक्यूलिस हे अमेरिकेमधील निर्माता लॉकहीड मार्टिनने बनविलेले एक वाहतूक विमान आहे. २००८ च्या सुरुवातीला भारतीय वायुसेनेसाठी खास ६ विमाने खरेदी केली. डिलिव्हरी झाल्यानंतर आय ए एफने काही स्वदेशी उत्पादित उपकरणे बसवून हे विमान अपग्रेड केले. हे विमान चार रोल्स-रॉयस ए ई २१०० डी ३ टर्बो प्रॉप इंजिन वापरून बनवले आहे. ह्यात डाऊटी आर. ३९६ – ब्लेड प्रोपेलरसह बसवण्यात आल्या आहेत. हे वाहतूक विमान असल्याने ६७१ किमी / तास अश्या जास्तीत जास्त वेगाने उडू शकते.

indian air force, iaf, fighter jets, fighter planes, indian air force power, mig 29, sukhoi 30, rafale, mirage 2000, tejas, sepecat jaguar, mig21
Lockheed Martin C-130J Super Hercules (Source – newsbytesapp.com)

१०. इलीशिन आयएल -७८

आयएल -७६ वर आधारित ह्या विमानात सोव्हिएतने निर्माण केलेला एरियल रिफुयलींग टँकर आहे. म्हणजे आकाशात विमान उडत असताना ह्या विमानाद्वारे दुसऱ्या विमानात फ्युएल (इंधन) भरता येते. भारतीय वायुसेनाने २००३ मध्ये पहिल्या सहामाहीत असे दोन विमान खरेदी केले. आय ए एफने आय.एल – ७८ एम के आय ८ ऑक्टोबर, २००३ रोजी वायुसेना दिवस परेडमध्ये ह्या विमानाचे पहिले सार्वजनिक प्रदर्शन केले. ह्या विमानात पॉवरप्लांट्स चार अविवा – विगेटेल डी – ३० केपी टर्बोफॅन इंजिन्स आहेत, जे वापरून प्रत्येकी २७००० पौंड जोरदार उड्डाण करता येते. विमान ८५० किमी / तास. गतिने उडू शकते.

indian air force, iaf, fighter jets, fighter planes, indian air force power, mig 29, sukhoi 30, rafale, mirage 2000, tejas, sepecat jaguar, mig21
Il-78M (Source- strategic-bureau.com)

हे फक्त एअर – टू – एअर रिफ्यूलिंगच्या (आकाशात उडत असताना इंधन भरण्यासाठी) उद्देशासाठीच वापरले जाते, आणि भारतीय वायुसेनेमध्ये उपस्थित असलेल्या जवळजवळ सर्वच विमान आणि हेलिकॉप्टर ह्या द्वारे इंधन भरणी करू शकतात. अशी सशक्त आणि सशस्त्र वायू सेना आपल्या देशाचे रक्षण करण्यासाठी कायम सजग आहे. शत्रूच्या मनात धडकी भरेल अशी विराट वायू सेना देशावर आलेल्या संकटाला परतवून लावू शकते यात तिळमात्र शंका नाही. मंगळवार २६ फेब्रुवारी रोजी भारतीय वायुसेनेने केलेल्या अचाट कामगिरीच्या पार्श्वभूमीवर आम्ही भारतीय वायुसेनेतील टॉप १० घातक विमानांची माहिती तुमच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न केला.

No Fields Found.

Leave A Reply

Your email address will not be published.