fbpx

सर्वात शक्तिशाली समजली जाणारी महाभारतातील ५ दिव्य अस्त्र

Image Source - Google

रामायण आणि महाभारत या दिनही युगांत आपण मोठ्या घनघोर युद्धांच्या कथा वाचल्या आहेत. या युद्धांमध्ये देव देवता सुद्धा शामिल होते असं म्हटलं जात. योद्धांकडे दिव्य अस्त्र होती आणि हि अस्त्रं इतकी घातक होती कि एका क्षणात संपूर्ण सृष्टीचा विनाश घडवू शकतात. चला तर बघुयात महाभारतातील ५ योद्धे आणि त्यांची दिव्या अस्त्र ज्याने सृष्टीचा विनाश केला जाऊ शकतो.

प्राचीन भारताच्या इतिहासात दोन ग्रंथांना अत्यंत महत्व दिले गेलेले आहे. भारतातील प्राचीन हिंदू धर्मात तर या ग्रंथांना अगदी देवतुल्य मानले गेले आहे. या दोन ग्रंथांवर जगभरातील अनेक संशोधकांनी संशोधन सुद्धा केले आहे. या साहित्यांची अगदी जगभरात दखल घेतली गेली आणि हि महाकाव्यं म्हणजे रामायण व महाभारत. रामायण आणि महाभारताच्या गोष्टी आपण लहानपणापासून ऐकत आलोय. विशेष म्हणजे महाभारत आणि रामायण या दोन्ही काव्यांमध्ये फार मोठी युद्ध झाली.

weapons of god, mahabharata weapons found, brahmastra weapon, mahabharata weapons list, weapons found in kurukshetra, lord krishna weapon, supernatural weapons of mahabharata, sudarshan chakra, narayan astra, vajrastra, gandiv dhanush, सुदर्शन चक्र, ब्रम्हास्त्र, नारायण अस्त्र, वज्रास्त्र, गांडीवधनुष्य, महाभारतातील शस्रे, महाभारतातील दिव्य अस्त्र
Mahabharat War (Image Source – Amar Ujala)

रामायण व महाभारत ह्या ग्रंथांमध्ये अनेक वेळा झालेल्या घनघोर युद्धांचे प्रसंग लिहून ठेवण्यात आले आहेत. महाभारत म्हणजे तर ‘न भूतो न भविष्यती’ असे युध्द म्हटले गेले आहे. या युध्दात आजच्या विज्ञानाला सुध्दा अचंबित करणाऱ्या अस्त्र व शस्त्रशक्तीचा उपयोग केला गेला होता. ही शस्रे आज निर्माण करता येतील का ? यावर अजूनही संशोधन सुरू आहे. तर चला पाहूया ही महाभारतातील शस्त्र नेमकी होती तरी कशी ?

1) सुदर्शन चक्र

ह्या शस्त्राचे नाव आपण नेहमीच ऐकत असतो. सुदर्शन चक्र (Sudarshan Chakra) प्रामुख्याने भगवान विष्णूचे प्रमुख शस्त्र म्हणुन ओळखले जाते. ह्या शस्त्राची निर्मिती शंकाराने केल्याचे सांगितले जाते. सुदर्शन चक्र विष्णूने कठोर तप करून शंकराकडून मिळवले. ह्या शस्त्राचे वैशिष्ट्य हे की, हे शस्त्र एकदा सोडल्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करून त्याला ठार करते व जिथून सोडले त्या ठीकाणी परत येते. सुदर्शन चक्र हे शस्त्र भगवान विष्णू यांच्या तर्जणीमध्ये असते.

Mahabharat Shri Krishna with Sudarshan Chakra (Source – kyarhmwit.tk)

गरज पडल्यास भगवान विष्णूंनी सुदर्शन चक्र हे शस्त्र इतर देवांना दिल्याचे आपण अनेकवेळा ऐकले किंवा वाचले देखील आहे. भगवान विष्णूचा अवतार असलेल्या भगवान श्री कृष्णाजवळ देखील सुदर्शन चक्र बघायला मिळते. केवळ सुदर्शन चक्र या एका शस्त्राने अनेक शस्त्रूंचा विनाश केला जाऊ शकतो, असे म्हणतात. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला एकदा म्हणाले होते कि मी जर माझं सुदर्शन चक्र घेऊन युद्धात उतरलो तर काही क्षणांत मी हे युद्ध संपवू शकतो.

2) ब्रम्हास्त्र

हे अस्त्र आत्ताच्या अणुबाँब सारखे काम करते. महाभारतात हे शस्र मोजक्याच योध्यांकडे होते. एकदा सोडल्यानंतर याला परत सुध्दा बोलावलं जाऊ शकतं. महाभारतात कर्ण, अर्जून, अश्वत्थामा या योध्यांकडे हे शस्र होते. आश्वत्थामाने ब्रम्हास्त्र (Brahmastra) सोडले होते परंतु त्याला हे अस्त्र परत बोलवायचा मंत्र माहीती नसल्यामुळे मोठा अनर्थ घडणार होता असे वाचण्यात येते. महाभारतातील अतिशय शक्तिशाली समजल्या जाणाऱ्या ब्रम्हास्त्र या शस्त्राचे आणखीन एक वैशिष्ट्य आहे. ते वैशिष्ट्य म्हणजे या शास्त्राचा उपयोग.

weapons of god, mahabharata weapons found, brahmastra weapon, mahabharata weapons list, weapons found in kurukshetra, lord krishna weapon, supernatural weapons of mahabharata, sudarshan chakra, narayan astra, vajrastra, gandiv dhanush, सुदर्शन चक्र, ब्रम्हास्त्र, नारायण अस्त्र, वज्रास्त्र, गांडीवधनुष्य, महाभारतातील शस्रे, महाभारतातील दिव्य अस्त्र
Brahmastra (Source – Andrew Sonea)

ब्रम्हास्त्र या शस्राचा उपयोग फक्त एकदाच केला जाऊ शकतो. एका ब्रम्हास्त्राशी फक्त दुसर्या ब्रम्हास्त्रानेच मुकाबला केला जाऊ शकतो. महर्षी व्यासांनी महाभारतात असे म्हटले आहे की जीथे हे अस्त्र वापरले गेले आहे तिथे दोन ते चार वर्षे एक गवताची काडीसुध्दा उगवू शकत नाही. ह्यावरून या शस्त्राची दाहकता आपण समजू शकतो.उदाहरण द्यायचे झाल्यास जपानवर ज्या ठिकाणी अणुबॉम्ब टाकण्यात आले होते तिथे अजूनही एक गवत तुम्हाला दिसणार नाही.

3) नारायण अस्त्र

ह्या नारायण अस्राचे प्रक्षेपण धनुष्यातुन केले जाते. हे महाभारतातील शस्त्र अतिशय दाहक असे समजले जाते. ह्या अस्त्राचे वैशिष्ट्य हे की ह्या अस्रापासुन वाचण्याचा एकमेव उपाय म्हणजे याच्यापुढे शरणागती पत्करून हात जोडून अभिवादन करणे. नारायण अस्त्र (Narayanastra) शस्त्रहीन व शरणागती पत्करलेल्या व्यक्तीवर हल्ला करत नाही. महाभारतात अश्वत्थामाने ह्या अस्त्राचा उपयोग भीमावर केला गेला होता. हे अस्त्र आग ओकत भीमाकडे येत होते. लाखो सैनिक याने भस्मसात होऊ लागले.

weapons of god, mahabharata weapons found, brahmastra weapon, mahabharata weapons list, weapons found in kurukshetra, lord krishna weapon, supernatural weapons of mahabharata, sudarshan chakra, narayan astra, vajrastra, gandiv dhanush, सुदर्शन चक्र, ब्रम्हास्त्र, नारायण अस्त्र, वज्रास्त्र, गांडीवधनुष्य, महाभारतातील शस्रे, महाभारतातील दिव्य अस्त्र
Narayan Astra (Image source – Raakhee on Quora – WordPress.com )

पण भीम न घाबरता आणि हार न मानता पुढे सरसावत होता. कृष्णाला लगेच हे समजले की भीम नारायण अस्त्र ह्या शस्त्राचा सामना करू शकणार नाही. म्हणून त्याने लगेच पुढे जात भीमा कडून सगळी शस्त्रं काढून घेतली आणि त्यामुळे नारायण अस्त्र या भयानक शस्त्राचा प्रभाव भीमावर झाला नाही. तास भीम अतिशय ताकदवान माणूस होता पण नारायण अस्त्रा समोर सगळ्याच शक्ती कमी पडतात. आता आपण वज्रास्त्र बद्दल माहिती पाहूया.

4) वज्रास्त्र

पौराणिक कथांमध्ये तसे बघायला गेल्यास वज्रास्त्र हे अस्त्र भगवान इंद्र यांचं आहे असे दिसून येते. या अस्त्राचा वर झाल्यावर समोरचा व्यक्ती जिवंत राहत नाही एवढी शक्ती या अस्त्रा मध्ये आहे. महाभारतात या अस्त्राचा उपयोग तुम्हाला बऱ्याच वेळा दिसून येईल. महाभारता मध्ये वज्रास्त्र या शक्तिशाली शस्त्राचा उपयोग कर्णाने अर्जूनाला मारण्यासाठी केला होता. कर्णाने अर्जूनासाठी एक चक्रव्यूह तयार केलं होतं पण त्या चक्रव्युहामध्ये अर्जूनाचा मुलगा अभिमन्यू अडकला व मारला गेला.

weapons of god, mahabharata weapons found, brahmastra weapon, mahabharata weapons list, weapons found in kurukshetra, lord krishna weapon, supernatural weapons of mahabharata, sudarshan chakra, narayan astra, vajrastra, gandiv dhanush, सुदर्शन चक्र, ब्रम्हास्त्र, नारायण अस्त्र, वज्रास्त्र, गांडीवधनुष्य, महाभारतातील शस्रे, महाभारतातील दिव्य अस्त्र
Vajrastra (Image Source – Dr. Rita Louise )

अभिमन्यूला हे चक्रव्यूह भेदायचा कसे हे माहित होते परंतु त्यातून बाहेर पडायचे याचे ज्ञान त्याच्या कडे नव्हते. अभिमन्यूच्या सामर्थ्याची हि गोष्ट आपण सगळ्यांनी ऐकलीच असेल. अभीमन्यूच्या अंत्यसंस्काराच्या वेळी रात्री कौरव आक्रमण करणार आहेत हे कृष्णाला कळाले होते आणि म्हणून त्याने भीमाचा पुत्र घटोत्कचला बोलावलं. तेव्हा घटोत्कचाने कौरव सेनेवर भीषण आक्रमण केले. आपली हार जवळ पाहून कर्णाने अर्जूनासाठी राखलेले वज्र घटोत्कचावर चालवले व घटोत्कच धारातीर्थी पडला.

5) गांडीवधनुष्य

हे महाभारतातील शस्त्र अर्जूनाकडे होते. अर्जूनाने गांडीवधनुष्य मिळवण्यासाठी घोर तपस्या केली व भगवान शंकराकडून हे शस्त्र मिळवले. हे धनुष्य अगदी अचूक समजले जाते. या धनुष्याने धरलेला नेम कधीच चुकत नाही असे म्हणतात. ह्या धनुष्यासोबत असलेल्या भात्यातील बाण कधीच संपत नाहीत ही ह्या धनुष्याची खासियत. गांडीवधनुष्याला महाभारतात अर्जूनाचे प्रमुख शस्र म्हणुन खुप लोकप्रियता मिळाली. ह्याच धनुष्याचा उपयोग करून अर्जूनाने अनेक रणधुरंदरांचा अंत केला.

weapons of god, mahabharata weapons found, brahmastra weapon, mahabharata weapons list, weapons found in kurukshetra, lord krishna weapon, supernatural weapons of mahabharata, sudarshan chakra, narayan astra, vajrastra, gandiv dhanush, सुदर्शन चक्र, ब्रम्हास्त्र, नारायण अस्त्र, वज्रास्त्र, गांडीवधनुष्य, महाभारतातील शस्रे, महाभारतातील दिव्य अस्त्र
Arjuns’s Gandiv Dhanush (Source – Dailyhunt)

ह्या पौराणिक कथा व ही दिव्य अस्त्रे अनेक लोक फक्त मिथक मानत असले तरी ब्रम्हास्त्रा सारखी वैशिष्ट्ये असलेले अण्वस्त्र बनवले गेले आहे. या अण्वस्त्रांचा वापर झालेला आहे. त्यामुळे आजच्या विज्ञानाच्या युगात अशी विनाशकारी शस्रे बनवली जाऊ शकतात का हा संशोधनाचा विषय आहे. भविष्यात अशी शस्त्रे व अस्त्रे पुन्हा निर्मित होऊ शकतील का ? तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंट मध्ये सांगा. याव्यतिरिक्त अजून कुठली दिव्य अस्त्र महाभारतात वापरली गेलेली तेही सांगा.

No Fields Found.
1 Comment
  1. Anonymous says

    Yes this is true old is gold याचे पासुन प्रेरणा घेवून नवीन शोध करतायेतील

Leave A Reply

Your email address will not be published.