fbpx

कोल्ड्रिंक पिल्याने तुमच्या शरीराचे काय नुकसान होते याचा अंदाज आहे का तुम्हाला ?

Image Source - Google

इन्फोबझ्झ वरील विविध लेखांचे आणि ताज्या बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला Facebook , Instagram आणि Twitter वर फॉलो करा.


350 ml कोल्ड्रिंक मध्ये १० चमचे एवढी साखर असते. म्हणजे एकावेळी एवढे गोड शरीरात गेले तर माणूस उलटी करतो. पण तुम्हाला उलटी होत नाही,असे का ?

कोल्ड्रिंक हे कधीही कुठेही प्यायला आपण सगळे तयारच असतो, विविध कार्यक्रमला कोल्ड्रिंकशिवाय मजा येतच नाही . पण तुम्हाला माहिते का ? या मजेदार कोल्ड्रिंकमुळे आपले शरीराचे मजेदार नुकसान होत असते. वेगवेगळे सॉफ्ट ड्रिंक मुळे शरीराचे खूप नुकसान होत असते. हि माहिती कोल्ड्रिंकवर केलेल्या विविध अभ्यासावरून स्पष्ट झाले आहे. चला, तर मग पुढे वाचू कोल्ड्रिंक तयार कसे होते आणि शरीराचे नुकसान कसे आणि काय होते?

सॉफ्ट ड्रिंक मध्ये अल्कोहोलचे प्रमाण नसते. हे कार्बोनेटेड पाण्यापासून तयार झालेले असतात. हे गोड कार्बोनेटेड पाणी आर्टिफिशिअल फ्लेवर पासून तयार केले जातात. याला बनवण्यासाठी कॉर्बन डायऑक्सिड गॅसचा वापर केला जातो. प्रत्येक माणूस हा ऑक्सिजन आत घेतो आणि कॉर्बन डायऑक्सिड बाहेर सोडत असतो. पण कोल्ड्रिंकच्या माध्यमातून तो गॅस आपण परत आत मध्ये घेत असतो, या व्यतिरिक्त या मध्ये सिट्रिक अॅसीड असते जे आपल्या शरीरासाठी हानिकारक असते.

 कोल्ड्रिंक पिण्याचे तोटे, कोल्ड्रिंक पिल्याने होणारे नुकसान, how cold drink is harmful ?
Side Effects of Soft Drinks (Source – moonchat.in)

३५० एमएल मध्ये १० चमच्या बरोबरीने साखर असते. म्हणजे एकावेळी एवढे गोड शरीरात गेले तर माणूस उलटी करतो. पण जेव्हा आपण कोल्ड्रिंक पितो तेव्हा आपल्याला उलटी होत नाही. उलटी होतीये असं वाटल्यास कोल्ड्रिंक घेतल्यावर बरे वाटते, तर असे का ? तर कोल्ड्रिंकमध्ये फॉस्फरस अॅसीड असून त्याचा गोड पणा कमी करत असतो. यामुळे उलटी पासून आपली सुटका होते.

पण हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल कि अर्धा लिटर कोल्ड्रिंक बनवण्यासाठी १५० ते ३०० लिटर पाण्याचा वापर केला जातो. हि गोष्ट भारतासारख्या देशाला चिंताजनक ठरते. कारण काही भागांमध्ये लोकांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही आणि पाण्याविना आपल्या देशात काय काय घटना घडतात हे तर आपल्या सगळ्यांना माहितच आहे. कोल्ड्रिंकमुळे नुकसान काय होते?

महिलांच्या सुरक्षेसाठी अतिशय घातक असे अँटी रेप डिव्हाईसेस

शरीरातील हाडे कमजोर होणे

प्रत्येक कोल्ड्रिंकमध्ये कॉर्बन डायऑक्सिड आणि फॉस्फरस अॅसीड असते जे कि हाडांना आणि दातांना कमजोर बनवतात. आणि सोबतच यामध्ये असलेले कॅफेन पण दातातले कॅल्शियम कमी करते त्यामुळे दात खराब होण्यास सुरवात होते.

वजन वाढणे

कोल्ड्रिंकमध्ये जास्त प्रमाणात साखर असल्यामुळे इन्सुलिनचे प्रमाण झपाट्याने वाढते. ते हॅन्डल करण्यासाठी आपले लिव्हर जास्त साखरेचे रूपांतर फॅट मध्ये करते. ज्या लोकांना जास्त कोल्ड्रिंक पिण्याची सवय असते त्यांचे वजन झपाट्याने वाढते.

 कोल्ड्रिंक पिण्याचे तोटे, कोल्ड्रिंक पिल्याने होणारे नुकसान, how cold drink is harmful ?
Diet soft drinks increase your risk of weight gain, diabetes (Source – 9Kitchen – Nine)
डायबेटीस

ज्यांना डायबेटीस आहे त्या लोकांनी कोल्डड्रिंक पिऊ नये कारण त्या मध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते. आणि त्यामुळे शरीराचे नुकसान अधिक होते किंवा ते डाएट कोल्डड्रिंक का असेना त्यात केमिकल मीठ असल्यामुळे ब्लड शुगर वाढवते.

आक्रमकता

कोलंबिया विद्यापीठाच्या संशोधनांनुसार जे लोक आठवड्यात १४ बॉटल कोल्ड्रिंक पितात त्यांची सामान्य लोकांपेक्षा अधिक आक्रमकता दिसून येते.

ताण – तणाव

अलीकडेच शोधनातून असे दिसून आले कि, जे लोक रोज कोल्ड्रिंक पितात तणावाची समस्या अधिक दिसून येते. पण काही लोक कधीतरी कोल्ड्रिंक पितात त्यांना हि हा त्रास होत असतो. खरा तर हा त्रास जास्तीत जास्त लहान मूल आणि युवकांमध्ये दिसून येतो ज्यांचा दिवस कोल्डड्रिंक शिवाय पूर्ण होत नाही.

 कोल्ड्रिंक पिण्याचे तोटे, कोल्ड्रिंक पिल्याने होणारे नुकसान, how cold drink is harmful ?
(Source – Healthline)

No Fields Found.
1 Comment
  1. […] कोल्ड्रिंक पिल्याने तुमच्या शरीराचे… […]

Leave A Reply

Your email address will not be published.