fbpx

मोरारजी देसाईंच्या या चुकीमुळे पाकिस्तानमध्ये RAW चे अनेक एजंट मारल्या गेले होते

होय ! मोरारजी देसाईंनी केली पाकिस्तानला मदत, तेही परमाणु राष्ट्र बनण्यासाठी. हि त्यांच्याकडून झालेली केवळ एक चूक होती, त्यामागे कुठलाही वाईट हेतू नव्हता. ३७ वर्षांपूर्वी दोन देशांमध्ये घडलेली ही घटना म्हणजे राष्ट्रीय सुरक्षेच्या, तसेच जगाच्या गुप्तचर जाळ्याच्या इतिहासाला काळिमा फासणारी एक घटना आहे. भारताच्या गुप्तचर नेटवर्क संबंधित माहिती फोन करून पाकिस्तानच्या मंत्र्यांना देणारे, तेही भारतीय मंत्रालयाच्या दक्षिण इमारतीमध्ये बसून, अश्या भारतीय पंतप्रधानांची तुम्ही कल्पना करू शकता का ? हि घटना १९८७ मध्ये घडली होती आणि तीही तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या हातून.

हे सगळं गैरसमज आणि द्वेषभावना मनात आल्याने झाल्याचे म्हटल्या जाते. मोरारजी काँग्रेसचे एक निष्ठावान कार्यकर्ते होते. २५ जून १९७५ रोजी सबंध भारत देशात आणीबाणी जाहीर करण्यात येऊन, त्याच रात्री मोरारजींना अटक करण्यात आली. सुटका झाल्यावर त्यांनी जनता पक्षाकडून निवडणूक लढवली आणि ते स्वतंत्र भारताचे चौथे पंतप्रधान झाले. पण, हे सर्व घडलं कसं ? भारताचा एक नंबरचा शत्रू असलेल्या पाकिस्तान ह्या राष्ट्राला मोरारजींनी मदत का व कशी केली. जाणून घेऊ कि नेमकं हे सर्व घडलं कसं.

morarji desai, morarji desai in marathi, morarji desai information, morarji desai and gen zia ul haq, morarji desai helped pakistan, morarji desai and raw, r n kao, general zia ul haq

Morarji Desai (Source – Free Press Journal)

या घटनाचक्राला सुरुवात अशी झाली

जेव्हा इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या तेंव्हा इंदिरा गांधींनी संशोधन आणि विश्लेषण विंग (RAW), अमेरिकेच्या केंद्रीय गुप्तचर संस्था (CIA) किंवा पाकिस्तानी इंटर – सर्व्हिसेस इंटेलिजेंस (आयएसआय) यांचा वापर वेगवेगळ्या देशांवर लक्ष ठेवण्यासाठी करून घेतला होता, तसेच काउंटर सुरक्षा ऑपरेशन्स आयोजित केले होते, परंतु आणीबाणीच्या वेळी विरोधी पक्षांविरोधात इंदिरा गांधी यांनी केंद्रीय गुप्तचर ब्युरोसह RAWचा सुद्धा वापर केल्याची चुकीची धारणा मनात ठेवून मोरारजी देसाई यांनी सत्तेवर आल्यावर RAWचे बजेट ३० टक्क्यांनी कमी केले.

‘RAW’वर असलेल्या द्वेषामुळे रॉ चे प्रमुख आर. एन. काओ ज्यांनी ‘रॉ’च्या स्थापनेमध्ये मदत केली होती, आणि उत्कृष्ट अन्वेषण कौशल्यांसाठी जागतिक नेत्यांकडून त्यांची खूप प्रशंसा झाली होती, त्यांना राजीनामा द्यायला लावला आणि पुढे त्यांनी काओचे उत्तराधिकारी असलेले के. शंकरन नायर यांना सुद्धा अक्षरशः बाहेरचा रस्ता दाखवून दिला आणि त्याची जागा एन.एफ. सनटूक ह्यांना दिली. इथपर्यंत ठीक होतं, पण त्यानंतर देसाईंनी जे काय केले ते केवळ धक्कादायकचं होते.

morarji desai, morarji desai in marathi, morarji desai information, morarji desai and gen zia ul haq, morarji desai helped pakistan, morarji desai and raw, r n kao, general zia ul haq
Indian Prime Minister Morarji Desai with General Ziaul Haq (Source – Flickr)

दूरध्वनी संभाषणात त्यांनी पाकिस्तानमध्ये कार्यरत असलेल्या रॉ नेटवर्कची माहिती पाकिस्तानच्या तत्कालीन मार्शल लॉ प्रशासक झिया- उल – हक यांना देऊन टाकली आणि सांगितले की, भारत सरकारला कहुटा येथील गुप्त परमाणु बॉम्ब बनविण्याची सुविधा RAW मुळे माहित झाली आहे. देसाई यांच्या या वर्तनामागे दोन वेगळे दृष्टीकोन असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे.

१) गांधीजींचे अनुयायी असलेले देसाई असे मानत की, गांधीवादी तत्त्वज्ञानाचे पालन करून शेजार्यांशी सत्य बोलणे आवश्यक आहे. पण या परिस्थितीत, लांडग्यासारख्या झियाने देसाईंनी दिलेल्या बातमीनंतर पाकिस्तानमध्ये असलेले संपूर्ण भारतीय रॉ नेटवर्क उध्वस्त करून टाकले. RAWच्या अनेक माणसांना ठार मारून टाकण्यात आले आणि कहुटाशी संबंधित असलेले सर्व संपर्क संपुष्टात आले.

२) काही जणांना असे वाटते की, तेंव्हा पाकिस्तानचे पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो जेलमध्ये होते आणि झिया यांना जागतिक समर्थन हवे होते म्हणूनच ते देसाईंशी हसून खेळून वागायचे व संपर्क ठेवायचे. देसाई घेत असलेल्या मूत्रपिंड चिकित्सेबद्दल विचारपूस करायचे आणि अनपेक्षितपणे देसाईंनी ही बातमी बोलण्याच्या ओघात देऊन टाकली.

morarji desai, morarji desai in marathi, morarji desai information, morarji desai and gen zia ul haq, morarji desai helped pakistan, morarji desai and raw, r n kao, general zia ul haq
PM Morarji Desai and Foreign Minister Atal Bihari Vajpayee (Source – Pinterest)

या पुढील आश्चर्य म्हणजे यामध्ये, भारतीय जनसंघाचे माजी राष्ट्रवादी सदस्य हे देखील कारणीभूत ठरतात. कारण अटलबिहारी वाजपेयी त्यावेळी जनता पार्टी सरकारचे परराष्ट्र मंत्री होते तर लालकृष्ण आडवाणी हे माहिती व प्रसारण मंत्री होते. या दोघांनी देसाई यांना थांबवायला हवे होते, कारण त्यामुळे रॉचे खूप मोठे नुकसान टाळता आले असते. ह्या दुर्दैवी घटनेतील एक वाईट भाग म्हणजे देसाईंनी झीया सारख्या रूढीवादी देवबंदी मुस्लिमावर विश्वास व मैत्री भाव जपायचा प्रयत्न केला.

ह्याच झियाने तालिबानसारखी दहशवादी संघटना स्थापना केली. तसेच भारताने १९७१ सालच्या बांगलादेश मुक्तीच्या लढाईसाठी लढलेल्या व जिंकलेल्या लढाईचा बदला घेण्यासाठी ऑपरेशन टोपाझ राबवले होते. इंदिरा गांधी १९७७ च्या निवडणुकीत जनता पक्षाकडून पराभूत झाल्या होत्या. त्या पूर्वीच ह्या सर्व चक्राची सुरुवात झालेली होती, रॉ एजंटला पाकिस्तानचा परमाणु बॉम्ब विकसित होत असल्याची जागा कुठे आहे हे शोधून काढण्याचे काम देण्यात आले होते. कौशल्य आणि हुशारीने एजंटने कहुटा जवळच पुढे असलेल्या केश – कर्तनालाय म्हणजेच सलूनशी संपर्क साधला.

morarji desai, morarji desai in marathi, morarji desai information, morarji desai and gen zia ul haq, morarji desai helped pakistan, morarji desai and raw, r n kao, general zia ul haq
R&AW (Source – The Telegraph)

काही शास्त्रज्ञ वारंवार या ठिकाणी येत होते. ह्या सलूनवाल्याशी संपर्क साधून मोठ्या हुशारीने RAW एजंटने काही केसांचे नमुने गोळा केले. या नमुन्यांची वैज्ञानिक चाचणी केल्यावर, त्यात उच्च विकिरण (high radiation) आणि बॉम्ब – ग्रेड यूरेनियम सापडले आणि रॉची शोध मोहीम कहुटा येथे येऊन थांबली. अहवालानुसार, गुजराती असलेल्या पारसी सुन्तुूकने सुद्धा, मोरारजींना राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने रॉ ऑपरेशनचे महत्व पटवून देण्याचा खूप प्रयत्न केला, पण देसाई मात्र हे ऑपरेशन पुढे नेण्यास परवानगी द्यायला तयार झाले नाही.

त्याच सुमारास याच याचिकेवर, देसाईंनी इस्रायलचे परराष्ट्र मंत्री मोशी दयान यांच्याशी गुप्त मुलाखत घेऊन हवाई हल्ल्यात कहुटाचा नाश करण्यासाठी इस्रायलची योजना फेटाळून लावली. त्यांनी भारतात इंधन भरण्याची इस्रायलच्या विमानांना परवानगी नाकारली. या दोन्ही घटना भारतीय गुप्तचर नोंदींमध्ये चांगल्या प्रकारे नोंदवून ठेवलेल्या आहेत. एक निष्ठावंत व कडवे गांधीवादी, सत्य व अहिंसा यांचे निस्सीम पुरस्कर्ते, शिस्तप्रिय, उत्कृष्ट प्रशासक, स्पष्टवक्ते व साध्या राहणीचे म्हणून मोरारजींचा लौकिक सर्व भारतात तसेच परदेशातही होता.

morarji desai, morarji desai in marathi, morarji desai information, morarji desai and gen zia ul haq, morarji desai helped pakistan, morarji desai and raw, r n kao, general zia ul haq
(Source – DefenceLover)

पण ‘अति तिथे माती’ हीच म्हण इथे लागू होईल असे दिसते, अयोग्य ठिकाणी बोललेलं सत्य देशाच्या सुरक्षेसाठी खूप महाग पडू शकते हेच आपल्याला (भारताला) लक्षात ठेवावे लागेल. इतिहासातील घटनांमधून योग्य धडे घेऊन पुढे निर्णय घेतले तरच हिताचे ठरेल. अंतर्गत हेवेदावे व अंतर्गत शत्रुता हि एक वेगळी बाब असते, पण त्याचा परिणाम राष्ट्रहितावर होता कामा नये.

No Fields Found.
1 Comment
 1. Undeniably consider that that you said. Your favorite justification seemed
  to be on the internet the easiest thing to take note of.
  I say to you, I definitely get annoyed even as people think
  about issues that they plainly do not realize about.
  You controlled to hit the nail upon the top and defined out the entire thing without having side-effects , people
  can take a signal. Will likely be back to get more.
  Thanks

Leave A Reply

Your email address will not be published.