fbpx

हा भारतीय राजा ३६५ राण्यांसोबत घालवायचा रात्र, सेक्स करण्यासाठी उभारले होते भव्य महाल

Image Source - Google

इन्फोबझ्झ वरील विविध लेखांचे आणि ताज्या बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला Facebook , Instagram आणि Twitter वर फॉलो करा.


भारताच्या इतिहासातील असा एक राजा जो त्याच्या शौर्यासाठी कमी आणि सेक्स साठी शौकीन असल्यामुळे जास्त ओळखला जातो. ज्याच्या तब्बल ३६५ राण्या होत्या आणि त्यांच्यासोबत रात्र घालवण्यासाठी राजाने एक सेक्स महाल उभारले होते.

भारतीय इतिहासाकडे पाहता प्रत्येकाची काही ना काही रंजक कथा आपल्याला ऐकायला आणि वाचायला मिळतात. शौर्याने आणि पराक्रमाने उभारलेले आरमार असो किंवा प्रेमात वेडे होवून उभारलेली प्रेमाची ज्वलंत साक्ष. जे आज सर्वांसाठीच अभिमान तसेच कौतूकाचा भाग आहे. त्यात इंटरस्टींग असे ट्विस्ट घडल्याचे आपल्याला पाहायला मिळतात. इतिहासातील अशाच एका रंजक गोष्टीविषयी जाणून घेऊया आजच्या ह्या लेखामध्ये

ही कहाणी आहे पटीयालाच्या महाराज भुपिंदर सिंह (Bhupinder Singh of Patiala) यांची, अतिशय श्रीमंत असलेला हा राजा सेक्सचा फार शौकीन होता. असा एकही दिवस नसेल ज्यादिवशी त्याला सेक्सची आठवण आली नसेल. त्याच्या अमाप संपत्ती बरोबरच त्याला 365 राण्या देखील होत्या. त्यांची तो रात्र घालवण्यासाठी निवड करत असे.

राजा भूपिंदर ने १९०० ते १९३८ पर्यंत राजगादी सांभाळली. त्यांचे महल आजही महाराज भुपिंदर सिंह यांच्या ३६५ राण्यांची कहाणी सांगतात. त्यावरून ह्यांच्या सेक्सविषयक आकर्षणचा अंदाज बांधता येवू शकतो. असे म्हंटले जाते की महाराजा भुपिंदरच्या 10 लग्नाच्या बायका होत्या.

तसेच अजून 355 स्त्रियांशीही त्याने विवाह केल्याचे म्हंटले जाते पण अधिकृत राण्या 10 च होत्या असेही म्हणतात म्हणजेच केवळ शय्यासोबत करण्यासाठी त्याने अजून 355 स्त्रियांशी संबंध ठेवले व याच 365 राण्यांसाठी भव्य महाल उभारले ते पटियाला इथे.

Bhupinder Singh of Patiala, ३६५ राण्या, महाराजा भूपिंदर सिंह, सेक्स महाल, 365 queens, Maharaja Bhupinder Singh
Image Source – Google

आज देखील महाराजा भुपींदर सिंह (Maharaja Bhupinder Singh)चे प्रत्येक किस्से फार प्रसिध्द आहेत. दीवान जरमनी दास लिहितात की महाराजा भुपिंदर यांना 10 अधिकृत राण्यांकडून 83 अपत्ये झाली ज्यातील 53 अपत्ये जीवंत राहिली. या महाराजाची दहशतच इतकी होती की यांना लोक खुप घाबरत. महाराजा भुपींदर सिंहच्या महलमध्ये ३६५ मशाली लावल्या जात असत. प्रत्येक मशालीवर त्यांच्या ३६५ राण्यांची नावे लिहिलेली असत. जी मशाल सकाळी सर्वात आधी विझायची त्या मशालीवरील राणीचे नाव महाराज वाचत असत. मग त्याच राणीसोबत ते सेक्स करण्यास तयार होत असत.


#ताज्या बातम्या, जॉब संधी, मनोरंजन, लाईफस्टाईल टिप्स आणि बरंच काही अगदी मोफत तुमच्या व्हाट्सअँपवर, इन्फोबझ्झ जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 


त्यातील बाकींच्या राण्यांना आपल्या नंबरची वाट पाहावी लागत. हे सर्व तुम्हास खरे वाटत नसले तरी हे सर्व खरे आहे. व ह्याची साक्ष देतात महाराजा भूपिंदर सिहंचे दिवाण जरमणी दास ते आपल्या पुस्तकात ज्याचे नाव आहे ‘महाराजा’ मध्ये महाराजा भूपिंदर सिह व त्याच्या महालाचे विस्तृत वर्णन करतात, त्यात त्यांनी असेही लिहिले आहे कि ह्या सेक्स महालात केवळ निर्वस्त्र व्यक्तीलाच प्रवेश मिळत असे व ह्या सेक्स महालातील एक खास खोली महाराजाने स्वतःसाठी बनविली होती जी अत्यंत आलिशान व सर्व सोयीसुविधांनी युक्त होती तसेच महालाच्या बाहेर पोहोण्यासाठी एक स्विमिंग पूल सुद्धा बनविण्यात आला होता जो अतिशय मोठा होता ज्यात एकाच वेळी १५० व्यक्ती आरामात पोहू शकतील

सुमारे 10 एकर परिसरात या महाराजाचा किल्ला पटियाला शहराच्या केंद्रस्थानी पसरलेला आहे. तसेच त्यातील भिंतीवर मोहक असे कोरीव कामही आढळते.
तर हि होती ३६५ राण्या असणाऱ्या महाराजा भूपिंदरसिंग ह्यांची कहाणी , अविश्वसनीय असली तरीही सत्य असणारी ही कथा तुम्हाला विचार करायला लावणारी नक्कीच आहे . कुणाला हा राजा अय्याश, रंगेल वाटू शकतो तर कुणाला ह्याच्या आलिशान आयुष्याचं अप्रूप वाटू शकतं.


No Fields Found.

Leave A Reply

Your email address will not be published.