fbpx

पाकिस्तान अमेरिकेकडून घेतलेली शस्त्रास्त्र त्यांच्या परवानगीशिवाय वापरू शकत नाही, वाचा का ?

Image Source - Google

भारताने पाकव्याप्त काश्मीर मधील बालाकोट येथे एअर स्ट्राईक करून जैश ए मोहम्मदच्या तब्बल ३०० दहशतवाद्यांचा खात्मा केला. नंतर पाकिस्तानने यावर दिलेल्या काही अल्लड प्रतिक्रियांमुळे पाकिस्तानला चांगलंच ट्रॉल केलं जात आहे. अचानक केलेल्या हल्ल्यामुळे पाकिस्तानची जगासमोर पुन्हा एकदा नाचक्की झाली आणि म्हणूनच आता भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न पाकिस्ताहन करत आहे. परंतु अमेरिकेककडून घेतलेले शस्त्र पाकिस्तान अमेरिकेच्या परवानगी शिवाय वापरू शकत नाही, वाचा का ?

पाकिस्तानच्या डोक्यावरील हात अमेरिकेने काढून घेतला आहे त्यामुळे आधीच कंगाल झालेल्या पाकिस्तानला रोज नवनव्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अमेरिकेने आर्थिक मदत देणे तर आधीच बंद केले आहे. त्यात आता अमेरिकेने दिलेली शत्रास्त्रें सुद्धा पाकिस्तान अमेरिकेच्या परवानगीशिवाय भारताविरुद्ध वापरू शकत नाही. हा अजून एक मोठा धक्का पाकिस्तानला अमेरिकेने दिला आहे. भारताच्या एअर स्ट्राईक नंतर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अमेरिका पाकिस्तानला नेहमीच शस्त्र व तंत्रज्ञान पुरवत असते.

india, pakistan, air strike, america, donald trump, imran khan, narendra modi, pulwama attack, pakistan and america
(Source – Times of Islamabad)

पण हे पुरवत असतांना अमेरिकेने पाकिस्तानला अट घातलेली असते कि पाकिस्तान अमेरिकेच्या परवानगीविना हि शस्त्र कोणत्याही युद्धात वापरू शकत नाही. अमेरिकी व पाकिस्तान दरम्यान झालेल्या ह्या कराराची आठवण अमेरिकेने पाकिस्तानला पुन्हा एकदा करून दिली आहे. युद्धाचे ढग घोंगावत असतांना अमेरिकेने पाकिस्तानला वरील इशारा दिला आहे. ह्याचा सरळ अर्थ हा कि भारताविरुद्धच्या लढाईत पाकिस्तान अमरिकेच्या परवानगीशिवाय त्यांनी दिलेली शस्त्र व तंत्रज्ञान वापरू शकत नाही. अमेरिका भारत व पाकिस्तान दोघांचाही मित्र आहे पण गत काही वर्षांपासून अमेरिका भारताकडे जास्त झुकल्याचे पाहावयास मिळत आहे.

india, pakistan, air strike, america, donald trump, imran khan, narendra modi, pulwama attack, pakistan and america
(Source – tribune.com.pk)

भारताच्या एअर स्ट्राईक नंतर भारत व पाकिस्तान दोन्हीकडे सावधगिरी बाळगली जात आहे. युद्धाचे ढग जमा होत असून, दोन्हीकडचे सैन्य सज्ज आहे. पाकिस्तानच्या कुरापतींना भारताने खणखणीत उत्तर दिले आहे. पाकिस्तान वेळोवेळी सीमारेषेवर तणावाची परिस्थिती निर्माण होईल असे कृत्य करत असतो व त्यास भारत चोख उत्तर वेळोवेळी देत असतो. पाकिस्तानला भारताने एअर स्ट्राईक करून चांगलाच धडा शिकवला आहे. खासकरून पाकचा लाडका मसूद अझरला ह्या एअर स्ट्राईकने मोठा धक्का दिला आहे.

india, pakistan, air strike, america, donald trump, imran khan, narendra modi, pulwama attack, pakistan and america
(Source – Gandhara RFE/RL)
No Fields Found.

Leave A Reply

Your email address will not be published.