fbpx

शेअर मार्केट मध्ये बैल आणि अस्वल यांचा वापर कशासाठी ? जाणून घ्या अगदी सोप्या भाषेत

शेअर मार्केट विषयी बहुतेक करून लोकांच्या मनात गैरसमज आहेत. काही लोक तर शेअर मार्केट ट्रेडींगला चक्क जुगार म्हणतात. पण हा जुगार नसून स्मार्ट इन्व्हेस्टमेंट आहे. शेअर मार्केट विषयी टीव्ही वर काही बघताना तुम्हाला बैल नक्कीच दिसत असणार. कधी तुम्हाला प्रश्न पडलाय का बैल आणि शेअर मार्केटचा नेमका संबंध काय ? चला तर बघुयात शेअर मार्केट आणि बैलाचं नातं…

शेअर बाजार, रोखे बाजार, कमोडिटी, नाणी बाजार, इत्यादी गुंतवणूकदारांना गुंतवणूक करण्यासाठीची तसेच, कंपन्यांना किंवा व्यावसायिक लोकांना स्वतःसाठी पैसे उभे करण्याची विविध साधनं आहेत. शेअर बाजार म्हणजेच स्टॉक मार्केट हा सगळ्यांचा आवडता व चर्चेचा विषय. सर्वांनाच या बद्दल कमालीचं कुतूहल असतं, तितकीच भीती आणि शंका सुद्धा सामान्य लोकांना या बाबतीत असते. सामान्यतः पैसे गुंतवणूक करून त्यात वाढ होण्यासाठी सगळे गुंतवणूकदार इच्छुक असतात, त्याचबरोबर संभ्रम अवस्थेतसुद्धा असतात.

bull and bear market in india, bulls and bears stock market definition, what does bear market mean in stocks, bullish market, bull market, bearish market, bear market, bullish and bearish market, market sentiments, बुल मार्केट, बीअरिश मार्केट, शेअर मार्केट, share market, share market terms, bullish, bearish
Share Market (Source – Patrika)

जसे कि, कधी गुंतवणूक करू ? कशात करू ? परतावा किती मिळेल ? पैसे बुडणार तर नाही ना ? इत्यादी अनेक शंका सामान्यांच्या मनात येत असतात. काही वेळा क्लिष्ट कागदपत्रे, नियम-अटींची माहिती नसणे हे सुद्धा शेअर बाजारात गुंतवणूक न करण्याचे एक कारण असू शकते. बाजारातील बारकावे समजत नसतात वगैरे अनेक अडचणींना आपल्याला सामोरे जावे लागते. त्यात पुन्हा विविध कंपन्या, त्यांची प्रगती, शेअरचा परतावा, अनेक लोकांची फसवणूक झाल्याची उदाहरणे तुम्ही वाचता.

असे वाचून व ऐकून सामान्य भारतीय जनता शेअर मार्केट मध्ये आपला कष्टाचा पैसा गुंतवायला जरा कचरतेच. असे म्हणतात, “High risk, High returns” म्हणजेच, जितकी जास्त जोखीम घ्याल तितकेच जास्त त्यातून उत्पन्न मिळते. पण मुळातच जोखीम घ्यायला घाबरल्याने आपल्या पैश्याला आपण बचत खात्यात अगदी झोपवून ठेवतो आणि त्यात काही वाढ होत नाही. कालांतराने रुपयांची किंमत कमी झाली की ह्या पडून असलेल्या पैश्याचे मुल्यही आपोआप कमी होते.

bull and bear market in india, bulls and bears stock market definition, what does bear market mean in stocks, bullish market, bull market, bearish market, bear market, bullish and bearish market, market sentiments, बुल मार्केट, बीअरिश मार्केट, शेअर मार्केट, share market, share market terms, bullish, bearish
(Source – wisebread.com)

उदाहरण द्यायचे झाले तर, आज जी वस्तू १०० ₹ ला मिळते तीच वस्तू २ वर्षांनी १२० ₹ ला मिळेल. म्हणजे १०० ₹ चे मूल्य कमी होऊन नुकसान झाले. पैश्याचे मूल्य विविध गोष्टींवर अवलंबून असते. पण साधारण नियम हाच की भरपूर वर्षात मूल्य कमी झालेलेच आपल्याला दिसून येईल. या संकल्पनेला “time Value of money” असे म्हणतात. एकूणच काय तर भविष्याचा विचार करता विविध मार्गाने पैसे गुंतवून ठेवणे आणि त्याच्या मूल्यात भर घालणे गरजेचे आहे.

अपुरा अभ्यास, माहितीचा अभाव आणि जोखीम घ्यायची भीती यामुळे आपण आपल्या समोरील ह्या अफाट संधीला मुकतो. सामान्य माणसाला न समजणाऱ्या अनेक संज्ञांपैकी एक शेअर मार्केट मधील संज्ञा आहे, ती म्हणजे बुल मार्केट आणि बेअर मार्केट. बैल (बुल) आणि अस्वल (बेअर) या दोन प्राण्यांचे स्वभाव परस्पर भिन्न असतात. विशेषतः ते जेंव्हा विरोधकांवर हल्ला करतात त्यावेळी वेगळ्या हरकती करतात. बैल खूप आक्रमक प्राणी आहे, शिंगांचा वापर करून समोरील विरोधकास मारण्यासाठी पूर्ण ताकद लावतो. “शिंगावर घेणे”, “मुसंडी मारणे” ह्या म्हणी यामुळेच रूढ झाल्या आहेत.

bull and bear market in india, bulls and bears stock market definition, what does bear market mean in stocks, bullish market, bull market, bearish market, bear market, bullish and bearish market, market sentiments, बुल मार्केट, बीअरिश मार्केट, शेअर मार्केट, share market, share market terms, bullish, bearish

या उलट अस्वल हा आळशी व काहीसा रेंगाळत चालतो. आक्रमक स्वभाव नाही, लोळत झोपणं त्याला आवडतं, त्याची चाल शांत, संथ असते. ह्या दोन प्राण्यांच्या अश्या स्वभावानुसार शेअर बाजारातील, रोखे बाजारातील, कमोडिटी, नाणी बाजारातील तेजी किंवा मंदी दर्शवण्यासाठी bull market आणि bear market या संज्ञा वापरल्या जातात. बुल मार्केट म्हणजे तेजीत, बेअर मार्केट म्हणजे मंदी असे ढोबळमानाने म्हणता येईल.

“शेअर बाजारात बैल पायऱ्या चढत वर येतो, तर अस्वल खिडकीतून उडी मारते” ही म्हण प्रसिध्द आहे.

म्हणजेच शेअर बाजारात तेजी नेहमी हळू, टप्प्याटप्प्याने, वेळ लावत येते मात्र या उलट मंदीत बाजार घसरगुंडी सारखा वेगाने जमीन गाठतो.

बुल मार्केट कसे ओळखावे ?

  • जेंव्हा देशाची अर्थव्यवस्था प्रगती करत आहे.
  • बेरोजगारी कमी झाली आहे.
  • मार्केट वधारत आहे.
  • शेअरच्या किंमती वाढत आहेत.

बुल मार्केटमध्ये कोणत्या पॉईंट पर्यंत बाजार वर जाणार आणि कधी वाढ थांबून खाली घसरण होणार हे निश्चित नसल्याने, बुलीश मार्केटमध्ये लोक मोठ्या प्रमाणात प्रॉफिट बुक करतात. म्हणजेच आपले शेअर विकतात आणि जास्तीचा नफा कमवतात. ह्या ट्रेंडमध्ये जास्तीत जास्त लोक शेअर्स विकतात आणि बाजारात घसरण चालू होते.

bull and bear market in india, bulls and bears stock market definition, what does bear market mean in stocks, bullish market, bull market, bearish market, bear market, bullish and bearish market, market sentiments, बुल मार्केट, बीअरिश मार्केट, शेअर मार्केट, share market, share market terms, bullish, bearish

मागणी तसा पुरवठा नियमानुसार जेंव्हा शेअर महाग व मागणी कमी होते. मागणी कमी झाली की भाव पण कमी होतात, हे एक प्रकारचे चक्रच असते, आणि ह्याच मुळे बुलीश झालेले मार्केट बेअरिश होण्याची सुरुवात होते.

बेअर मार्केट कसे ओळखावे ?

  • अर्थव्यवस्था स्थिर नसते.
  • बेरोजगारी वाढलेली असते.
  • मार्केट घसरत असते.
  • शेअरच्या किंमती कमी झालेल्या असतात.

बुलीश मार्केटच्या अगदी विरुद्ध परिस्थिती इथे निर्माण झालेली असते. किमती कमी झाल्याने ज्यांना गुंतवणूक करायची त्यांच्यासाठी योग्य वेळ असते. बाजारात प्रवेश घ्यायला ह्या ट्रेंडचीच सगळे गुंतवणूकदार वाट बघत असतात.

bull and bear market in india, bulls and bears stock market definition, what does bear market mean in stocks, bullish market, bull market, bearish market, bear market, bullish and bearish market, market sentiments, बुल मार्केट, बीअरिश मार्केट, शेअर मार्केट, share market, share market terms, bullish, bearish
Bearish Market (Source – Investopedia)

परत इकडे सुद्धा मागणी आणि पुरवठा नियम लागू. जशी मागणी वाढते पुरवठा कमी पडू लागतो, आणि त्यामुळे किमती परत वाढायला सुरुवात होते. एका पॉईंटनंतर परत बाजार उसळी घेतो आणि बेअरिश मार्केट बुलीश कडे वळतो. शेअर बाजाराचा अतिशय बारकाईने व पूर्णवेळ अभ्यास करणारे अनेक एक्स्पर्ट तुम्हाला सापडतील. त्यांच्या मदतीने पैसा योग्य ठिकाणी गुंतवून तुम्हीसुद्धा नक्कीच भविष्यात चांगले परतावे मिळवू शकता. थोडीशी जागरूकता, अभ्यास व शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या अनुभवाच्या आधारे तुम्हीसुद्धा शेअर मार्केटच्या ह्या खेळातील विजेता होऊ शकता.

No Fields Found.

Leave A Reply

Your email address will not be published.