fbpx

तब्बल ३३ वर्षाच्या सेवेनंतर भारतीय लष्कराच्या आवडत्या गाडीचं प्रोडक्शन बंद

भारतीय लष्कराची आवडती गाडी म्हणून ओळख असलेली मारुती जिप्सी (Maruti Gypsy) तब्बल ३३ वर्षाच्या सेवेनंतर प्रवास संपवत आहे. मारुती जिप्सीने भारतीय लष्कराची सेवा गेली कित्येक दशकं केली आहे. हवा,ऊन,पाऊस, पाणी किंवा वाळवंट. परिस्थती कोणतीही असो, जिप्सी कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही रस्त्यावर धावण्यास सक्षम होती. आता ह्या जिप्सीची जागा महिंद्रा आणि टाटांच्या गाड्या घेणार आहेत. भारतीय लष्कराची सेवा गेली कित्येक दशकं करणाऱ्या जिप्सीला आमचा सलाम.

भारतीय लष्कराचं आवडतं वाहन कोणतं असं विचारलं तर मारुती जिप्सी हे उत्तर ठरलेलं होतं. मारुती जिप्सीने भारतीय लष्कराची सेवा गेली कित्येक दशकं केली आहे. पण आता तुम्हाला मारुती सुझुकीची हि “जिप्सी” (Maruti Gypsy) लष्करी वाहतूक किंवा लष्करी जवानांची ने-आण करतांना दिसणार नाही. मारुती सुझुकीने जिप्सी ह्या आपल्या जुन्या आणि लोकप्रिय वाहनाचे उत्पादन बंद केले आहे. १९९१ पासून अखंड, लष्कराच्या सेवेत असणाऱ्या ह्या गाडीची निवृत्ती जवळ आली आहे.

Image Source – a4auto.com

याबाबत अधिक माहितीनुसार मारुती सुझुकी या भारतातील आघाडीच्या कंपनीने काही दिवसांपूर्वीच यावर विचार करून विविध परिस्थितीचा आढावा घेऊन जिप्सीचे उत्पादन थांबण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर आता अधिकृतपणे मारुतीने आपल्या सर्व डिलर्सना ह्याबाबत कळवले आहे, तसेच ह्यापुढे कोणत्याही ग्राहकाकडून जिप्सीची (Maruti Gypsy) ऑर्डर घेण्यात येऊ नये असेही सांगितले आहे. भारतीय सैन्यासह अनेक लोकांचे जिप्सी सोबत जिव्हाळ्याचे संबंध आहेत त्यामुळे अनेकांनी याबाबत सोशल मीडियावर आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.

भारतीय सैन्याची पसंद मारुती जिप्सीच का ?

हवा,ऊन,पाऊस, पाणी किंवा वाळवंट. परिस्थती कोणतीही असो, जिप्सी कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही रस्त्यावर धावण्यास सक्षम होती. सुमारे ५०० किलो ग्रामपर्यंत वजन वाहून नेण्याची क्षमता असलेली जिप्सी, लष्कराची आवडती गाडी होती. मारुती सुझुकीची जिप्सी (Maruti Gypsy) ८० बी एच पी पावरच्या इंजिनसह १०३ NM टॉर्क जनरेट करू शकते व तिचे मायलेज आहे ११. ९६ किमी प्रति लिटर.

Image Source – India TV

rushlane ने दिलेल्या अहवालात हे म्हटले आहे कि, मारुती सुझुकीने आपल्या डिलर्सना ह्याबाबतची माहिती इ मेलद्वारे दिली आहे. मारुतीने पहिल्यांदा जिप्सीचे डिझेल व्हर्जन लाँच केले ते १९८५ साली. त्यानंतर १९९१ साली जिप्सी भारतीय सैन्याच्या सेवेत रुजू झाली होती. आजवर मारुती सुझुकीने भारतीय सैन्याला ३५ हजार जिप्सी गाड्या पुरवल्या आहेत. आता ह्या जिप्सीची जागा महिंद्रा आणि टाटांच्या गाड्या घेणार आहेत. टाटा सफारीची स्टॉर्म आणि महिंद्राची स्कॉर्पियो आता जिप्सीची जागा घेईल.

No Fields Found.

Leave A Reply

Your email address will not be published.