fbpx

चहाचे हे दुष्परिणाम वाचल्यानंतर तुम्ही आयुष्यात पुन्हा कधीही चहा पिणार नाही

पूर्वापार चालत आलेल्या रूढी आणि परंपरा कशा चालू झाल्या त्याकडे कुणाचं एवढं लक्ष नसतं. आपण त्या रूढींना पुढेही तसंच चालू ठेवत आलोय. अशाच काही रूढीं मध्ये घरी आलेल्या पाहुण्यांना चहा देण्याची परंपरा आजही तशीच चालू आहे. सकाळी घराच्या बाहेर पडताना आपण चहा घेतल्या शिवाय कधीच बाहेर पडतच नाही. आपण दिवसातून खूप वेळा चहा पितो आणि हे तुमच्या बाबतीतही घडतच असणार.

त्यातच जर एखादा चहाप्रेमी असेल, तर चहा कितीवेळा घेतला ह्याची गणतीच नसते याच चहाने आपल्या जीवनात एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे. पण मित्रांनो हा चहा आपल्या जीवाला घातक ठरू शकतो असे जर मी म्हणालो तर तुम्हाला खरे वाटणार नाही. पण खरंच चहा आपल्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतो. उकळलेला चहा पिण्यामुळे आपली पचनशक्ती बिघडून आम्लपित्त, अल्सर, सांधेदुखी, अंगदुखी आणि मलावरोध यासारखे विकार घडू शकतात. तसेच आपल्याकडच्या लोकांना गोड चहा आवडतो. त्यात साखरेचे प्रमाण जास्त असल्यामुळे खुर्चीत बसून काम करणाऱ्या व्यक्तींना मधुमेह, वाढलेले कोलेस्टरॉलचे प्रमाण, हृदयविकार अशा रोगांचा सामना करावा लागतो.

effects of drinking tea too much, side effects of tea in marathi, side effects of milk tea, side effects of milk tea on skin, side effects of indian tea, black tea, green tea side effects, disadvantages of tea, masala chai, is tea bad for health, चहाचे पिण्याचे दुष्परिणाम, दुधाच्या चहाचे दुष्परिणाम, चहा पिण्याचे नुकसान, चहाचे शरीरावर होणारे परिणाम, tea and acidity
tea time (Source – zairatea.com)

काळा चहा पिण्याने काही होत नाही असा समज जर तुम्ही करून घेतला असेल तर तुम्ही चुकताय. काळा चहा जास्त प्रमाणात घेतल्याने, त्याच्या तुरट चवीमुळे मलावष्टंभ, रक्तदाब, पक्षाघातासारखे विकार आणि शुक्राणूंची संख्या कमी होणे असे विकार संभवतात. दुधाचा चहा पिणारे पण कफ-पित्ताचे बळी पडू शकतात. टपरीवरचा चहा सगळ्यांच्या चांगलाच परिचयाचा आहे. त्या टपरीवर वापरण्यात येणारे अ‍ॅल्युमिनियमचे पातेले आरोग्यासाठी घातक ठरू शकते, कारण त्यामुळे ‘अल्झायमर्स’ (स्मृतीनाश) सारखे असाध्य आजार होऊ शकतात.

effects of drinking tea too much, side effects of tea in marathi, side effects of milk tea, side effects of milk tea on skin, side effects of indian tea, black tea, green tea side effects, disadvantages of tea, masala chai, is tea bad for health, चहाचे पिण्याचे दुष्परिणाम, दुधाच्या चहाचे दुष्परिणाम, चहा पिण्याचे नुकसान, चहाचे शरीरावर होणारे परिणाम, tea and acidity
(Source – Times Food – Times of India)

चहा आपल्या पैशाच्या पाकिटासाठीसुद्धा घातक ठरू शकतो. दिवसातून २ वेळेस चहा पिल्यास (५रू/चहा) वर्षाचे ३६०० रू होतात. ५ वर्षाचे १८००० रू होतात. मग आता तुम्हीच विचार करा, आपल्याला घातक ठरणाऱ्या चहासाठी इतके पैसे घालवणे तुम्हाला योग्य वाटते का ? काहींना चहा अतिप्रमाणात पिल्याने बद्धकोष्टता हा त्रास सुरु होतो. काहींना चहा न पिल्याने शौचास होत नाही. पण हा सर्व आपल्या मनाचा खेळ असतो, कारण आपल्याला त्या सवयीने ग्रासलेले असल्यामुळे आपण तसे समजतो.

effects of drinking tea too much, side effects of tea in marathi, side effects of milk tea, side effects of milk tea on skin, side effects of indian tea, black tea, green tea side effects, disadvantages of tea, masala chai, is tea bad for health, चहाचे पिण्याचे दुष्परिणाम, दुधाच्या चहाचे दुष्परिणाम, चहा पिण्याचे नुकसान, चहाचे शरीरावर होणारे परिणाम, tea and acidity
Tea and digestion problems (Source – NDTV Food)

पण शौचाचा वेग वाढवणे हे चहाचे काम नव्हे. चहा फक्त आपल्या शरीरातील आम्लाची वाढ करते. नियमित चहा पिल्याने आपली हाडे ठिसूळ बनतात व रक्तवाहिन्या आकुंचन पावून रक्तदाब वाढतो आणि आम्लपित्ताचा त्रास मोठ्या प्रमाणामध्ये होतो. सकाळी चहासोबत आपण नाश्ताही भरपेट करतो. त्या पदार्थांमध्ये मीठ असल्यास मिठाचा चहातील दुधाशी संपर्क झाल्याने चहा शरिराला मारक बनतो. लोकं म्हणतात दारू जीवाला धोकादायक आहे. दारूमुळे लिव्हर खराब होते व माणूस मरतो.

effects of drinking tea too much, side effects of tea in marathi, side effects of milk tea, side effects of milk tea on skin, side effects of indian tea, black tea, green tea side effects, disadvantages of tea, masala chai, is tea bad for health, चहाचे पिण्याचे दुष्परिणाम, दुधाच्या चहाचे दुष्परिणाम, चहा पिण्याचे नुकसान, चहाचे शरीरावर होणारे परिणाम, tea and acidity
(Source – NDTV Food)

पण या चहाने तर सर्व शरीरालाच नुकसान पोहोचते. तरीही चहा कितीजरी घातक असला तरी हि बदनाम मात्र दारूच आहे, चहा नाही ! असं म्हणतात कि पूर्वी आपल्याकडे चहा हा प्रकारच कुणाला माहित नव्हता. इंग्रज भारतात आले आणि आपल्या बरोबर हे चहा नावाचे पेय सुद्धा घेऊन आले. हे खरं कि खोटं हा वेगळा मुद्दा आहे. पण, चहामुळे होणारे दुष्परिणाम वाचून तुम्ही चहाचे अतिसेवन टाळाल अशी आशा मात्र नक्कीच आहे.

No Fields Found.

Leave A Reply

Your email address will not be published.