fbpx

सावधान… चुकीच्या पद्धतीने बदाम खाताय ? शरीरावर होऊ शकतो वाईट परिणाम

तुम्ही जर विद्यार्थी असाल तर तुम्हाला बदाम खाण्याचा सल्ला आजूबाजूच्या लोकांनी दिला असेलच आणि तुमची मेमरी अजून स्ट्रॉंग करण्यासाठी तुम्ही रोज बदाम खाल्या पण असतील. पण तुमची बदाम खाण्याची पद्धत चुकत असल्यास तुम्हाला त्याचा फायदा नव्हे तर त्रास होईल. मग एका दिवशी किती बदाम खाल्या पाहिजे आणि बदाम खाण्याची योग्य पद्धत काय आहे. जाणून घ्या सविस्तर माहिती.

सुका मेवा सर्वांनाच माहित आहे. बदाम (almond) हे सुद्धा सुक्या मेव्यातच मोडतात. प्रत्येकाच्या घरी सणावाराला गोड पदार्थ बनवले जातात, तेंव्हा जवळपास सगळ्या गोड पदार्थांमध्ये आवर्जून बदाम घालण्यात येतात. बदाम खाण्याचे फायदे अनेक आहेत. असे म्हणतात कि दररोज सकाळी उठल्यावर भिजवलेले बदाम खाल्ल्याने बुद्धी तल्लख होते. बदामामध्ये अनेक पोषक घटक आहेत. अँटी ऑक्सिडेंट्स, प्रथिने, वेगवेगळ्या प्रकारची जीवनसत्वे बदामामध्ये असतात. शरीराला उपयुक्त असे अनेक वेगवेगळे घटक बदामाद्वारे आपल्याला मिळतात.

almonds health benefits, almond benefits for skin, how many almonds to eat per day, almond benefits for men, raw almonds nutrition, almond benefits for hair, benefits of almonds soaked in water, almond benefits and side effects, almond benefits in marathi, how to eat almond, almond side effects, badam che fayche, बदाम खाण्याचे फायदे, बदाम खाण्याचे तोटे, भिजवलेले बदाम फायदे, बदाम कशे खायचे
Benefits of Almond (Source – supernuts.com.au)

बदाम खाण्याचे फायदे आणि योग्य पद्धत

मोनोसॅच्युरेटेड ऍसिड, व्हिटॅमिन इ, मॅग्नेशिअम, फॉस्फरस इत्यादी पोषक तत्व ह्या बदामा मध्ये आहेत. एका बदामात साधारणपणे ६ कॅलरीज असतात. आता आपण बदाम कसे खायचे हे बघू. बदाम किती प्रमाणात खावे याची एक पद्धत आहे. बदाम खाल्ल्याने फ्री रॅडिकल्सची वाढ रोखता येते. उच्च रक्तदाब नियंत्रित करता येतो. बदाम तुमच्या शरीरातील कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करतो. बदाम खाल्ल्याने वजन वाढत नाही. त्यामुळे बदाम खाण्याचे फायदे बघता तुम्ही बिनदिक्कत बदाम खाऊ शकता.

बदाम योग्य पद्धतीने खाण्यासाठी ते रात्रभर पाण्यात भिजवून ठेवायला हवेत. साधारणपणे ८ तास बदाम भिजू द्यावेत. त्यानंतर सकाळी बदाम पाण्यातून काढून त्याची साल काढून घ्यावी आणि मग खावे. असे म्हणतात कि बदामाच्या सालांमध्येही काही पोषक घटक उपल्बध असतात. बदाम खाण्याची योग्य पद्धत वरती सांगितली तशीच आहे व यामागे एक वैज्ञानिक कारण सुद्धा आहे. बदाम तयार होत असताना बाहेरील जीव जंतूंपासून संरक्षण होण्यासाठी बदामाच्या सालीचे आवरण दिलेले असते.

almonds health benefits, almond benefits for skin, how many almonds to eat per day, almond benefits for men, raw almonds nutrition, almond benefits for hair, benefits of almonds soaked in water, almond benefits and side effects, almond benefits in marathi, how to eat almond, almond side effects, badam che fayche, बदाम खाण्याचे फायदे, बदाम खाण्याचे तोटे, भिजवलेले बदाम फायदे, बदाम कशे खायचे
Benefits of Soaked Almonds (Source – Organic Facts)

बदामाची साल हे एक “एंझाइम इनहिबिटर” (enzyme inhibitor) आहे, जे आतील बदामाचे रक्षण करते. जर तुम्ही बदामाची साल खात असाल तर हे इनहिबिटर तुमच्या पोटात जातील आणि परिणामी तुमच्या शरीरातील पोषक घटकांना ते रोखतील. त्यामुळे बदाम खाताना पाण्यात भिजवून नंतर साल काढूनच खावे. आपण जेव्हा रात्रभर बदाम पाण्यात भिजत घालतो तेव्हा पाण्यामुळे बदाम फुलतो आणि असा बदाम खाल्ल्यावर आपल्याला तो पचतो. ‘बदाम पाण्यात भिजवून खा’ असे लोकांनी तुम्हाला सांगितले असेलच.   

बदामाचे पोषणमूल्य जर अजून वाढवायचे असेल तर बदाम २-३ दिवस पाण्यात भिजवून ठेवावा. असे केल्याने तो अंकुरित होतो, आणि असे म्हणतात कि अंकुरित केलेला बदाम खाल्ल्याने बदामातील पोषक घटक सर्वसाधारणपणे ३० टक्क्यांनी वाढतात. आता बर्याचवेळेला असा प्रश्न पडतो कि किती बदाम खाल्ले गेले पाहिजेत ? तर युनाइटेड स्टेट्स ऑफ ऍग्रीकल्चरच्या अहवालानुसार तुम्ही एका दिवसात किमान २० बदाम आरामात खाऊ शकता.  परंतु २० पेक्षा जास्त बदाम खाल्ल्यास तुम्हाला अपचनाचा त्रास होऊ शकतो.

almonds health benefits, almond benefits for skin, how many almonds to eat per day, almond benefits for men, raw almonds nutrition, almond benefits for hair, benefits of almonds soaked in water, almond benefits and side effects, almond benefits in marathi, how to eat almond, almond side effects, badam che fayche, बदाम खाण्याचे फायदे, बदाम खाण्याचे तोटे, भिजवलेले बदाम फायदे, बदाम कशे खायचे
Effect of soaked almonds on your body (Source – BrightSide)

बदामामध्ये व्हिटॅमिन इ असल्याकारणाने जास्त बदाम खाल्ल्यास शरीरात व्हिटॅमिन इ चे प्रमाण वाढू शकते. त्यामुळेच १०-१२ बदाम दररोज खाल्ल्यास तुम्हाला योग्य प्रमाणात त्याच्या पोषणमूल्यांचा लाभ घेता येईल. आयुर्वेदानुसार सुद्धा जास्त बदाम खाल्ल्यास पित्ताचा त्रास होऊ शकतो. म्हणून दररोज १०-१२ बदाम जरूर खावेत.  बदाम मध्ये वेगवेगळ्या प्रकारची अँटी ऑक्सिडेंट्स, प्रथिने, वेगवेगळ्या प्रकारची जीवनसत्वे असतात, त्यामुळे प्रत्येकाने आवर्जून बदाम खायलाच हवे. पण बदाम खाताना ते योग्य पद्धतीने खाल्या जाने हेही तितकेच महत्वाचे. 

No Fields Found.

Leave A Reply

Your email address will not be published.