fbpx

तुम्ही रक्तदान करण्यास पात्र आहात कि नाही ते या गोष्टी सांगतील.

Image source-google

इन्फोबझ्झ वरील विविध लेखांचे आणि ताज्या बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला Facebook , Instagram आणि Twitter वर फॉलो करा.


रक्तदान म्हणजे सर्वात श्रेष्ठ दान असते.आपले रक्त दान करून एखाद्याचा जीव वाचवण्याइतके पुण्याचे काम दुसरे कुठले नाही.आज जगात रोज लाखो लिटर रक्ताची रुग्णांसाठी आवश्यकता भासत असते.जर आपण यात काही मिली रक्त दान करून छोटेसे योगदान केले तर लाखमोलाचे ठरते.या आधीच्या लेखांमधून आपण रक्तदान करण्याचे फायदे तर बघितलेच आहेत.आपल्या प्रत्येकालाच आयुष्यात कधी न कधी रक्तदान करण्याची इच्छा होत असते त्यासाठी आपण कित्येक शिबिरे देखील घेत असतो.पण प्रत्येक व्यक्ती रक्त दान करू शकतोच असे नाही. रक्त दान करताना रक्तदात्यासाठी काही नियम बनविलेले असतात.जर तुम्ही त्या नियमांत पात्र असाल तरंच तुम्ही रक्त दान करू शकता. चला जाणून घेऊयात ते नियम.

रक्तदान
Are you eligible to donate blood ? Source – Google

१. कोणतीही गोष्ट करताना त्यासाठी एक वयोमर्यादा ठरवलेली असते.रक्तदानाचे देखील तसेच आहे.तुम्हाला जर रक्त दान करायची इच्छा असेल तर तुमचे वय १८ ते ६५ वर्षे दरम्यान असेल पाहिजे.

२. वजन हा आपल्या सर्वांच्याच आयुष्यातील अविभाज्य भाग आहे.जर तुमचे वजन ४५ किलो पेक्षा जास्त असेल तरच तुम्ही रक्तदान करण्यास पात्र आहात.तसेच तुमच्या शरीरातील रक्ताची पातळी अर्थात हिमोग्लोबिनचे प्रमाण १२.५ % पेक्षा जास्त असेल तरच तुम्ही रक्त दान करू शकता.

३. जेवणानंतर आपल्या रक्तात साखर तयार होत असते त्यामुळे ज्या व्यक्तीला रक्तदान करायचे असेल त्या व्यक्तीला उपाशीपोटी रक्त दान करावे लागते.कारण एकदा का रक्तात साखर तयार झाली तर ते रक्त दान करण्यासाठी अयोग्य ठरते.

४. चांगल्या आरोग्यासाठी प्रत्येक माणसाला दररोज आठ तास झोप घेणे आवश्यक असते.जर तुमची रक्त दान करण्याच्या अगोदर पूर्ण झोप झाली असेल तरच तुम्ही रक्तदान करू शकता.

५. जर तुम्हाला पेनकिलर औषधं घ्यायची सवय असेल आणि तुम्ही रक्तदान करण्याच्या तीन दिवस अगोदर ही औषधे घेतली असतील तरी तुम्ही रक्तदान करण्यास अपात्र ठरता.

६. प्रत्येक रक्तदात्याला रक्तदान एका वर्षातून तीन वेळाच करता येते त्यामुळे रक्तदात्याने पूर्वी केलेल्या रक्तदानास तीन महिने पूर्ण झालेले असलेच पाहिजेत.

७. जर तुम्हाला रोज कोणत्याही आजारावरची औषधे चालू असतील तर तुम्ही कधीही रक्त दान करू शकत नाही.

८. जर तुम्हाला कधी कावीळ झाली असेल तर तुम्ही रक्त दान करण्यास अपात्र आहात.

९. तीन वर्षामध्ये रक्तदात्यास मलेरिया सारखा आजार झालेला नसावा अथवा रक्तदात्याने मलेरिया विरोधी औषधेही घेतलेली नसावीत.

१०. रात्रीतून वारंवार घाम येणे, कारणाशिवाय वजनात घट होणे, कमी न होणारा ताप, जुलाब, ग्रंथीची सूज अशी लक्षणे तुम्हाला जाणवत असतील तरी देखील तुम्ही रक्त दान करू शकत नाही.

११. विषमज्वर, गोवर, गालगुंड, कांजिण्या असे आजार तुम्हाला रक्तदानाआधी सहा महिने झालेले नसावेत अन्यथा तुम्ही रक्त दानासाठी अपात्र ठरता.

१२. जर तुमच्यासोबत अपघात, शस्त्रक्रिया, दंतचिकित्सा, रक्तसंक्रमण, गोंदणे, कान किंवा नाक टोचणे किंवा आक्युप्रेशर अशा गोष्टी रक्तदानाआधी सहा महिने झाल्या असतील तरी देखील तुम्ही रक्तदान करू शकत नाही.

१३. जेव्हा रक्तात अल्कोहोल मिसळते तेव्हा ते रक्त दूषित होते त्यामुळे रक्त दान करणाऱ्या व्यक्तीने रक्तदान करायच्या चोवीस तास आधी मद्यपान केलेले नसावे.

१४. जर तुम्ही रक्त दान करण्याच्या वर्षभर अगोदर कोणती लस घेतली असेल तरी तुम्ही रक्तदान करण्यास पात्र ठरत नाही.

१५. कर्करोग, ह्दयरोग, रक्तस्त्राव जन्य व्याधी, विनाकारण वजनात घट, क्षय, रक्ताच्या इतर व्याधी, दमा, फिट येणे, अपस्मार, महारोग, मानसिक असंतुलन, ग्रंथीच्या व्याधी, संधिवात, रक्तदाब असे आजार जर तुम्हाला असतील तर तुमचे रक्त दुसऱ्या रुग्णाला देणे धोकादायक ठरू शकते.म्हणून असे आजार असणाऱ्या व्यक्ती रक्त दान करण्यास कायमस्वरूपी अपात्र असतात.

१६. विषमज्वर, ऍलर्जी, साधा ताप, सर्दी, खोकला, आव, सांधेदुखी, इन्फ्लुएंझा, गुप्तरोग असे आजार जर तुम्हाला झाले असतील तर तुम्ही रक्त दान करण्यास तात्पुरते अपात्र ठरता.

१७. जर तुमचे मूलएक वर्षांपेक्षा लहान मुलं असेल, गेल्या सहा महिन्यात तुमचा गर्भपात झाला असेल, जर तुमची मासिक पाळी चालू असेल, किंवा मासिक पाळी चालू होऊन पाच दिवस पूर्ण न झालेल्या स्त्रीया देखील रक्त दान करण्यास तात्पुरत्या अपात्र असतात.

 रक्तदानाचे हे नियम नक्की वाचा आणि मगच रक्तदान करून एका जीवाला पून्हा जीवदान द्या.


Leave A Reply

Your email address will not be published.